घरामध्ये कचऱ्याचा डबा कोणत्या दिशेला ठेवावा? ठेवाल ‘या’ दिशेला तर वाढू शकते तुमच्यावर कर्जाचे ओझे! काय म्हणते वास्तुशास्त्र?

Ajay Patil
Published:
dustbin

वास्तुशास्त्र हे एक महत्त्वाचे शास्त्र असून यामध्ये घराचे बांधकाम तसेच घराचे बांधकाम झाल्यानंतर घरातील अंतर्गत सजावट आणि किचन वगैरे यासारखे बांधकाम इत्यादी बाबत अनेक गोष्टी नमूद केलेल्या आहेत.घरामध्ये स्वयंपाक घर कोणत्या दिशेला असावे किंवा बाथरूम कोणत्या दिशेला असावे इथपासून तर घरामध्ये कोणती वस्तू कुठे ठेवावी? इत्यादीबाबत अतिशय महत्त्वपूर्ण माहिती वास्तुशास्त्रामध्ये नमूद केलेली आपल्याला दिसून येते.

त्यामुळे कोणतीही व्यक्ती जेव्हा घर बांधायला काढते त्यावेळी ते वास्तुशास्त्रानुसारच बांधले जाईल याची कटाक्षाने काळजी घेतली जाते. तसेच घरात ज्या काही आपण वस्तू वापरतो ते कोणत्या ठिकाणी ठेवावेत याबद्दल देखील महत्त्वाची माहिती वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आली आहे.

अशा वस्तू जर चुकीच्या दिशेला किंवा चुकीच्या ठिकाणी ठेवल्या गेल्या तर त्याचे होणारे दुष्परिणाम याबाबत देखील माहिती आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आली आहे. याच प्रमाणे जर आपण डस्टबिन म्हणजेच घरातील कचऱ्याचा डबा पाहिला तर तो कुठे ठेवावा याबाबत देखील महत्त्वाची माहिती वास्तुशास्त्रामध्ये आहे.

 घरामध्ये डस्टबिन अर्थात कचऱ्याचा डबा कोणत्या दिशेला ठेवू नये?

प्रत्येकाच्या घरामध्ये कचऱ्याचा डबा अर्थात डस्टबिन असते. साधारणपणे घराच्या कुठल्यातरी कोपऱ्यात आपण डस्टबिन म्हणजेच कचऱ्याचा डबा ठेवत असतो. परंतु हा कचऱ्याचा डबा कोणत्या दिशेला ठेवावा आणि कोणत्या दिशेला ठेवू नये याबाबत देखील महत्त्वाची माहिती वास्तुशास्त्रामध्ये दिलेली आहे.

जर वास्तुशास्त्रानुसार बघितले तर ईशान्य दिशेला सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात निर्माण होते व या दिशेला जर तुम्ही कचऱ्याचा डबा ठेवला तर संपूर्ण घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते व घरातील लोकांमध्ये विनाकारण निराशा पसरण्यास मदत होते व घरातील महत्त्वाच्या व्यक्तींचा विकास थांबतो.

करियर किंवा नोकरीच्या संधी देखील कमी व्हायला लागतात. याशिवाय आग्नेय दिशेला देखील कचऱ्याचा डबा ठेवू नये. या दिशेला जर कचऱ्याचा डबा ठेवला तर घरामध्ये पैशांची बचत होऊ शकत नाही व आहे तो पैसा देखील संपुष्टात येऊ शकतो व कर्जाचा बोजा वाढू शकतो.

तसेच पूर्व दिशेला देखील कचऱ्याचा डबा अजिबात ठेवू नये. या दिशेला कचऱ्याचा डबा ठेवला कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता असते व प्रत्येक महत्त्वाच्या कामांमध्ये यामुळे अडथळा येऊ शकतो. तसेच यामुळे घरातील सौंदर्य देखील बिघडण्याची शक्यता असते.

 कोणत्या दिशेला ठेवावा कचऱ्याचा डबा?

घरामध्ये कचऱ्याचा डबा कोणत्या दिशेला ठेवू नये हे आपण बघितले. परंतु त्यासोबतच बरीच लोक हे घराच्या बाहेर देखील कचऱ्याचा डबा ठेवत असतात. परंतु हे देखील योग्य नाही. कारण घरी जर कोणी आले तर त्यामुळे नकारात्मक परिणाम होऊ शकतो. घरातच कचऱ्याचा डबा ठेवावा व तो ठेवताना नैऋत्य दिशा आणि उत्तर पश्चिम दिशेला ठेवावा. या दिशा घरामध्ये कचऱ्याचा डबा ठेवण्यासाठी योग्य मानल्या जातात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe