Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘ही’ बंद झालेली एक्सप्रेस ट्रेन पुन्हा होणार सुरू, केव्हा धावणार? पहा….

Pune Railway News : पुणेकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि खानदेश मधील रेल्वे प्रवाशांसंदर्भात ही बातमी आहे. खरं पाहता, मध्य महाराष्ट्रातील पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

पुणे शहरात रोजाना हजारो लोक रेल्वेने येत असतात. भुसावळ शहरातून पुण्यामध्ये दाखल होणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्या देखील विशेष उल्लेखनीय आहे. यामुळे भारतीय रेल्वेच्या माध्यमातून पुणे-भुसावळ अशी सुपरफास्ट ट्रेन गेल्या काही वर्षांपासून चालवली जात आहे.

मात्र ही ट्रेन गेल्या दोन महिन्यांपासून बंद झाली होती. यामुळे खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारी ही एक्सप्रेस ट्रेन पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरत होती. दरम्यान आता प्रवाशांच्या या मागणीला यश आले आहे.

हे पण वाचा :- पदवीधर तरुणांसाठी सुवर्णसंधी! केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत ‘या’ पदासाठी निघाली भरती, पहा डिटेल्स

हाती आलेल्या माहितीनुसार आता 20 मे 2023 पासून पुन्हा एकदा पुणे भुसावळ ही ट्रेन नाशिक-मुंबई मार्गे सुरू होणार आहे. यामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना आता दिलासा मिळणार आहे. या मार्गावरील रेल्वे प्रवास पुन्हा एकदा गतिमान होण्यास यामुळे मदत मिळणार असल्याचे प्रवाशांच्या माध्यमातून नमूद केले जात आहे.

खरं पाहता गेल्या दोन महिन्यांपासून ही एक्सप्रेस ट्रेन बंद असल्याने या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागत होता. मात्र आता उन्हाळी सुट्ट्या सुरू झालेल्या असतानाच ही एक्सप्रेस ट्रेन पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असल्याने या निर्णयाचे प्रवाशांच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे.

हे पण वाचा :- शिर्डी, मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी ! महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती, पहा….

आम्ही आपणास सांगू इच्छितो की पुणे-भुसावळ एक्सप्रेस ट्रेन कर्जत येथे घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे तब्बल दोन महिने रद्द करण्यात आली होती. कर्जत येथील रेल्वे कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. आता कर्जत येथील रेल्वे कामे पूर्ण झाली असल्याने ही एक्सप्रेस पुन्हा एकदा धावणार आहे.

कर्जत येथील रुळाचे काम करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. पण आता हे काम पूर्ण झाले आहे. म्हणून भुसावळ-पुणे रेल्वे पुन्हा धावणार आहे, साहजिकच रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे येथील रेल्वे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 

हे पण वाचा :- शेअर मार्केटमध्ये वयाच्या कितव्या वर्षापासून पैसे गुंतवले जाऊ शकतात? शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा नियम काय, पहा….