जून ते सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्रातील कोणत्या भागात पडेल किती टक्के पाऊस? कुठे राहील पावसाचा खंड? वाचा तज्ञाचा अंदाज

Ajay Patil
Published:
monsoon rain

मागच्या वर्षी संपूर्ण भारतामध्ये खूपच कमी प्रमाणामध्ये पाऊस पडला होता व त्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती व ही परिस्थिती प्रामुख्याने एल निनोच्या प्रभावामुळे उद्भवली होती. यावर्षी एल निनोचा प्रभाव कमी होऊन संपूर्ण भारतात तसेच महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यात मान्सूनचे आगमन 10 ते 13 जूनच्या दरम्यान होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून मान्सूनची चाहूल लागल्याने आता शेतकरी वर्गामध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ कृषी हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी एक अंदाज व्यक्त केला असून त्यांच्या मते जून ते जुलै महिन्यामध्ये पावसाचा खंड पडेल आणि ऑगस्ट सप्टेंबर मध्ये चांगला पाऊस होईल.

 हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केलेला अंदाज

ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यात 99% पाऊस पडेल अशी शक्यता  वर्तवली असून चंद्रपूर, नासिक आणि कोकण या भागात 100% तर उर्वरित भागांमध्ये साधारणपणे 95 ते 98 टक्के पाऊस पडेल असा देखील अंदाज त्यांनी वर्तवला.

सोबतच राज्यात जून ते जुलै या कालावधीत पावसाचा खंड राहील आणि ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये चांगला पाऊस होईल असे देखील त्यांनी म्हटले आहे.

सध्या कमीत कमी दिवसांमध्ये जास्तीत जास्त पाऊस आणि काही काळ पावसाचा खंड असे हवामान राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानुसार ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यांमध्ये पाऊस जास्त राहील तर जून जुलैमध्ये पाऊस कमी राहील.

 कोणत्या भागात राहील पावसाचा खंड?

सूर्यप्रकाशाचा कालावधी तसेच तापमान व वाऱ्याच्या वेग कमी आढळून आल्यामुळे जून ते जुलै महिन्यात धुळे, राहुरी तसेच अकोला, पाडेगाव, शिंदेवाही तसेच पुणे व कोल्हापूर येथे पावसाचा मोठा खंड राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दापोली, नागपूर, निफाड, सोलापूर, जळगाव व परभणी येथे खंडाचा कालावधी कमी राहील अशी शक्यता आहे.

 महाराष्ट्रमध्ये येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सूनची एन्ट्री शक्य

गेल्या दोन दिवसापासून मान्सून केरळमध्ये मुक्कामी होता व तो आता पुढे सरकायला लागला असून काल म्हणजेच रविवारी मान्सूनने तामिळनाडू तसेच कर्नाटकचा काही भाग व त्यासोबत आंध्र प्रदेश आणि पूर्वकडील काही राज्यांमध्ये शिरकाव केला असून येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

तसेच विदर्भामध्ये तापमानात किंचित कमी आली असून अनेक भागांमध्ये पाऊस पडेल असा अंदाज देण्यात आला आहे. रविवारी मान्सूनने चांगली वाटचाल केली असून बराच भाग व्यापला आहे व पुढील प्रवास देखील वेगात होईल अशी शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe