पुण्याच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! मका नाही तर मधुमक्याची सुरु केली शेती, कमी पाण्यात मिळवले विक्रमी उत्पादन; 3 महिन्यात झाली लाखोंची कमाई, वाचा…
Pune Successful Farmer : पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली आहे. पारंपारिक पिकांची आणि पारंपारिक पद्धतीने केलेली शेती तोटे देऊ लागल्याने आता येथील शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करत आधुनिक शेतीची कास धरली आहे.
Pune Successful Farmer : पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली आहे. पारंपारिक पिकांची आणि पारंपारिक पद्धतीने केलेली शेती तोटे देऊ लागल्याने आता येथील शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करत आधुनिक शेतीची कास धरली आहे. कमी पाण्यात, कमी मेहनतीत आणि कमी वेळेत अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांची आता येथील शेतकऱ्यांनी शेती सुरू करून लाखो रुपयांची कमाई करण्याचे किमया साधली आहे.
आपण नेहमीच पुणे तिथे काय उणे असं म्हणतो आता पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही वेगवेगळे प्रयोग करून शेतीमध्ये पुणे जिल्ह्यात कोणतीच उणीव नसल्याचे दाखवून दिले आहे. दरम्यान पुरंदर तालुक्यातील मौजे कर्नल वाडी या दुष्काळी गावात एक मोठा कौतुकास्पद प्रयोग येथील दोन शेतकऱ्यांनी केला आहे. कर्नल वाडी या गावाने गेली अनेक वर्ष दुष्काळी परिस्थिती अनुभवली आहे.
दुष्काळामुळे या गावातील बहुतांशी सुशिक्षित तरुण शहराकडे रोजगारानिमित्त स्थलांतरित झाले आहेत. परंतु आता येथील सुशिक्षित तरुण नोकरीऐवजी शेतीला प्राधान्य देत आहे. कर्नल वाडी गावातील विराज निगडे आणि पृथ्वीराज निगडे या दोन शेतकऱ्यांनी देखील स्वीट कॉर्न च्या शेतीतून लाखो रुपयांची कमाई केली आहे. निगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी एका एकरात स्वीटकॉर्नची शेती सुरू केली.
लागवड केल्यानंतर रासायनिक खतांसाठी त्यांना 4000 पर्यंतचा खर्च आला. या पिकासाठी युरिया, सुफला, 10 26 26 या खतांचा वापर त्यांनी केला. आता हे पीक लागवड करून जवळपास 90 दिवस झाले आहेत आणि त्यांना उत्पादन मिळू लागले आहे. विशेष म्हणजे त्यांनी या पिकासाठी फ्लड पद्धतीने पाणी न भरता ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिले आहे.
यामुळे पाण्याची बचत झाली असून चांगले दर्जेदार उत्पादन त्यांना मिळाले आहे. विशेष म्हणजे या पिकासाठी त्यांनी एका कंपनीसोबत करार केला आहे. त्यामुळे या पिकाच्या विक्रीसाठी त्यांना बाजारपेठ शोधण्याची गरज नाही. कंपनीने 12 ते 15 हजार रुपये भाव देण्याचे आश्वासन त्यांना दिले आहे. त्यांना या एका एकरातून किमान आठ टन पर्यंत उत्पादन मिळणार आहे.
म्हणजे यातून त्यांना एक लाख 16 हजार पर्यंतचे उत्पन्न मिळणार आहे. रासायनिक खतांचा खर्च आणि इतर खर्च पकडून 17 ते 18000 पर्यंतचा खर्च आला आहे. एकंदरीत त्यांना या एका एकरातून 98 हजार पर्यंतचा निव्वळ नफा या ठिकाणी मिळणार आहे. निश्चितच या युवा शेतकऱ्यांनी शेतीमध्ये केलेला हा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक राहणार आहे.
हे पण वाचा :- काय सांगता ! ‘या’ मुख्यमंत्र्यांकडे आहे सर्वात जास्त पैसा; महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांकडे किती कोटी, पहा…