तुमच्या गाडीवर असलेला दंड ऑनलाईन चेक करा आणि कोर्टाच्या त्रासापासून वाचा! वाचा ऑनलाइन चेक करण्याची पद्धत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रस्त्यावर वाहन चालवताना आपल्याला वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे खूप गरजेचे असते. परंतु बऱ्याचदा वाहन चालवत असताना किंवा प्रवासात असताना आपल्याकडून अनावधानाने वाहतुकीचा नियम मोडला जातो व आपल्याला वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून दंड देखील आकारला जातो.

परंतु बऱ्याचदा आपल्याकडून ट्रॅफिक नियम मोडतो परंतु या ठिकाणी जर वाहतूक पोलीस नसतील पण जर रस्त्यालगत कॅमेरा असेल तर तुम्ही केलेली चूक त्या ठिकाणी असलेल्या कॅमेरा मध्ये कॅप्चर होऊ शकते व त्यामुळे तुमच्या नावाने इलेक्ट्रॉनिक चालान जारी केली जाण्याची दाट शक्यता असते.

बऱ्याचदा सिग्नलवर वाहतुकीचा नियम मोडणे किंवा  नो पार्किंग मध्ये गाडी पार्क केली असेल तर असे नियम मोडल्यामुळे गाडीवर ऑनलाइन दंड रेकॉर्ड केला जातो. परंतु तो आपल्याला कसा कळेल किंवा आपल्याला ऑनलाइन दंड भरावा लागला तर तो कुठे भरायचा? इत्यादीबाबतचे महत्त्वपूर्ण माहिती या लेखात घेऊ.

 पोलिसांनी लावलेला दंड ऑनलाईन कसा चेक करावा?

बऱ्याचदा आपण वाहन चालवतो व आपल्याकडून वाहतुकीचे नियम मोडले जातात. यामुळे आपल्याकडून किंवा आपल्या नावे चालान जारी केले जाते परंतु ते आपल्याला माहित देखील नसते. त्यामुळे अधून मधून तुमच्यावर काही ऑनलाईन चालान पेडिंग तर नाही ना हे तपासणे खूप महत्त्वाचे आहे.

कारण यामध्ये तुमच्या नावे दंड आकारला गेला आहे आणि तुम्ही जर तो भरला नाही तर तुम्हाला कोर्टात जाऊन तो दंड भरावा लागतो. त्यामुळे कोर्टाच्या हेलपाटा मारण्यापेक्षा तो तुम्ही ऑनलाईन पाहून ऑनलाइन पद्धतीने जमा करणे गरजेचे आहे. आता महाराष्ट्र सोबतच संपूर्ण देशामध्ये दंड लावण्याची प्रक्रिया ऑनलाईन झालेली आहे. त्यामुळे आता वाहतूक पोलीस हे तुम्ही जर कोणत्याही प्रकारचा नियम मोडला तर तुम्हाला न थांबवता तुमच्या गाडीचा नंबर आणि एक फोटो काढून त्यावर दंड आकारू शकता.

चालान कसे तपासावे?

1- तुम्हाला जर इ चालान तपासायचे असेल तर तुम्ही घरी बसून हे काम करू शकतात.

2- याकरिता तुम्हाला परिवहन विभागाच्या ई चालान वेबसाईटवर जावे लागेल किंवा परिवहन विभागाचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल.

3- त्यानंतर चेक ऑनलाईन सर्व्हिसेस हा त्या ठिकाणी पर्याय दिसेल व यावर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी चेक चालान स्टेटस वर क्लिक करावे.

4- त्यानंतर त्या ठिकाणी तुमचा वाहनाचा नंबर तसेच ड्रायव्हिंग लायसन नंबर टाकून इ चालान एसएमएसद्वारे मिळवण्यासाठी च्या पर्यावर क्लिक करावे.

5- समजा तुम्हाला जर कोणत्याही प्रकारच्या चालान मेसेज आला नाही तर डीएल किंवा व्हीकल नंबरचा पर्याय निवडा.

6- त्या ठिकाणी जी माहिती विचारलेली असेल ती व्यवस्थित भरावी आणि गेट डिटेल्स वर क्लिक करा.

7- त्या ठिकाणी जर वाहनाच्या नावे एखादा चालान पेंडिंग असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याविषयीचा सगळा तपशील दिसतो.

8- जर चालान आकारले असेल तर ते भरण्याकरिता त्या ठिकाणी तुम्हाला पे नाऊ चा पर्याय दिसेल. तो पर्याय निवडून तुम्ही तुमचे नेट बँकिंग तसंच क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट करू शकतात.