Profitable Business Idea: कमीत कमी भांडवलात 50 टक्के मार्जिन असलेला हा व्यवसाय करा सुरू! वाचा ए टू झेड माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Profitable Business Idea: व्यवसाय करायचा असेल तर सगळ्यात पहिले तुमचे मनाची तयारी असणे खूप गरजेचे असते. कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करायची जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही नक्कीच यामध्ये यशस्वी होऊ शकतात. समजा तुम्हाला व्यवसायामध्ये उतरायचे आहे. तेव्हा तुमच्या मनात सगळ्यात अगोदर प्रश्न येतो की व्यवसाय कोणता निवडावा? तसेच व्यवसायाची निवड झाल्यानंतर लागणारे भांडवल हा प्रमुख प्रश्न असतो.

या दोन्ही गोष्टी निश्चित झाल्यानंतर व्यवसायाची उभारणी केली जाते. उभारणी केल्यानंतर त्या व्यवसायामध्ये वाढ करणे आणि तो यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्याकरिता खूप प्रकारची मेहनत आणि अभ्यासपूर्ण दृष्टिकोन हवा असतो. बाजारपेठेतील मागणी लक्षात घेणे खूप गरजेचे असते. आपण व्यवसायाची यादी पाहिली तर ती खूप मोठी तयार होईल.

परंतु यामध्ये व्यवसायांचे निवड करताना त्याला बाजारपेठेमध्ये असलेल्या मागणीचा विचार करणे खूप गरजेचे असते. याच अनुषंगाने आपण बाजारपेठेमध्ये बाराही महिने मागणी असणारा व उत्तम मार्जिन देणारा व्यवसायाची माहिती घेणार असून तो व्यवसाय म्हणजे कापड दुकान उघडणे किंवा कापड विक्रीचा व्यवसाय हा होय.

 कपड्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक गोष्टी

कपड्यांचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला कपड्यांचे ज्ञान असणे गरजेचे आहे. म्हणजे तुम्हाला उत्तम क्वालिटीचे कपडे ओळखता येणे महत्त्वाचे असून तसेच आज कालच्या लोकांचा कपडे घालण्याचा ट्रेंड आणि फॅशन या बाबींचा अभ्यास देखील असणे खूप महत्त्वाचे आहे. यामधील तुम्हाला असलेले ज्ञान खूप फायद्याचे ठरू शकते.

कपड्यांचा व्यवसाय तुम्हाला अनेक प्रकारात सुरू करता येतो.  यामध्ये तुम्ही रेडीमेड कपड्यांचा व्यवसाय करू शकतात किंवा तयार कपड्यांचा व्यवसाय, लेडीज वेअर तसेच जेंट्स वेअर, सर्व प्रकारची फॅशनेबल कपडे तसेच टॉप ब्रँड रेडीमेड कपड्यांचा व्यवसाय देखील तुम्ही करू शकतात. तसेच अजून इतर प्रकार देखील यामध्ये आहेत.

 या व्यवसायाला असलेली मागणी

बारमाही चालणारा हा व्यवसाय असून प्रत्येक ऋतू नुसार जर यामध्ये तुम्ही बदल केला तर नक्कीच या व्यवसायात खूप मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. हिवाळ्यामध्ये तुम्ही उबदार कपडे विक्रीला ठेवू शकतात तसेच उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारे कपडे विकू शकतात.

बऱ्याच व्यक्ती पार्टीला जाण्यासाठी वेगळी कपडे व घरी घालण्यासाठी वेगळे कपडे व कार्यालयात जाण्यासाठी आणखीन वेगळे कपडे  घेत असतात. तसेच दिवाळी सारख्या सणासुदीच्या दिवसांमध्ये भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कपड्यांची विक्री होते. त्यामुळे या कालावधीत कपड्यांच्या व्यवसायातून खूप मोठा नफा मिळू शकतो. यावरून दिसून येते की कपड्यांची मागणी बाजारामध्ये  नेहमी असते.

 अशा पद्धतीने बनवा तुमचा बिजनेस प्लान

कुठलाही व्यवसाय यशस्वी करण्यासाठी त्याची व्यवस्थित प्लॅनिंग करणे गरजेचे आहे. त्यामध्ये तुम्ही करत असलेली गुंतवणूक  आणि तुमच्या व्यवसाय करिता लागणारा माल कुठून घेणार आहात? याबाबत व्यवस्थित प्लान बनवणे गरजेचे आहे. कपड्यांच्या व्यवसायाच्या फक्त विचार केला तर तुम्ही कोणत्या पद्धतीचे कपडे विकणार आहात हे अगोदर ठरवणे गरजेचे आहे.

तसेच यामध्ये तुमचे नेमके ग्राहक कोण असणार आहात? याचा देखील अभ्यास करणे गरजेचे आहे. तसेच कपड्यांच्या मार्केटमध्ये जाऊन स्वतः तुम्ही सर्वे करून घेणे गरजेचे असून आधीच या व्यवसायात असलेल्या दुकानदार किंवा इतर व्यक्तींची मदत तुम्ही घेऊ शकतात.

 कपड्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी माल कुठून खरेदी कराल?

तुम्हाला कपड्यांचे दुकान सुरू करायचे असेल तर तुम्ही यासाठी लागणारा माल हा होलसेल  विक्रेत्याकडून खरेदी करणे गरजेचे आहे. या माध्यमातून तुम्ही कमीत कमी पैसे गुंतवून चांगला कॉलिटीचा माल खरेदी करू शकतात.तसेच राजस्थान,गुजरात,कोलकत्ता आणि दिल्ली इत्यादी शहरांमधून तुम्ही स्वस्त दरात खरेदी करू शकतात.

तसेच तुम्ही ज्या शहरात किंवा शहराजवळ राहत आहात त्या ठिकाणी देखील तुम्हाला अनेक घाऊक विक्रेते सापडतील. यासंबंधी तुम्हाला पुरेशी माहिती नसेल तर तुम्ही या क्षेत्रातील जाणकार व्यक्तीचे देखील मदत घेऊ शकतात. महत्त्वाचे म्हणजे सुरुवातीला खूप कमी प्रमाणात माल घ्यावा आणि तो लवकर विकला जाईल या पद्धतीने नियोजन करावे. अगोदर घेतलेला माल विक्री होत नाही तोपर्यंत दुसरा माल खरेदी करू नये.

 जागेची निवड करताना योग्य ठिकाणी करा

कुठलाही व्यवसाय यशस्वी होण्याकरिता दुकानाची जागा खूप महत्त्वाची भूमिका पार पाडते. याकरिता तुम्ही चौकामध्ये किंवा एखाद्या कॉम्प्लेक्स मध्ये दुकान शोधणे गरजेचे आहे. म्हणजेच आपण त्याला मोक्याची जागा असे म्हणतो. तसेच कपड्यांच्या दुकानासाठी जागेचा शोध घेत असताना आजूबाजूला कुठेतरी गोडाऊन असेल अशी जागेचा शोध घ्यावा. कारण पुढे चालून तुमचा व्यवसायात वाढ झाल्यानंतर तुम्हाला गोडाऊनची आवश्यकता भासेलच. तुम्हाला रेंट ने दुकान घ्यायचे असेल तर ते घेताना त्याचे भाडे जास्त नसावे या पद्धतीने घ्यावे.

 या व्यवसायाकरिता आवश्यक नोंदण्या

तुम्हाला तुमचा व्यवसायाची जीएसटी नोंदणी करणे गरजेचे असते. तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू केल्यास त्याची एमएसएमई मध्ये नोंद करणे गरजेचे आहे. या नोंदणी अंतर्गत तुमचा व्यवसाय तुम्ही सुरू करावा.

 या व्यवसायात किती मिळतो नफा?

यामध्ये जर प्रामुख्याने पाहिले तर दीड लाख रुपये गुंतवणूक करून जर तुम्ही हा व्यवसाय सुरू करत असाल तर तुम्ही या माध्यमातून 20 हजार रुपये कमवू शकतात. महिन्याच्या सुरुवातीच्या काळात तीस हजार रुपये अधिक नफा मिळवण्याकरिता तुम्हाला तुमच्या कपड्यांची विक्री वाढवणे गरजेचे आहे. विक्री जसजशी वाढेल तसतशी तुमच्या व्यवसायात खरेदीतून थेट दुप्पट नफा या माध्यमातून मिळतो. त्यामुळे कमीत कमी खर्चात सर्वात फायदेशीर असा व्यवसाय आहे.