Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

आजोबांच्या किंवा वडिलांच्या नावे असलेल्या संपत्तीवर, मालमत्तेवर लोन घेता येते का? काय सांगतो नियम, वाचा….

आजोबा आणि वडिलांच्या संपत्तीवर कर्ज घेता येत नाही. जर समजा वडिलोपार्जित संपत्ती आजोबांच्या नावावर असेल तर नातवाचा त्यामध्ये हक्क असतो. मात्र या संपत्तीवर त्याला कर्ज घेण्याचा अधिकार नाही.

Property Knowledge : आपल्यापैकी अनेकांना आपल्या गरजा भागवण्यासाठी कर्जाची आवश्यकता भासत असते. कर्ज घेण्यासाठी मात्र संपत्ती किंवा मालमत्ता तारण ठेवावी लागते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

पण जर एखाद्या व्यक्तीच्या नावावर संपत्ती नसेल आणि संपत्ती ही त्याच्या आजोबाच्या आणि वडिलांच्या नावे असेल तर अशा व्यक्तीला त्या मालमत्तेवर कर्ज मिळतं का? असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का? मग आज आपण याच प्रश्नाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- सरकारी कर्मचाऱ्यांची झाली चांदी ! ‘या’ राज्य शासनाने चक्क 8% महागाई भत्ता वाढवला, शासन निर्णयही निघाला, वाचा सविस्तर

आज आपण आजोबा आणि वडिलांच्या नावे असलेल्या संपत्तीवर कर्ज मिळू शकता का? हो तर यासाठी काय करावं लागत. यासाठी काही वेगळे नियम आहेत का? या संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. वास्तविक प्रत्येक भारतीय व्यक्तीला आजोबा आणि वडिलांच्या संपत्तीवर वारसा हक्क कायद्यानुसार संपत्तीमध्ये हक्क प्राप्त होतो.

मात्र या संपत्तीवर कर्ज मिळतं का? त्यासाठी काही वेगळे नियम आहेत का? किंवा आजोबा आणि वडिलांच्या संपत्तीवर कर्ज घेण्यासाठी कोणता मार्ग अवलंबला जाऊ शकतो? याबाबत थोडक्यात जाणून घेऊया.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; सिडको तब्बल 65 हजार घरांची सोडत काढणार, ‘या’ भागातील घरांचा राहणार समावेश, पहा….

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, आजोबा आणि वडिलांच्या संपत्तीवर कर्ज घेता येत नाही. जर समजा वडिलोपार्जित संपत्ती आजोबांच्या नावावर असेल तर नातवाचा त्यामध्ये हक्क असतो. मात्र या संपत्तीवर त्याला कर्ज घेण्याचा अधिकार नाही.

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्याच्या नावावर मालमत्ता आहे केवळ त्याच व्यक्तीला कर्ज घेण्याचा अधिकार आहे. आता तुम्हाला नक्कीच यावर काय मार्ग आहे? असा प्रश्न पडला असेल, तर आम्ही आपणास सांगू इच्छितो वडिलोपार्जित संपत्ती जर आजोबांच्या नावावर असेल तर नातवाला कर्ज घेता येतं मात्र त्यासाठी काही वेगळे मार्ग अवलंबवावे लागतात.

जाणकार लोकांच्या मते, जर वडिलोपार्जित संपत्ती आजोबांच्या नावावर असेल आणि नातवाला कर्ज घ्यायचं असेल तर नातू आपल्या आजोबांना ग्यारंटर बनवून कर्ज घेऊ शकतो.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! प्रस्तावित नागपूर-हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला ‘या’ महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर मिळणार थांबा, पहा…

आजोबांना गॅरेंटर बनवल्यास आजोबांना एक प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागेल ज्यामध्ये नातू कोणत्याही कारणास्तव कर्ज फेडण्यास अक्षम ठरला तर आजोबांची संपत्ती विकून कर्जाची परतफेड केली जाऊ शकते असं नमूद केलेल असेल.

याशिवाय, आजोबा किंवा वडील ज्यांच्या नावावर संपत्ती असेल त्यांना सह अर्जदार करून एखादा व्यक्ती बँकेकडून कर्ज प्राप्त करू शकतो. सहअर्जदार बनवून जर कर्ज घेतले तर कर्ज फेडण्याची जबाबदारी जेवढी कर्ज घेणाऱ्या व्यक्तीची राहील तेवढीच सह अर्जदार व्यक्तीची अर्थातच आजोबा किंवा वडिलांची राहणार आहे.

हे पण वाचा :- राम भक्तांसाठी खुशखबर ! ‘या’ तारखेला खुले होणार अयोध्येतील भव्य राम मंदिर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मोठी माहिती