Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

पुणे रिंगरोडबाबत मोठी बातमी; मे महिन्यात होणार ‘हे’ महत्वाचं काम, पहा….

Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामाध्यमातून पुणे रिंग रोड चे काम केले जात आहे.

Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामाध्यमातून पुणे रिंग रोड चे काम केले जात आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता या रिंग रोड चे काम हाती घेण्यात आले आहे. हे दोन स्वतंत्र रिंग रोड आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यापैकी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून तयार केल्या जाणाऱ्या पुणे रिंग रोड बाबत आता एक मोठी माहिती हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या यां प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. हा प्रकल्प अहवाल तयार झाला की मग या प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरू होईल. प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर पहिल्या अडीच वर्षात सोळु ते वडगाव शिंदे या अंतरातील काम केले जाणार आहे.

हे पण वाचा :- अहमदनगरच्या शेतकऱ्याचा नवीन प्रयोग ! चक्क पिवळ्या कलिंगडची केली लागवड, कमवलेत लाखों; पहा ही यशोगाथा

कसा असेल हा रिंगरोड?

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या प्रकल्पांतर्गत सोळू ते परंदवाडी असा मार्ग तयार केला जाणार आहे. याची लांबी ही 82.38 किलोमीटर राहणार आहे. तसेच याची रुंदी ही 65 मीटर असेल. सुरुवातीला हा देखील रिंग रोड 110 मीटर रुंदीचा करण्याचे नियोजन होते मात्र तदनंतर याची रुंदी कमी करण्यात आली.

हे पण वाचा :- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सरकार लवकरच घेणार ‘हा’ मोठा निर्णय; पगारात होणार तब्बल 8000 ची वाढ

पहिल्या टप्प्यात कोणतं काम होणार?

या प्रकल्पाचे काम जसजसा निधी उपलब्ध होईल तसतसे केले जाणार आहे. यानुसार आता प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सोळु ते वडगाव शिंदे यादरम्यान काम केले जाणार आहेत. हे सोळु ते वडगाव शिंदे दरम्यानचे काम 5.40 किलोमीटर अंतराचे राहणार आहे. यासाठीच आता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे.

हा अहवाल तयार झाल्यानंतर यासाठीचे आवश्यक भूसंपादन केले जाणार आहे. पी एम आर डी ए चे मुख्य अभियंता अशोक भालकर यांनी दिलेल्या माहितीनुसार यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल मे महिन्यात सादर होणार आहे. म्हणजे आता या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला मे महिन्यानंतर सुरुवात होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.

हे पण वाचा :- 10वी पास तरुणांसाठी मोठी बातमी ! भारतीय सैन्यात ‘या’ पदासाठी सुरू झाली मोठी भरती, ‘या’ पत्त्यावर पाठवायचा आहे अर्ज, पहा संपूर्ण माहिती…