Profitable Agricultural Business : -फुलाच्या लागवडीतून वर्षाला लाखोंची कमाई ! वाचा ह्या शेतकऱ्याची यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Profitable Agricultural Business : फळबागा आणि भाजीपाला पिकांच्या लागवडी सोबतच विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आणि फुलशेतीचा देखील मोठ्या प्रमाणावर ट्रेंड सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. बाजारपेठेचा अभ्यास करून  नेमक्या कालावधीत जर फुल शेती किंवा भाजीपाला शेती केली तरी कमीत कमी वेळेमध्ये चांगला आर्थिक नफा मिळवणे शक्य झाले आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही उत्पादित केलेला शेतीमाल हा  बाजारपेठेत विक्री होईपर्यंतचे नियोजन खूप महत्त्वाचे असते.

त्यामध्ये जर फुल शेतीचा विचार केला तर शेडनेटच्या साह्याने अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या फुलपिकांची लागवड ही तंत्रज्ञानाच्या मदतीने करत असून खूप चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न देखील मिळवत आहेत. शेडनेटच नाही तर मोकळ्या क्षेत्रावर देखील फुलशेती करता येते. परंतु त्याकरिता व्यवस्थापन देखील काटेकोर असणे गरजेचे आहे. याच फुलशेतीच्या बाबतीत पुरंदर तालुक्यातील एका शेतकऱ्याने गुलाब किंवा झेंडू या फुलांची नाहीतर चक्क सोनं चाफ्याची शेती यशस्वी केली आहे. या शेतकऱ्याची यशोगाथा या लेखात बघणार आहोत.

सोनचाफ्याच्या शेतीतून लाखोंची कमाई

याबाबत सविस्तर वृत्त असे की पुरंदर तालुक्यातील चांबळी या गावचे शेतकरी मोहन कामठे हे प्रयोगशील शेतकरी असून सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आहेत. परंतु त्यांनी काळाची गरज ओळखून शेती पद्धतीमध्ये बदल करण्याचे निश्चित केले. त्यामुळे परंपरागत पिके किंवा शेती पद्धती सोडून त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत नवनवीन पिके घेण्याचे ठरवले व त्यातूनच त्यांना फुलशेतीची कल्पना सुचली.

काहीतरी शेतीत वेगळे करावे असे मनात असतानाच ते त्यांच्या मामाच्या गावाला गेले असताना त्या ठिकाणी त्यांनी सोनाचाफ्याची शेती पाहिली व या शेतीबद्दल त्यांनी संपूर्ण माहिती संबंधित शेतकऱ्याकडून घेतली व मनामध्ये निश्चित केले की सोनचाफ्याची लागवड करावी. मनात निश्चिती केल्यानंतर त्यांनी सोनचाफ्याची रोपे रत्नागिरी येथून खरेदी केली व शेतामध्ये लागवड केली. जवळ जवळ अर्धा एकर क्षेत्रामध्ये त्यांनी सोनचाफा लागवड केली असून व्यवस्थित व्यवस्थापन केले व त्याचा काळजीपूर्वक सांभाळ केला.

त्यांच्या या कष्टाला फळ आले असून तब्बल ते या अर्धा एकर शेतीतून अडीच ते तीन लाख रुपयांचे उत्पादन मिळवत आहेत. पारंपारिक शेती पद्धतीला बगल देत त्यांनी यशस्वी फुल शेती करून इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या सोनचाफा लागवडीचा प्रयोग यशस्वी ठरल्यामुळे त्यांच्या गावाच्या परिसरात देखील आता सोनचाफ्याची लागवड आणि मागणीत वाढ झाली आहे. तसे पाहायला गेले तर पुणे जिल्हा किंवा पुरंदर तालुका परिसरातील शेतकरी अनेक प्रयोग करत असतात. परंतु त्याही पुढे जात  कामठे यांनी सोनचाफा शेतीचा प्रयोग यशस्वी केल्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे.

 विक्रीचे नियोजन

जर आपण सोनचाफ्याच्या फुलांचा उपयोग पाहिला तर तो विविध ठिकाणी केला जातो. महत्वाचे म्हणजे सोनचाफ्याच्या फुलांची काढणी करायची असेल तर ती तुम्हाला सकाळच्या वेळेसच करणे गरजेचे असते. तसेच विक्री करता पाठवताना ते एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये दहा फुले अशा बेताने भरली जातात. यासाठी मनुष्यबळ लागते म्हणून त्यांचे घरचे कुटुंबीय देखील त्यांना या कामात मदत करतात.

त्यांनी पिकवलेला सोनचाफा ते पुण्यातील गुलटेकडी येथील बाजारपेठेमध्ये विक्री करतात. कामठे हे गेल्या चार वर्षापासून सोनचाफ्याचे उत्पादन घेत असून या माध्यमातून ते वर्षाला अडीच ते पावणे तीन लाख रुपयांचा नफा मिळवत आहे. यावरून दिसून येते की जर इच्छा असेल व काहीतरी नवीन करण्याची उर्मी असेल तर शेती देखील फायद्याचे ठरू शकते.