शेतकऱ्यांच्या मुलांसाठी राजू शेट्टीची मोठी घोषणा; स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार ‘हे’ काम, शेतकरी पुत्रांच्या शिक्षणाला लागणार मोठा हातभार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Raju Shetti : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित मात्र तरीही या कृषी प्रधान देशांमध्ये बळीराजा गेल्या कित्येक वर्षांपासून आर्थिक संकटातच आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीमधून फारसे उत्पादन मिळत नाही आणि जरी शेतीमधून चांगले उत्पादन मिळाले तरी उत्पादित केलेल्या शेतमालाला बाजारात चांगला दर मिळत नाही.

यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होते. परिणामी शेतकरी बांधव कर्जबाजारी बनत चालला आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दाबलेला बळीराजा मग आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल देखील उचलत आहे. आपल्या महाराष्ट्रातही शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत असून ही एक चिंतेची बाब बनत चालली आहे.

यामुळे शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे जरुरीचे बनले आहे. राजकारणातून आणि समाजकारणातून शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणे आवश्यक आहे. 

हे पण वाचा :- नादखुळा ! नोकरी सांभाळत सुरू केली शेती, अंजीरच्या बागेतून साधली आर्थिक प्रगती

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी एक मोठी घोषणा केली आहे.

राजू शेट्टी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या मुलांसाठी आश्रम सुरू करणार आहेत. याची घोषणा त्यांनी कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या नांगरट साहित्य संमेलनात केली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नांगरट साहित्य संमेलन राजू शेट्टी यांच्या संकल्पनेतून नुकतेच पार पडले आहे. ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली आणि रामदास फुटाणे यांच्या उपस्थितीत हे पहिले साहित्य संमेलन यशस्वीरित्या संपन्न झाले आहे. 

हे पण वाचा :- खरीप हंगामात मका पिकाच्या ‘या’ जातीची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळणार, वाचा….

या साहित्य संमेलनात बोलतांना माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आश्रम सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, हा आश्रम जयसिंगपूरमध्ये सुरु होणार आहे.

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना किमान पदवीपर्यंत शिक्षण घेता यावे यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेणार असल्याचेही शेट्टी यांनी यावेळी जाहीर केले आहे.

तसेच पुढील नांगरट साहित्य संमेलनापर्यंत आश्रम सुरू होणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. या आश्रमामुळे, निवासी वस्तीगृहामुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना उच्च शिक्षण घेताना सुविधा उपलब्ध होणार असून पैशाअभावी या शेतकरी पुत्रांचे शिक्षण थांबणार नाही असा आशावाद व्यक्त होत आहे.

हे पण वाचा :- अहमदनगरच्या शेतकरी पुत्रांनी विकसित केलं कांदा लागवडीचे यंत्र; शेतकऱ्यांचा होणार मोठा फायदा