Pune News : सध्या देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आकाशाला गवसणी घालत आहेत. आपल्या देशात मोठ्या प्रमाणात डिझेलची आयात केली जात असल्याने देशातून मोठ्या प्रमाणात पैसा हा बाहेर जातो. यामुळे निश्चितच अर्थव्यवस्थेवर देखील विपरीत परिणाम होतो.
यासोबतच डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्याने डिझेलचलीत वाहनांसाठी इंधनावर होणारा खर्च देखील वाढला आहे. प्रामुख्याने शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. खरं पाहता शेतकऱ्यांना पूर्व मशागतपासून ते काढणीपर्यंत सर्वत्र ट्रॅक्टरचा उपयोग करावा लागतो.
या परिस्थिती डिझेलच्या किमती वधारल्या असल्याने ट्रॅक्टर द्वारे शेतीची कामे करणे महागले आहे. हेच कारण आहे की आता डिझेलला पर्याय शोधला जात आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथील श्रीमती गेंदीबाई चोपडा ज्युनिअर कॉलेजमधील अकरावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी एक कौतुकास्पद अस संशोधन केल आहे. या विद्यार्थ्यांनी चक्क शेवाळ पासून बायो-डिझेलची निर्मिती करण्याची किमया साधली आहे.
धन्वंतरी गायकवाड, प्रसन्न दिवेकर, ओम वाघेला या विद्यार्थ्यांनी शेवाळ पासून बायोडिझेल तयार करण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. या कामी त्यांना त्यांच्या शिक्षिका प्रतीक्षा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे. निश्चितच हा प्रयोग कौतुकास्पद असून या परियोगाचे दखल तालुका पातळीवर घेण्यात आली आहे. या प्रयोगाला तालुकास्तरावर तिसर बक्षीस देण्यात आल आहे. या विद्यार्थ्यांच्या मते, त्यांना संशोधन करताना अस आढळले की शेवाळमध्ये 80% तेल असतं यामुळे शेवाळपासून जलाशय प्रदूषित होतात आणि यामुळे जलचर प्राण्यांना धोका पोहोचतो.
यामुळे त्यांनी शेवाळ पासून बायो डिझेल तयार करण्यावर संशोधन सुरू केलं. यात त्यांना आता यशही मिळाल आहे. यामुळे या विद्यार्थ्यांच्या संशोधनामुळे शेवाळ पासून बायो डिझेल देखील तयार होईल आणि यामुळे जलाशय देखील शुद्ध बनतील. आम्ही आपणास सांगू इच्छितो की शेवाळ हे दोन प्रकारचे असतात मायक्रो आणि मॅक्रो असे दोन प्रकार पडतात. यापैकी मायक्रो शेवाळ्यामध्ये सर्वाधिक तेल असतं. यामुळे याचा उपयोग हा प्रामुख्याने शेवाळपासून बायोडिझेल तयार करण्यासाठी होणार आहे.
कसं तयार होत शेवाळपासून बायोडिझेल
शेवाळपासून बायोडिझेल तयार करण्यासाठी सर्वप्रथम शेवाळ ग्राईंड केल जात म्हणजेच बारीक केलं जातं. ग्राईंड करताना मात्र यामध्ये मिथेनॉल, कॉस्टिक सोडा व एनेहेक्जेन मिक्स करावे लागते. यानंतर मग 24 तासांसाठी हे मिश्रण सीलबंद करावे लागते. यानंतर क्रूड ऑइल म्हणजे कच्चे तेल मिळते. मग हे कच्चे तेल गरम पाण्यात मिक्स करून ऑइलचे शुद्धीकरण केले जाते. यानंतर हे मिश्रण रेस्ट करून बायोडिझेल तयार होते. साधारण अडीचशे ग्रॅम शेवाळपासून 49 एम एल बायोडिझेल मिळत असते.
शेतकऱ्यांना कसा होणार फायदा
जसं की आपणास ठाऊकच आहे शेती करताना डिझेलचेलित यंत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. अशा परिस्थितीत जर डिझेल ऐवजी बायो डिझेलचा वापर या यंत्रांमध्ये होऊ शकला तर शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. याशिवाय अलीकडे स्पिरुलिना फार्मिंग म्हणजेच शेवाळ शेती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. अशा परिस्थितीत शेवाळपासून जर बायो डिझेल तयार झालं तर शेवाळ शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मोठा फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचे शाश्वत साधन तयार होणार आहे. निश्चितच या 11 वी च्या विद्यार्थ्यांनी केलेलं हे संशोधन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर राहणार आहे.