पुण्याच्या उच्चशिक्षित शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी ! ‘या’ वाणाच्या 225 सिताफळाच्या झाडातून मिळवलं साडेतीन लाखांचे उत्पन्न, वाचा ही यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Successful Farmer : अलीकडे उच्चशिक्षित तरुण शेती ऐवजी नोकरीला प्राधान्य देत आहेत. शेती व्यवसायात सातत्याने नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत असल्याने आणि बाजारात शेतमालाला कवडीमोल दर मिळत असल्याने अलीकडे तरुण शेतकरी शेती नको असा ओरड करताना सर्व दूर पाहायला मिळतात. पण पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील 1986 मध्ये पदवीधर झालेल्या एका उच्चशिक्षित व्यक्तीने नोकरी ऐवजी शेती हा व्यवसाय निवडला आणि आजच्या घडीला शेतीतून ते लाखोंची कमाई करत आहेत.

खरं पाहता 1986 च्या काळात नोकरी मिळणे तुलनेने सोपे होते. त्यावेळी शिक्षण खूपच कमी जण घेत असत. अशा परिस्थितीत नोकरीमध्ये स्पर्धा नव्हती. मात्र, पुरंदर तालुक्यातील मौजे सटलवाडी येथील गोपाळ कदम यांनी त्यावेळी नोकरी न करण्याच ठरवलं. पदवीधर असतानाही शेती करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

आपल्या ज्ञानाचा उपयोग गोपाळरावांनी शेतीमध्ये करत माळरानावर डाळिंब सिताफळ या फळ पिकांची लागवड केली आहे. सोबतच तरकारी अर्थातच भाजीपाला वर्गीय पिकांची देखील त्यांनी शेती सुरू केली आहे. या पिकातून गोपाळरावांना आजच्या घडीला लाखो रुपयांची कमाई देखील होत आहे. गोपाळराव सांगतात की, 1999 मध्ये त्यांनी पाण्याची शाश्वत उपलब्धता करण्यासाठी सर्वप्रथम विहीर खोदली.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांच्या चिंतेत भर; ‘या’ तारखेपर्यंत पाऊस अन गारपीट सुरूच राहणार, हवामान विभागाने जारी केला नवीन अंदाज, दिला गंभीर इशारा

त्यानंतर जलवाहिनीच्या मदतीने नव्याने विकसित केलेल्या शेतात पाण्याची व्यवस्था केली. मात्र असे असले तरी पाण्याची शाश्वत उपलब्धता झाली नव्हती. त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या पाण्यामुळे त्यांना फक्त 8 महिने बागायती शेती करता येत होती. यामुळे बारामाही शेती करता यावी या पार्श्वभूमीवर त्यांनी सामूहिक शेततळे योजनेचा लाभ घेतला. सहा सात शेतकऱ्यांचा समूह तयार करून सामूहिक शेततळे योजनेअंतर्गत 50 लाख लिटर साठवण क्षमता असलेल्या तळ्याची उभारणी करण्यात आली.

यासाठी त्यांना शासनाकडून सव्वा तीन लाख रुपयांचे अनुदान मिळाले होते. पाण्याची सोय झाली म्हणून त्यांनी फळबाग लागवड करण्याचा निर्णय घेतला. 2016 मध्ये सिताफळ बागेची त्यांनी लागवड केली. यासाठी शासनाकडून 20,000 रुपये अनुदान मिळालं. रोजगार हमी योजनेअंतर्गत ही सबसिडी त्यांना मिळाली होती. फुले पुरंदर या जातीच्या सीताफळाची एका एकरात त्यांनी लागवड केली.

एकरी जवळपास 225 सिताफळाची रोपे लावण्यात आली. यावेळी पूर्वी लावलेली डाळिंबाची बाग जुनी झाली असल्याने काढून टाकण्यात आली. त्यानंतर 2017 18 मध्ये पुन्हा एकदा डाळिंब लागवड त्यांनी केली. जवळपास 450 डाळिंबाची झाडे त्यावेळी लावली. 2021 मध्ये पुन्हा 150 डाळिंब झाडांची लागवड त्यांनी केली.

हे पण वाचा :- बातमी कामाची! शिंदे-फडणवीस सरकारला गोत्यात आणणारी जुनी पेन्शन योजना नेमकी आहे तरी कशी?, वाचा

सिताफळ आणि डाळिंब बागेतून आता त्यांना लाखोंची कमाई होत आहे. भाजीपाला वर्गीय पिकांमधूनही त्याना चांगली कमाई होते. ते सांगतात की, त्यांनी फळबागेसाठी आणि भाजीपाला पिकांसाठी रासायनिक खतांचा वापर अत्यल्प केला आहे. केवळ 20 टक्के रासायनिक खते ते उपयोगात आणतात आणि 80% सेंद्रिय खतांचा उपयोग करून पीक उत्पादन घेतात. पीकासाठी गाईचे शेण, गोमूत्र, गुळ आणि डाळीच्या पिठापासून तयार केलेले जीवामृत आणि निम अर्कचा ते वापर करतात. त्यासोबतच कंपोस्ट खताचा ते वापर करतात.

रासायनिक खतांचा अत्यल्प वापर केला असल्याने त्यांना डाळिंब आणि सीताफळ बागेतून चांगली कमाई झाली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार डाळिंबाच्या 450 झाडांपासून त्यांना पहिल्या वर्षी साडेआठ लाख रुपयांची कमाई झाली. सेंद्रिय खतांचा अधिक वापर करून उत्पादित केलेले डाळिंब 80 ते 180 रुपये प्रति किलो या दरात विक्री झाले आहेत. सध्या या 450 झाडांपासून तिसरा बहार ते घेत आहेत. सोबतच नव्याने लागवड केलेल्या 150 झाडांपासूनही यावर्षी उत्पादन त्यांना मिळणार आहे. म्हणजे आता 600 झाडांपासून त्यांना उत्पादन घेता येणार आहे. यामुळे डाळिंब बागेतून कमाईचा आकडा मोठा वाढेल अशी आशा त्यांनाही.

यासोबतच 225 झाडाच्या सिताफळच्या बागेतून त्यांना साडेतीन लाख रुपयांची कमाई झाली आहे. निश्चितच शेतीमध्ये जर पारंपारिक पिकांऐवजी फळबाग लागवड केली तर शेतकऱ्यांना अधिकच उत्पन्न मिळतं हे गोपाळ रावांनी सिद्ध करून दाखवल आहे. 1986 च्या काळात पदवीधर असतानाही त्यांनी नोकरी ऐवजी शेतीला निवडलं आणि आज या काळ्या आईने त्यांना लखपती बनवल आहे. एकूणच कदम यांची ही यशोगाथा नव्याने शेती व्यवसायात उतरलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला शेती कसण्यासाठी नवीन उमेद प्रदान करणारे आहे.

 हे पण वाचा :- मुंबई-बीड-लातूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कर्जत तालुक्यात ठप्प; ‘या’ कारणाने कामबंद, रस्ते प्राधिकरण विभागाची माहिती