पंजाब डख नवीन अंदाज; आजपासून ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार, काही भागात गारपीट देखील होणार, पहा काय म्हणताय डख

Published on -

Punjab Dakh News : जेष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांनी नुकताच आपला हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे. डख यांनी आपल्या अधिकृत यूट्यूब चैनल वर वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार, आजपासून राज्यातील बहुतांशी विभागात पावसाची शक्यता तयार होत आहे.

आज अर्थातच 6 मे 2023 ते 8 मे 2023 पर्यंत राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाची शक्यता पंजाब डख यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे निश्चितच राज्यातील शेतकऱ्यांची पुन्हा एकदा डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान आज आपण पंजाब डख यांनी वर्तवलेला हवामान अंदाज सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू, किती वाढणार पगार? पहा….

6 मे ते 8 मे या जिल्ह्यात पडणार पाऊस 

पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सहा मे 2023 वार शनिवार राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा या दोन विभागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

तसेच, 6, 7 आणि 8 मे रोजी राज्यातील उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाची शक्यता राहणार आहे. डख सांगतात की, या विभागातील नासिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, जत, आटपाडी, उस्मानाबाद, पंढरपूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता कायम राहणार आहे.

विशेष म्हणजे या विभागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता राहणार असल्याने शेतकऱ्यांना अधिक सजग राहण्याची गरज आहे. तसेच 6, 7 आणि 8 मे रोजी या भागात काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी आठ मे पर्यंत आपली गोठ्यातील जनावरे गोठ्यातच ठेवायची आहेत. जनावरे उघड्यावर बांधायची नाहीत. त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवायचे आहे असा सल्ला देखील डख यांनी दिला आहे.

हे पण वाचा:- मुंबईत घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण ! गोरेगाव, लिंक रोडला मात्र 25 लाखात मिळणार स्वप्नातील सदनिका, म्हाडा ‘या’ तारखेला काढणार जाहिरात, वाचा….

या दिवशी राहणार पावसाची उघडीप

मात्र असे असले तरी 9 मे पासून राज्यात पावसाची उघडीप राहणार आहे. नऊ ते 16 मे दरम्यान राज्यात हवामान कोरडे राहणार आहे या कालावधीमध्ये पाऊस पडणार नाही असा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे.

पुन्हा या तारखेला कोसळणार पाऊस

मात्र 16 मे नंतर पुन्हा एकदा वातावरणात बिघाड होणार आहे. 17 मे, 18 मे आणि 19 मे रोजी राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आहे. नंतर मात्र 21 मे पासून हवामान पुन्हा एकदा कोरडे होणार आहे.

हे पण वाचा :- मुंबई, कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ एक्सप्रेस ट्रेन पुन्हा होणार सुरु, मध्य रेल्वे महाव्यवस्थापकाची माहिती

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!