पुण्याच्या शिरेपेच्यात मानाचा तुरा; देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशनं पुण्यात, पहा कोणतं आहे ते स्टेशनं?
Pune Metro Railway News : देशात गेल्या काही वर्षांपासून इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. कोणत्याही विकसित देशात तेथील इन्फ्रास्ट्रक्चर आणि विशेषता रस्ते मार्ग, लोहमार्ग तसेच मेट्रो मार्ग महत्त्वाची भूमिका निभावत असतात.
अशा परिस्थितीत आपल्या देशात देखील सर्वप्रथम वाहतूक व्यवस्था दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आपल्या देशात वर्ड क्लास वाहतूक व्यवस्था सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जात आहे. यामध्ये मेट्रो मार्ग तयार करण्यास अधिक महत्त्व दिले जात आहे.
हे पण वाचा :- गुंतवणूकदार बनलेत मालामाल ! ‘हा’ शेअर ठरला मल्टिबॅगर स्टॉक, एक लाखाचे बनलेत 12 कोटी; कोणता आहे तो स्टॉक, पहा….
आपल्या पुणे शहरात देखील मेट्रो मार्गांचे कामे युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान आता पुणे येथून पुण्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची बाब समोर येत आहे. खरं पाहता, पुणे येथे देशातील सर्वाधिक खोल मेट्रोस्थानक तयार होणार आहे.
आतापर्यंत देशातील सर्वाधिक खोल मेट्रोस्थानक कोलकत्ता येथील हावडा मैदान मेट्रोस्थानक आहे. पण हावडा मैदान मेट्रोस्थानकाचा हा विक्रम आता पुणे येथील सिविल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशन मोडणार आहे. सिविल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशन आता देशातील सर्वाधिक खोलीचे मेट्रो स्टेशन राहणार आहे.
हे पण वाचा :- शिंदे सरकारचा नवीन फंडा ! आता शिक्षकांची बदली होणार नाही? एकाच शाळेत तळ ठोकून बसावं लागणार; दीपक केसरकर म्हणतात…..
हावडा मैदान मेट्रोस्थानाकाची खोली किती?
हे हावडा मैदान metro स्टेशन कोलकाता मेट्रोच्या ग्रीन लाईनचे सर्वात शेवटचे स्थानक आहे. या स्थानकाची खोली सुमारे 33 मीटर असल्याची माहिती देण्यात आली आहे. म्हणजेच हे स्टेशन इतके खोल आहे की त्यात 10 मजली इमारत सामावू शकते. पण आता यापेक्षाही खोल मेट्रो स्टेशन आपल्या पुण्यात तयार होणार आहे.
सिविल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशनची खोली?
एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, पुणे मेट्रोचे सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्टेशन सुमारे 33.1 मीटर खोल असेल. म्हणजे हे स्टेशन आता हावडा मैदान मेट्रो स्टेशनचा सर्वाधिक खोल स्टेशनं असल्याचा विक्रम मोडणार आहे. विशेष म्हणजे हे स्टेशनं ओलांडल्यानंतर येथेही मेट्रो नदीखालून धावणार आहे.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या या अतिमहत्त्वाच्या आणि बहुचर्चित स्थानकाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. एकंदरीत यामुळे पुण्याच्या शिरेपेच्यात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आता पुणे तिथे काय उणे! असं म्हणायला काहीच हरकत नाही.
हे पण वाचा :- पंजाबरावांचा तातडीचा मॅसेज ! अहमदनगर, नासिकसह ‘या’ जिल्ह्यात पडणार अतिमुसळधार पाऊस; वाचा डख यांचा सविस्तर अंदाज