Rahu Rashi Parivartan:- ज्योतिष शास्त्रानुसार जर आपण बघितले तर ग्रहांचे जे काही राशी परिवर्तन होत असते त्याचे अनेक चांगले किंवा वाईट परिणाम हे त्या त्या राशीवर होत असतात. ग्रहांचे होणारे राशी परिवर्तन हे काही राशीकरिता खूप फायद्याचे असते. तर काही राशीकरिता मात्र ते नुकसान देणारे देखील ठरू शकते.
या सगळ्या ग्रहांचे राशी परिवर्तन व त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम याची माहिती आपल्याला ज्योतिष शास्त्रामध्ये मिळत असते. अगदी याचप्रमाणे जर आपण ज्योतिष शास्त्रामध्ये बघितले तर राहूचे महत्त्व हे खूप मोठ्या प्रमाणावर आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार जर आपण राहुची वैशिष्ट्ये बघितली तर हा नेहमी उलटी चाल चालत आहे आणि जवळपास 18 महिन्यांपर्यंत एकाच राशीमध्ये विराजमान राहणार आहे.
सध्या जर आपण बघितले तर राहू हा मीन राशीमध्ये असून 18 मे 2025 ला कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. म्हणजेच राहूचे गोचर होणार आहे. त्यामुळे राहुच्या या राशी परिवर्तनाचा काही राशींवर परिणाम होताना आपल्याला दिसून येईल. प्रामुख्याने या लेखात दिलेल्या तीन राशींवर याचा विपरीत परिणाम होणार आहे.
राहूच्या राशी परिवर्तनाचा या तीन राशींवर होईल विपरीत परिणाम
1-वृषभ- जेव्हा राहूचा कुंभ राशीमध्ये प्रवेश होईल तेव्हा या राशीच्या लोकांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच या कालावधीत या लोकांमध्ये रागीटपणा देखील दिसून येईल. वृषभ राशीच्या व्यक्तींना या कालावधीत अस्वस्थता जाणवू शकते.
इतकेच नाहीतर एखादी घटना अशी घडेल की त्यामुळे थेट आर्थिक उत्पन्नावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच या राशीच्या व्यक्तींचा खर्च देखील या कालावधीत वाढण्याची शक्यता आहे व नोकरीच्या ठिकाणी प्रगती थांबू शकते.
जे व्यक्ती व्यवसायामध्ये असतील त्यांना व्यवसायात तोटा होऊ शकतो. कुटुंबात मतभेद होऊ शकतात व त्यामुळे संपूर्ण कुटुंबात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
2- कर्क- राहूचे कुंभ राशी मधील प्रवेश कर्क राशींच्या व्यक्तींकरिता नुकसानदायक ठरण्याची शक्यता असून या कालावधीत या व्यक्तींच्या कामांमध्ये अडचणी वाढू शकतात.
तसेच कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांमध्ये मतभेद देखील होण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर कुटुंबामध्ये देखील मतभेद होऊ शकतात. विशेष म्हणजे या कालावधीत कर्क राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे राहील.
मानसिक व शारीरिक अशा दोन्ही प्रकारच्या समस्या या कालावधीत येऊ शकतात. तसेच या कालावधीत कुठलाही व्यवहार करत असाल तर खूप काळजी घेणे गरजेचे आहे.
3- मीन- राहूचे राशी परिवर्तन मीन राशींच्या व्यक्तींकरिता देखील फायद्याचे नाही. या कालावधीत या राशींच्या व्यक्तींमध्ये अस्वस्थता जाणवू शकते व आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.
या राशींच्या व्यक्तींना खर्चावर खूप लक्ष द्यावे लागेल. या राशींच्या व्यक्तींचा अचानक खर्च या कालावधीत वाढू शकतो व त्यामुळे आर्थिक तणाव येण्याची शक्यता आहे. दुसरे म्हणजे अगदी जवळच्या लोकांकडून देखील फसवणूक होऊ शकते.
( टीप- वरील माहिती ही ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती वाचकांसाठी माहितीस्तव सादर केली आहे. या माहितीचे अहमदनगर लाईव्ह 24 कुठल्याही प्रकारचा दावा किंवा समर्थन करत नाही.)