Share Market Tips : दिवाळीत ‘ह्या’ पाच शेअर्सवर लावा पैसे ! वर्षभरात करू शकतात तुम्हाला श्रीमंत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Share Market Portfolio :- शेअर बाजारामध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार कायम उत्तम कमाई करून देऊ शकतील अशा स्टॉकच्या शोधात असतात.

कुठल्याही स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याआधी संबंधित कंपनीची संपूर्ण हिस्ट्री चेक केली जाते व तरच गुंतवणूकदार अशा स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात.

कारण चांगला परतावा मिळावा ही अपेक्षा गुंतवणूकदारांची असते. सध्या दिवाळी सारखा महत्त्वाचा सण असल्यामुळे अनेक गुंतवणूकदार हे त्याच्या पोर्टफोलिओमध्ये चांगल्यात चांगले स्टॉक खरेदी करण्यासाठी उत्सुक असतात.

याच अनुषंगाने आपण या लेखांमध्ये काही स्टॉकची माहिती घेणार आहोत जे वर्षभरामध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकतात.

दिवाळीमध्ये करू शकतात या स्टॉकमध्ये गुंतवणूक

1- इंटरग्लोब एव्हिएशन म्हणजेच इंडिगो एअरलाइन्स- ही विमान कंपनी देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असून सर्वात जास्त उड्डाणे या एरलाईनचे भारतात आहेत. तसेच येणाऱ्या भविष्यकाळामध्ये देखील या एअरलाइन्सची मागणी मजबूत राहण्याची अपेक्षा आहे. इंटरग्लोब एव्हिएशन सातत्याने सेवांचा विस्तार करत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय मार्गावर देखील वाढलेल्या मागणीचा कंपनीचा फायदा होण्याची शक्यता आहे.

2- कोटक महिंद्रा बँक- गेल्या वर्षभराचा विचार केला तर या बँकेची कामगिरी इतर बँकांच्या तुलनेमध्ये कमकुवत राहिलेली आहे. सीईओ पदावरील बदलाबाबतची अनिश्चितता यामागील कारण आहे. परंतु आता सीईओचे नाव जाहीर करण्यात आले आहे. अशा पद्धतीने आता बँकेच्या वाढीबाबत जी काही अनिश्चितता होती ती आता संपुष्टात आलेली आहे. बँकेची वाढ देखील चांगली झालेली असल्यामुळे मालमत्ता गुणवत्ता देखील चांगली आहे. तसेच शेअरच्या घसरणीमुळे मूल्यांकन देखील आकर्षक पातळीवर आलेले आहे.

3- सामी हॉटेल्स(SAMHI Hotels)- हे भारतातील दुसरे सर्वात मोठे हॉटेल मालक असून हॉटेल इंडस्ट्री मध्ये होत असलेल्या सुधारणांचा फायदा कंपनीला होईल व पुढील काही वर्षात उद्योगातील मागणीत पुरवठापेक्षा दुप्पट वाढ होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे हॉटेल कंपन्यांना किंवा हॉटेल यांना खोलीचे भाडे वाढवण्याची देखील संधी मिळणार असल्यामुळे त्यांचा नफा वाढणार आहे.

4- सिरका पेंट्स इंडिया- गेल्या तिमाहीमध्ये या कंपनीची कामगिरी उत्कृष्ट राहिलेली आहे. या आर्थिक वर्षामध्ये या कंपनीने इटालियन पियू उत्पादनांचे उत्पादन वाढवण्याची योजना आखली आहे. या अगोदर ही कंपनी आपल्या मूळ कंपनीकडून हे उत्पादने आयात करत असे. तसेच आता शिरकाने रेजिनचे घरगुती उत्पादन देखील सुरू केले आहे. त्यामुळे कंपनीचे मार्जिन वाढेल व पुरवठा साखळीच्या दृष्टीने देखील कंपनीला याची मदत मिळणार आहे. कंपनीने येत्या दोन वर्षात 400 कोटी रुपयांचा महसूल मिळवण्याचा अंदाज देखील व्यक्त केला आहे.

5- स्टार हेल्थ- ही भारतातील सर्वात मोठी किरकोळ आरोग्य विमा कंपनी असून सप्टेंबर मध्ये या कंपनीचा बाजारातील हिस्सा 33% होता. सध्या ही कंपनी इतर सामान्य विमा कंपन्यांच्या तुलनेमध्ये चांगला नफा मिळवण्याच्या स्थितीत आहे. याचे कारण म्हणजे किरकोळ आरोग्य व्यवसायामध्ये दावे सर्वात कमी आहेत व भारतामध्ये आरोग्य सेवा क्षेत्राची वाढ देखील चांगली आहे. या सगळ्या सकारात्मक बाबींचा फायदा स्टार हेल्थला मिळण्याची शक्यता आहे.