जगाच्या पाठीवर असे अनेक वैशिष्ट्यपूर्ण जागा आहेत. ज्या जागांचे अनेक दृष्टीने खूप महत्त्व आहे. तसेच अनेक देश देखील असे आहेत की ते इतर देशांपेक्षा त्यांच्या वैशिष्ट्यांनी प्रामुख्याने ओळखले जातात. वेगवेगळ्या पण नैसर्गिक दृष्टिकोनातून तसेच भौगोलिक दृष्टिकोनातून, तिथल्या चालीरीती तसेच स्थानिक परंपरा,
त्या ठिकाणची लोक संस्कृती इत्यादी माध्यमातून हे वेगळेपण आपल्या दृष्टीक्षेपात येते. या सगळ्या जागतिक पातळीवरच्या वेगळेपण असलेल्या जागा किंवा देशांचा विचार केला तर काही ठिकाणी खूप अनोखे असे वेगळेपण दिसून येते व ते म्हणजे सूर्यास्तासंबंधी.

आता आपल्याला माहित आहे की सकाळी सूर्योदय होतो आणि सायंकाळी सूर्यास्त होतो. परंतु जगाच्या पाठीवर अशा काही जागा किंवा देश आहेत की ज्या ठिकाणी सूर्य मावळत नाही व काही ठिकाणी तर तब्बल 70 दिवसांपेक्षा जास्त काळ सूर्यास्त होतच नाही.
वाटलं ना आश्चर्य? हो ही गोष्ट आश्चर्य वाटण्यासारखीच आहे. त्यामुळे आपण या लेखामध्ये अशी कोणती ठिकाणी आहेत की ज्या ठिकाणी सूर्य कधीच माळवत नाही. त्याच जागा किंवा देशांविषयी आपण माहिती घेणार आहोत.
जगातील या ठिकाणी होत नाही सूर्यास्त
1- नुनावुत( कॅनडा)- कॅनडाच्या वायव्य प्रदेशामध्ये असलेले नुनावुत हे आर्टिक सर्कलच्या सुमारे दोन अंशावर स्थित आहे व या ठिकाणी जवळपास तब्बल दोन महिन्यांपर्यंत सूर्यप्रकाश मिळत राहतो. तसेच दुसरे या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सलग तीस दिवस अंधार देखील असतो.
2- नार्वे– नॉर्वेला मध्यरात्री सूर्याची भूमी असे म्हटले जाते व हे ठिकाण आर्टिक सर्कल मध्ये स्थित आहे. जर आपण नार्वेचा विचार केला तर या ठिकाणी मे महिन्याच्या शेवटी पासून तर जुलै पर्यंत सूर्य कधीच मावळत नाही म्हणजे सूर्यास्त होत नाही. साधारणपणे 76 दिवस या ठिकाणी सूर्यास्त होत नाही. तसेच नार्वीच्या स्वालबार्ड या ठिकाणी 10 एप्रिल ते 23 ऑगस्ट पर्यंत सूर्यास्त होत नाही.
3- बॅरो(अलास्का)- या ठिकाणी मे महिन्याच्या शेवटी पासून ते जुलै अखेरपर्यंत सूर्य मावळत नाही. तसेच नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पुढील 30 दिवस या ठिकाणी सूर्योदय होत नाही आणि ती ध्रुवीय रात्र म्हणून ओळखली जाते. म्हणजे हिवाळ्याच्या कालावधीमध्ये हा संपूर्ण देश अंधारामध्ये असतो. या ठिकाणाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हे बर्फाच्छादित पर्वत आणि हिमनद्यांसाठी लोकप्रिय असून उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये भेट देण्यासाठी हे ठिकाण खूप चांगले आहे.
4- आइसलँड– आइसलँड हे ग्रेट ब्रिटन नंतर युरोपमधील सर्वात मोठे बेट असून या ठिकाणी उन्हाळ्यात 10 मे पासून तर जून महिन्याच्या अखेरपर्यंत सूर्यास्त होत नाही. या ठिकाणी मध्यरात्री सूर्य पाण्यासाठी आकुरेरी आणि ग्रीमसे बेट या शहरांना भेट देता येऊ शकते.
अशाप्रकारे जगातील या चार ठिकाणी वर्षातील बहुतांश वेळा सूर्यास्त होत नाही.