Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

पुण्यात नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महापालिकेत ‘या’ पदासाठी नवीन भरती सुरु; आजच करा अर्ज

Pune Government Job News : पुण्यात नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये तब्बल 154 रिक्त पदांसाठी भरती आयोजित झाली आहे.

Pune Government Job News : पुण्यात नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये तब्बल 154 रिक्त पदांसाठी भरती आयोजित झाली आहे. निश्चितच ज्यांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नोकरी करायची असेल अशांसाठी ही आनंदाची पर्वणी राहणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून आशा स्वयंसेविका या पदाचा रिक्त जागा महानगरपालिकेच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. यामुळे निश्चितच या पदासाठी पात्र ठरणाऱ्या महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. दरम्यान आज आपण या पदभरती बाबत सर्व आवश्यक माहिती थोडक्यात पण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- नागरिकांनो सावधान ! ‘या’ जिल्ह्यात 23 एप्रिलपर्यंत अवकाळी पाऊस पडणार; पण ‘या’ जिल्ह्यात पाऊस घेणार विश्रांती, पहा IMDचा अंदाज

कोणत्या पदासाठी आहे भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये अशा स्वयंसेविका या 154 रिक्त पदांसाठी भरती आयोजित झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर यासाठी अर्ज करावा लागणार आहे.

शैक्षणिक पात्रता नेमकी काय?

या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असणे अपेक्षित आहे. शिवाय या पदासाठी केवळ आणि केवळ त्यासंबंधीत कार्यक्षेत्रातील उमेदवार अर्ज करू शकणार आहे.

आवश्यक वयोमर्यादा?

या पदासाठी 25 वर्षांपेक्षा अधिक आणि 45 वर्षांपर्यंतचा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहणार आहे.

हे पण वाचा :- कर्मचाऱ्यांनो यापुढे संपात उतरला तर याद राखा! राज्य शासन करणार ‘ही’ कारवाई, पहा…

अर्ज केव्हा सुरू होणार?

अर्ज 25 एप्रिल 2023 पासून म्हणजेच या महिन्याच्या शेवटच्या मंगळवारपासून उमेदवारांना सादर करता येणार आहेत. 4 मे 2023 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज पाठवता येणार आहे. उमेदवारांना विहित कालावधीमध्येच अर्ज पाठवता येणार आहे विहित कालावधीनंतर पाठवलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही याची नोंद या ठिकाणी उमेदवाराने घेणे गरजेचे आहे.

भरतीची जाहिरात कुठे पाहणार?

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये निघालेल्या या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी https://drive.google.com/file/d/1841nrssVZvwR_cBXDdwusIwDx1tBtWiD/view आपण या लिंक वर जाऊन जाहिरात पाहू शकणार आहात.

हे पण वाचा :- पुणे, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, धुळे अन ‘या’ जिल्ह्यात पुढील 4 ते 5 तासात कोसळणार मुसळधार पाऊस ! हवामान विभागाचा इशारा