Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

शेतकऱ्यांनो धोका वाढला ! ‘हे’ तीन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार वादळी पाऊस अन गारपीट होणार; पंजाब डख यांचा अंदाज

Punjab Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यात पुढील तीन दिवस अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि पावसाची शक्यता राहणार आहे. काही भागात गारपीट देखील होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामुळे शेतकऱ्यांना अधिक सतर्क रहावे लागणार आहे. पंजाब डखं यांनी नुकताच हा तातडीचा मेसेज शेतकऱ्यांसाठी जारी केला आहे. डखं यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पासून म्हणजेच 26 एप्रिल 2023 पासून ते 28 एप्रिल 2023 पर्यंत राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे.

हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ जिल्हा परिषदेत 612 रिक्त पदांसाठी होणार भरती; वाचा सविस्तर

तसेच काही भागात गारपीट होणार आहे. या कालावधीमध्ये वीज पडण्याची देखील शक्यता राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना विशेष सतर्क राहावे लागणार आहे, असं परभणीचे हवामान तज्ञ पंजाब डख यांनी सांगितले आहे.

कोणत्या जिल्ह्यात राहणार पावसाची शक्यता?

पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील भोकरदन, जालना, सिल्लोड, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, बुलढाणा, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, लोणार या भागात पुढील तीन दिवस अति मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे.

हे पण वाचा :- काय सांगता ! ‘या’ कंपनीच्या स्टॉकने फक्त 3 वर्षात दिले 1000 टक्क्यांहुन अधिकचे रिटर्न, गुंतवणूकदार बनलेत मालामाल, पहा….

तसेच काही भागात गारपीट देखील होणार आहे. वीज पडण्याची देखील शक्यता आहे. यामुळे पावसाचे वातावरण तयार झाल्यानंतर लगेचच सुरक्षित ठिकाणी हलायचे आहे. झाडाखाली थांबायचे नाही. तसेच आपले पशुधन देखील सुरक्षित ठिकाणी बांधायचे आहे. या कालावधीमध्ये जनावरांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. डख यांच्या मते, पुढील काही दिवस राज्यात जवळपास सर्वत्र पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहायचे आहे.

हे पण वाचा :- अहो शेठ तुम्ही नादच केलाय थेट ! प्रगतिशील शेतकऱ्याने ‘या’ फळाच्या अवघ्या 30 झाडामधून कमवलेत लाखों रुपये, वाचा ही यशोगाथा

नाशिकमध्ये पावसाला सुरवात

दरम्यान, डखं यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यातील काही भागात वादळी वारे वाहू लागले आहेत. तसेच ढगाळ हवामान देखील तयार झाले आहे. यामुळे पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता तयार होत आहे. एकंदरीत डख यांचा हवामान अंदाज पुन्हा एकदा तंतोतंत खरा ठरणार असल्याचे चित्र तयार झाले आहे.

हे पण वाचा :- अंबानी है तो मुमकिन है ! रिलायन्सच्या शेअर्समध्ये होणार ‘इतकी’ विक्रमी वाढ, गुंतवणूकदार बनणार मालामाल, कोण म्हणतय असं? पहा….