नोकरीं सोडा हो, ‘या’ 5 व्यवसायांपैकी कोणताही एक व्यवसाय सुरू करा, महिन्याकाठी लाखोची कमाई होणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea Marathi : प्रत्येकजण आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी नोकरीं अथवा उद्योगधंदा करतो. अलीकडे मात्र नोकरी ऐवजी व्यवसायाला अधिक पसंती मिळत आहे.

सकाळी नऊ ते सायंकाळी 5 अशी रुटीन लाईफ जगण्याऐवजी आता स्वतः मालक होऊन व्यवसाय करण्याला नवयुवकांकडून विशेष पसंती दाखवली जात आहे. विशेष म्हणजे शासनही नवयुवक तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.

शासनाकडून तरुणांना व्यवसायासाठी भांडवल देखील दिले जात आहे. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले जात आहे. याशिवाय देशातील अनेक आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील आणि खाजगी क्षेत्रातील बँका देखील बिजनेस लोन नवयुवक तरुणांना ऑफर करत आहेत.

मात्र असे असले तरी अनेकांना व्यवसाय सुरू करायचा असतो पण कोणता व्यवसाय सुरू करावा हे सुचत नाही. यामुळे आज आम्ही पाच बिजनेस आयडिया बाबत माहिती घेऊन आलो आहोत.

मोबाईल रिपेरिंग : या 21व्या शतकाला संगणक अन मोबाईलचे युग म्हणून ओळखले जाते. आता सर्वांकडेच स्मार्टफोन आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. साहजिकच मोबाईलचा वापर वाढला असल्याने मोबाईल रिपेअर करणाऱ्या लोकांची देखील मागणी वाढत आहे.

यामुळे जर तुम्ही व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असाल तर मोबाईल रिपेरिंगचा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. जर तुम्हाला मोबाईल रिपेरिंग जमत असेल तर हा व्यवसाय लगेचच सुरु केला जाऊ शकतो. पण जर तुम्हाला मोबाईल रिपेरिंग जमत नसेल तर यासाठी तुम्हाला आधी मोबाईल रिपेरिंगचे काम शिकावे लागणार आहे.

ब्लॉग तयार करा : जर तुम्हाला लिखाणाची आवड असेल किंवा तुम्हाला एखाद्या विषयातील सखोल ज्ञान असेल तर तुम्ही ब्लॉग बनवून लाखोंची कमाई करू शकणार आहात. ब्लॉग सुरू करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला एक वेबसाईट डिझाईन तयार करावी लागणार आहे. वेबसाईट बनवल्यानंतर तुम्ही त्यावर तुमच्या आवडीच्या विषयाबाबत लिखाण करू शकता. मात्र ज्या विषयावर तुम्ही ब्लॉग बनवत आहात त्या विषयाबाबत तुम्हाला चांगलं ज्ञान असणे आवश्यक आहे. ब्लॉगिंगच्या माध्यमातून अलीकडे अनेकांनी लाखो रुपयांची कमाई केली आहे. तुम्ही देखील ब्लोगिंग सुरू करून चांगली कमाई करू शकता.

यूट्यूब चैनल : तुम्ही यूट्यूब चैनल सुरू करून त्यावर व्हिडिओ पोस्ट करून देखील कमाई करू शकणार आहात. तुम्ही कृषीविषयक, शेअर मार्केट विषयी, तंत्रज्ञानाविषयक किंवा तुम्हाला ज्या विषयातील चांगलं ज्ञान आहे त्या विषयाबाबतचे व्हिडिओ बनवून युट्युब वर अपलोड करू शकता. युट्युब वर अपलोड केलेल्या या व्हिडिओजवर गुगल ऍडसेन्सच्या माध्यमातून ऍड लावल्या जातात आणि यातूनच तुमची कमाई होते.

शिकवणी : तुम्ही लहान मुलांसाठी शिकवणी सुरु करू शकता. इंग्लिश, मराठी, इतिहास, विज्ञान, गणित इत्यादी विषयांच्या शिकवणी घेतल्या जातात. जर तुम्हीही एखाद्या विषयात पारंगत असाल तसेच तुम्ही त्या विषयात उच्च शिक्षण घेतलेले असेल तर लहान मुलांचे शिकवणीचे क्लास घेऊन तुम्ही चांगली कमाई करू शकणार आहात. तुम्ही पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे शिकवणीचे क्लास घेऊ शकतात. जेव्हा तुमचा कोचिंग क्लास परिसरात लोकप्रिय होईल तेव्हा तुम्ही शिक्षक संख्या वाढवून अधिक चांगली कमाई करू शकता.

ट्रान्सलेटर : जर तुम्ही हिंदी इंग्लिश मराठी गुजराती पंजाबी किंवा इतर फॉरेन लँग्वेजेसमध्ये पारंगत असाल तर तुमच्यासाठी ट्रान्सलेटरचा जॉब उत्तम ठरणार आहे. अनेक ठिकाणी हिंदी टू मराठी मराठी टू हिंदी इंग्लिश टू मराठी मराठी टू इंग्लिश असे भाषांतर करणाऱ्यांची गरज असते. यामुळे जर तुम्ही उत्तम ट्रान्सलेटर असाल तर कंपनीत तुम्हाला चांगल्या पगारावर काम मिळू शकणार आहे.