पुणे-औरंगाबाद ग्रीनफील्ड महामार्ग; ‘या’ 4 जिल्ह्यातील 122 गावांमध्ये होणार भूसंपादन; जमिनीला मिळणार सोन्याचा भाव, पहा कुठवर आलं काम?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Aurangabad Expressway : केंद्र शासनाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून देशातील रस्ते विकासावर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. अशातच पुढील वर्षी लोकसभा निवडणुका राहणार आहेत तसेच काही राज्यात विधानसभा निवडणुकीचा देखील बिगुल वाजणार आहे. या परिस्थितीत केंद्र शासनाच्या माध्यमातून जलद गतीने वेगवेगळी महामार्गांचे कामे पूर्णत्वाकडे नेली जात आहेत.

तसेच जी प्रकल्प नुकतीच घोषित करण्यात आली आहेत त्या प्रकल्पांना गती देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामध्ये भारतमाला परियोजने अंतर्गत विकसित होत असलेल्या पुणे औरंगाबाद ग्रीन फील्ड कॉरिडॉरचा देखील समावेश आहे. हा महामार्ग NHI अर्थातच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून तयार केला जाणार आहे. शिवाय सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्गापेक्षा हा मार्ग वेगळा राहणार आहे. दरम्यान आज आपण या महामार्ग विषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ हायवेवर दुरुस्तीची कामे सुरू असल्याने दोन मार्गीका झाल्यात बंद, पर्यायी मार्ग कोणता?

कोणत्या जिल्ह्यातुन जाणार हा मार्ग?

हा सहा पदरी ग्रीन फील्ड कॉरिडॉर पुणे, अहमदनगर, औरंगाबाद आणि बीड या चार जिल्ह्यातून प्रस्तावित करण्यात आला आहे. विशेष बाब अशी की या महामार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट डीपीआर तयार करण्यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. तसेच या मार्गाचे प्रारूप आखणी करण्यात आली असून ती निश्चित देखील झाली आहे.

एकंदरीत या मार्गाच्या प्रारंभिक कामाला सुरुवात झाली असून जलद गतीने या मार्गाचे भूसंपादन करण्यासाठी प्रयत्न आता होणार आहेत. हा ग्रीन फिल्ड कॉरिडोर पुणे, अहमदनगर, औरंगाबाद आणि बीड या चार जिल्ह्यातील एकूण बारा तालुक्यातील 122 गावांमधून जाणार आहे. जवळपास 248 किलोमीटर एवढी या महामार्गाची लांबी राहणार असून यासाठी या 122 गावांतील 2,855 हेक्टर जमीन भूसंपादित केली जाणार आहे. 

हे पण वाचा :- सावधान ! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार; हवामान विभागाचा इशारा

पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातून जाणार मार्ग?

हवेली, पुरंदर, दौड, भोर, शिरूर  या तालुक्यातून हा महामार्ग प्रस्थावित करण्यात आला आहे. या संबंधित मालिकेतील जवळपास 48 गावांमधून हा महामार्ग जाणार असून यासाठी या गावातील 800 हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातून जाणार हा मार्ग?

श्रीगोंदा, पाथर्डी, शेवगाव आणि पारनेर या तालुक्यातून हा महामार्ग जाणार आहे. श्रीगोंदा तीन, पाथर्डी 15, शेवगाव 16 आणि पारनेर मधील दहा गावांमधून हा मार्ग जाणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील कोणत्या गावातून जाणार मार्ग? 

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात हा मार्ग जाणार आहे. हा मार्ग तालुक्यातील 25 गावांमधून प्रस्तावित राहणार आहे.

बीड जिल्ह्यात कोणत्या गावातून जाणार मार्ग 

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून हा मार्ग प्रस्तावित असून आर्ती तालुक्यातील दोन गावांमध्ये या महामार्गासाठी भूसंपादन होणार आहे.

हे पण वाचा :- धक्कादायक ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांची शिंदे फडणवीस सरकारच्या काळात 960 कोटी रुपयांची देणी थकली; वाचा सविस्तर