Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

पुणे, लोणावळ्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; पुणे-लोणावळा लोकलच्या वेळेत होणार बदल? कस राहणार नवीन वेळापत्रक, पहा….

Pune Lonawala Local Train Timing : पुण्याहून लोणावळ्या दरम्यान लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुण्याहून सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी सुटणाऱ्या लोणावळा लोकल च्या वेळेत बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

वास्तविक, पुण्याहुन लोणावळ्याकडे सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी लोकल धावते मात्र या लोकलचा फायदा प्रवाशांना होत नसल्याचे चित्र आहे.

कारण की, सरकारी ऑफिस हे सहा नंतर बंद होते. आता सहा वाजून 5 मिनिटालाच लोकल असल्याने पाच मिनिटात ऑफिस मधून रेल्वे स्थानक गाठने अवघड बनते.

हे पण वाचा :- दहावी पास उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! महावितरण मध्ये ‘या’ पदासाठी मोठी भरती, अर्ज कसा करणार, वाचा

मग अशा परिस्थितीत अनेकांना या लोकलचा लाभ होत नाही, त्यांना मग दुसऱ्या लोकलची वाट पाहावी लागते. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे तसेच इतर कर्मचाऱ्यांचे देखील वेळेचे नुकसान होत आहे. विषशेता महिलाना याचा सर्वाधिक फटका बसतो.

कारण की महिलांना ऑफिसमधनं जाऊन घराची कामे देखील करावी लागतात. अशा परिस्थितीत या लोकलची वेळ बदलण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. यासाठी पुणे प्रवासी संघाने रेल्वे विभागीय व्यवस्थापकांना एक निवेदन देखील दिले आहे.

या निवेदनानुसार पुण्याहून सायंकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी सुटणारी लोणावळा लोकलच्या वेळेत बदल करून ही लोक साडेसहा वाजता किंवा पावणे सात वाजता सोडावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

हे पण वाचा :- मुंबई ते नागपूर प्रवास होणार गतिमान! ‘या’ तारखेपासून सुरू होणार Mumbai-Nagpur अतिरिक्त विमानसेवा, तिकीटही राहणार कमी, पहा….

खरं पाहता जर सहा वाजून दोन मिनिटांची लोकल पुणे रेल्वे स्थानकावरून मिस झाली तर प्रवाशांना तब्बल एक तास रेल्वे स्थानकावरच वाट पाहावी लागते. ऑफिस मधील कामाच्या बोजामुळे आधीच त्रस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना याचा मात्र मोठा फटका बसतो.

यामुळे प्रवाशांच्या माध्यमातून या लोकलच्या वेळेत बदल करून ही लोकल साडेसहा वाजता किंवा पावणे सात वाजता सुरू करावी अशी मागणी होती आणि आता प्रवासी संघाने या संदर्भात पाठपुरावा सुरू केला आहे. यामुळे लवकरच या लोकलच्या वेळेत बदल होईल अशी आशा आता व्यक्त केली जाऊ लागली आहे. 

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! आरोग्य विभागात मोठी भरती; ‘या’ पदाच्या 4751 पदे भरली जाणार, वाचा सविस्तर