पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज ; ‘या’ जिल्ह्यात मे महिन्यातही पडणार वादळी पाऊस ! पहा काय म्हणताय डख….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Punjab Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळी पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव आणि उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाची हजेरी लागली आहे. सोबतच नांदेड जिल्ह्यातही अवकाळी पाऊस झाल्याची माहिती देण्यात आली आहे. अशातच भारतीय हवामान विभाग आणि पंजाब डखं यांनी राज्यात आगामी काही दिवस असाच पाऊस पडणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.

अशा परिस्थितीत आज आपण भारतीय हवामान विभाग आणि पंजाब डखं यांनी व्यक्त केलेला हवामान अंदाज थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वप्रथम आपण भारतीय हवामान विभाग यांनी वर्तवलेला हवामान अंदाज जाणून घेऊया त्यानंतर आपण पंजाब डख यांनी काय हवामान अंदाज व्यक्त केला आहे याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- कापूस उत्पादक शेतकऱ्यांनो सावधान ! कापसाचे ‘हे’ बियाणे खरेदी करू नका, नाहीतर…; कृषी विभागाचा मोलाचा सल्ला

भारतीय हवामान विभागाचा अंदाज काय?

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 30 एप्रिल 2023 पर्यंत असाच पाऊस पडत राहणार आहे. यामध्ये 27 आणि 28 एप्रिल 2023 रोजी राज्यातील तब्बल दहा जिल्ह्यात पावसाची तीव्रता अधिक राहणार असून या संबंधित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

IMD ने वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार, 27 एप्रिल म्हणजेच आज आणि उद्या 28 एप्रिल रोजी अहमदनगर, नासिक, पुणे, परभणी, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हे पण वाचा :- खुशखबर! भारतीय नौदलात ‘या’ पदासाठी भरती; पात्रता फक्त 10वी पास अन पगार मिळणार तब्बल 63 हजार, वाचा सविस्तर

तसेच आज पासून 30 एप्रिल पर्यंत राज्यातील मुंबईसह कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि मध्य महाराष्ट्रातील नासिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यात आणि मराठवाडा तसेच विदर्भातील छत्रपती संभाजी नगर, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.

हे पण वाचा :- एमपीएससी ग्रुप बी – ग्रुप सी संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर ! ‘या’ दिवशी होणार परीक्षा, पहा परीक्षा केंद्रांची यादी

पंजाब डख यांचा हवामान अंदाज

पंजाब डख यांनी दोन मे 2023 पर्यंत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवडे आहे. अहमदनगर, नासिक, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, भोकरदन, जालना, सिल्लोड, संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, लोणार तसेच राज्यातील इतरही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असून काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर वादळी वारा देखील वाहणार आहे यामुळे शेतकऱ्यांना अधिक काळजी घेण्याचे आवाहन डख यांनी केले आहे.

मे महिन्यात पण पाऊस

विशेष बाब म्हणजे डख यांनी 2 मे नंतर देखील राज्यात पावसाची शक्यता असल्याचे मत गेल्या काही दिवसांपूर्वी व्यक्त केले आहे. राज्यात सहा, सात आणि आठ मे रोजी पावसाची शक्यता असून 15 मे नंतरही राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडू शकतो असा अंदाज त्यांनी नुकताच वर्तवला आहे. 

हे पण वाचा :- अरे वा ! ‘हा’ घसरलेला स्टॉक गुंतवणूकदारांना कमी दिवसात बनवणार मालामाल; मिळणार तब्बल ‘इतके’ रिटर्न्स, कोणता आहे ‘तो’ स्टॉक