Railway Information:- आरामदायी आणि कमीत कमी खर्चामध्ये लांबचा प्रवास करण्यासाठी प्रवासी रेल्वेला मोठ्या प्रमाणावर पसंती देतात. भारतातील रेल्वे नेटवर्क पाहिले तर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत तर पश्चिमे पासून पूर्वेपर्यंत म्हणजे संपूर्ण भारतामध्ये पसरलेले आहे. तसेच सर्वात जास्त कर्मचारी वर्ग हे रेल्वेमध्येच आहेत.
याव्यतिरिक्त अजून देखील अनेक रेल्वे मार्गांचे काम हाती घेण्यात आलेले असून जास्तीत जास्त प्रमाणात रेल्वे नेटवर्क विस्तारले जात आहे. प्रवासी वाहतूक तसेच मालवाहतूक यांच्या दृष्टिकोनातून रेल्वेचे महत्त्व अनन्यसाधारण असल्यामुळे रेल्वेला भारताची जीवनवाहिनी म्हणून देखील ओळखले जाते.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे जाळे हे भारताचे आहे. रेल्वेच्या माध्यमातून कमीत कमी तिकीट दरात लांब पल्ल्याचा प्रवास करू शकतात व त्यामुळे लांबचा प्रवास करण्यासाठी भारतीय रेल्वे आर्थिक दृष्ट्या खूप परवडते. याच फायदेशीर असा रेल्वेच्या बाबतीत आपण कधी विचार केला आहे का की संपूर्ण एक रेल्वे बनवण्याकरिता किती खर्च येत असेल? याचा अनुषंगाने याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती या लेखात घेऊ.
संपूर्ण एक रेल्वे बनवायला किती खर्च येतो?
रेल्वे म्हटले म्हणजे अनेक डबे रेल्वेला असतात हे आपल्याला माहित आहे व या डब्यांच्या वर्गीकरण पाहिले तर यामध्ये स्लीपर कोच तसेच जनरल व एसी कोचचा समावेश असतो. या कोचला बनवण्यासाठी त्या कोचच्या प्रकारानुसार खर्च येत असतो. एक साधारण म्हणजे जनरल कोच तयार करायचा असेल तर त्याला तब्बल एक कोटी रुपयांचा खर्च येतो. तसेच याबाबत असलेल्या रिपोर्टचा विचार केला तर स्लीपर कोच बनवण्याकरिता दीड कोटी रुपये खर्च येतो तर एक एसी कोच तयार करण्यासाठी रेल्वेला तब्बल दोन कोटी रुपये खर्च करावा लागतो.
हा झाला कोचच्या प्रकारानुसार खर्च. जर आपण रेल्वेला असलेले संपूर्ण कोच किंवा बोग्या पाहिल्या तर त्या साधारणपणे 24 बोगी असतात. या संपूर्ण 24 बोगी तयार करण्यासाठी रेल्वेला सुमारे 60 ते 70 कोटी रुपये खर्च करावे लागतात. त्यानुसार जर ट्रेनच्या किमतीचा विचार केला तर प्रत्येक ट्रेन बनवण्याची किंमत ही वेगवेगळी असते. मेमो ट्रेन ही 20 कोटीची असते. तसेच जनरल टाईप ट्रेनची किंमत तीस कोटी रुपयांपर्यंत असते व यामध्ये साधारण ट्रेन बनवायची असेल तर साठ ते सत्तर कोटी रुपये कमाल खर्च रेल्वेला करावा लागतो.
हा झाला रेल्वेचा खर्च. परंतु आता प्रवाशांमध्ये अत्यंत लोकप्रिय झालेली आणि भारतामध्ये एकूण 18 मार्गांवर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा खर्च पाहिला तर तो एक पूर्ण ट्रेन पेक्षा कितीतरी जास्त आहे. वंदे भारत ट्रेनचा बनवायचा खर्च किंवा किमतीचा विचार केला तर तो 110 ते 120 कोटी रुपयांच्या घरात असल्याचे देखील बोलले जाते. यावरून आपल्याला कळते की आपण आरामदायी आणि कमीत कमी खर्चात
प्रवास करत असलेल्या रेल्वेला बनवायला किती खर्च येतो.