Ration Update:- केंद्र सरकारच्या माध्यमातून कोरोना कालावधीपासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत देशातील नागरिकांसाठी मोफत रेशन पुरवले जात आहे. आतापर्यंत या योजनेची मुदत वाढवण्यात आलेली होती. साधारणपणे 31 डिसेंबर 2023 पर्यंत सरकारच्या माध्यमातून या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत मोफत रेशन मिळणार असल्याचे देखील सरकारकडून सांगण्यात आलेले आहे.
परंतु आता ही मुदत संपायला काही दिवस बाकी राहिल्यामुळे आता या योजनेची मुदतवाढ सरकार करणार का किंवा ही योजनाच बंद करणार? याबाबत मात्र अद्याप तरी प्रश्नचिन्ह आहे. अनेक नागरिकांच्या फायद्याची असलेली ही मोफत रेशन योजना बंद होण्याअगोदर
मात्र केंद्र सरकारच्या माध्यमातून एक वेगळीच योजना आखण्यात येत असून स्वस्तामध्ये नागरिकांना पीठ उपलब्ध करून देण्याविषयीची प्लॅनिंग सरकारच्या माध्यमातून केली जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
सरकार विकणार ब्रॅण्डेड पीठ
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील 81 कोटींपेक्षा जास्त लोकांना मोफत रेशन पुरविण्यात येते. परंतु या योजनेची मुदत 31 डिसेंबर 2023 पर्यंत संपत असल्यामुळे ही योजना पुढे सुरू राहील की नाही याबाबत प्रश्न आहे. परंतु त्या अगोदर केंद्र सरकार बाजारामध्ये स्वस्तात पीठ उपलब्ध करून देणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.
सध्या बाजारपेठेमध्ये गव्हाच्या आणि पिठाच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे सरकार स्वस्त पीठ विकण्याच्या प्लॅनिंग वर काम करत भारत ब्रँडच्या माध्यमातून 27.5 रुपये प्रति किलो दराने हे पीठ सरकार विकणार आहे अशी माहिती एका अहवालानुसार समोर आली आहे.
सात नोव्हेंबर पासून केली जाणार पिठाची विक्री
या पिठाची विक्री 7 नोव्हेंबर पासून सुरू होण्याची शक्यता असून सध्या जे काही बाजारामध्ये पीठ मिळत आहे 35 ते 40 रुपये किलो या दराने मिळत आहे. म्हणजेच या पिठाचे दहा किलोचे पॅकेट 370 रुपयांना मिळते. परंतु सरकार भारत ब्रँडच्या अंतर्गत जे काही पीठ विकणार आहे.
त्याचे दहा किलोचे पॅकेट हे 275 रुपयांना ग्राहकांना मिळणार आहे. या सगळ्या प्रक्रियेचे नियोजन करण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघाला नोडल एजन्सी बनवण्यात येणार असल्याची माहिती देखील सूत्रांच्या माध्यमातून समोर आली आहे. यामध्ये गव्हाच्या पिठाचे दहा किलोचे व 30 किलोचे पॅकेट उपलब्ध केले जाणार आहे.
यामध्ये दहा किलोचे पॅकेट 275 रुपयांना नागरिकांना मिळेल अशी शक्यता आहे. याच पद्धतीने हरभरा डाळीची विक्री देखील भारत ब्रँड नावाने केली जात आहे. या अंतर्गत विकली जाणारी डाळ ही साठ रुपये प्रति किलो मिळत आहे. त्यामध्ये 30 किलोच्या मोठ्या पॅकेट ची किंमत 55 रुपये किलो आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल अशी तरी शक्यता दिसून येत आहे.
मोफत रेशन योजनेचे होणार काय?
सरकारच्या माध्यमातून जी काही मोफत रेशन योजना चालवण्यात येत आहे ती 31 डिसेंबर 2023 पर्यंत सुरू असणार आहे. परंतु त्यानंतर ही योजना पुढे सुरू राहणार की नाही याबाबत अजून कुठलीही माहिती समोर आलेली नाही.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जी काही मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे त्यामध्ये या योजनेबद्दल निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये असे देखील शक्यता आहे की सरकारच्या माध्यमातून या योजनेची मुदत 30 जून पर्यंत म्हणजेच आणखीन सहा महिन्यांनी वाढवली जाईल.