Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

पुण्यातील शेतकऱ्याचा शेतीतला नवखा प्रयोग; चिया शेतीतून साधली आर्थिक प्रगती, काही महिन्यातच बनले लखपती, पहा…..

Pune Successful Farmer : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षात शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील शेतकरी देखील अग्रेसर आहेत.

Pune Successful Farmer : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षात शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील शेतकरी देखील अग्रेसर आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून राज्यातील इतर शेतकऱ्यांसाठी आदर्शवत असं काम केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असाच एक नवखा आणि कौतुकास्पद प्रयोग समोर येत आहेत. शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील प्रयोगशील शेतकरी बाळासाहेब ढमढेरे यांनी चक्क चिया या औषधी वनस्पतीची शेती केली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की चिया ही एक विदेशी औषधी वनस्पती असून याचे धान्य बाजारात कायमच चढ्या दरात विक्री होत असते.

हे पण वाचा :- पंजाबराव डख हवामान अंदाज; हवामानात अचानक झाला मोठा बदल, 21 एप्रिलपासून पुन्हा ‘या’ जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडणार ! पहा….

हेच कारण आहे की बाळासाहेब यांनी आपल्या सुनबाई सौ. आरती यांच्या मार्गदर्शनाखाली हे नवीन धाडस केलं आहे. आरती या स्वतः बीएससी ऍग्री मध्ये पदवीधर आहेत. त्यामुळे त्यांच शेतीमधला ज्ञान हे बाळासाहेब यांच्यासाठी फायदेशीर ठरले असून आरती यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब यांनी चिया या औषधी वनस्पतीच्या शेतीतून लाखो रुपयांची कमाई केली आहे.

बाळासाहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी जानेवारी महिन्यात या चिया पिकाची पेरणी केली. एकरी दोन किलो बियाणे आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करण्यात आली. विशेष म्हणजे लागवड केल्यानंतर या पिकाला रासायनिक खतांचा वापर केला नाही. संपूर्ण सेंद्रिय खतांचा वापर त्यांनी केला. यामुळे कमी खर्चात त्यांना या पिकातून चांगली कमाई करता आली.

हे पण वाचा :- 10वी पास उमेदवारांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ सरकारी विभागात निघाली मोठी भरती, पगार मिळणार तब्बल 32 हजार, पहा….

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पेरणीपूर्व मशागत, बियाणे,पेरणी, जैविक खत, पाणी मजुरी, खुरपणी, काढणी मजुरी, मळणी आदी कामांसाठी एकरी फक्त वीस हजार रुपये खर्च त्यांना आला आहे. आता मात्र सव्वा तीन महिन्यात त्यांना यातून उत्पन्न मिळाले आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या चियाला बाजारात 15 ते 20 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे.

त्यामुळे त्यांना खर्च वजा जाता एकरात 80 ते 85 हजाराचा निव्वळ नफा राहणार आहे. निश्चितच शेती मधला हा बदल बाळासाहेब यांच्यासाठी फायदेशीर ठरला आहे. शेतीमध्ये जर आपल्या ज्ञानाचा आणि शेती क्षेत्रातील अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनाचा यथायोग्य वापर केला तर निश्चितच शेती व्यवसायातून देखील लाखोंची कमाई केली जाऊ शकते हेच या प्रयोगातून सिद्ध होत आहे. 

हे पण वाचा :- अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, सांगली, सोलापूर अन ‘त्या’ जिल्ह्यात वादळी पाऊस पडणार ! हवामान विभागाची चेतावणी