Mirzapur 3 Release Date:- गेल्या काही वर्षापासून जर आपण पाहिले तर अनेक वेब सिरीज रिलीज झाल्यावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर खूप मोठ्या प्रमाणावर छाप सोडली आहे. यामध्ये आपल्याला मनोज वाजपेयींची फॅमिली मॅन किंवा जितेंद्र कुमारची पंचायत, असुर 3, दिल्ली क्राईम 3, आश्रम यासारख्या वेब सिरीजचा उल्लेख करावा लागेल.
यापैकी प्रत्येक वेब सिरीजचे काही भाग अगोदर रिलीज होऊन लोकप्रिय देखील झाले व आता त्यांचे सिक्वेल आले असून निर्माते अजून त्यांचे पुढचे भाग आणण्याच्या तयारीत आहेत.
अशा लोकप्रिय वेब सिरीज च्या यादीमध्ये मिर्जापुर दोन नंतर आता प्रेक्षकांना मिर्झापूर 3 च्या रिलीजची आतुरतेने प्रतीक्षा लागली आहे. या लोकप्रिय अशा मिर्झापूर 3 संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे व लवकरच यानुसार आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचणार आहे.
केव्हा रिलीज होणार मिर्झापूर 3 वेब सिरीज?
याबाबत सविस्तर वृत्त असे की,प्राईम व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या अधिकृत इंस्टाग्राम वर मिर्झापूर 3 वेब सिरीजच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत काही पोस्टर शेअर केले गेले होते व यामधून तारखेबाबत मात्र सस्पेन्स ठेवण्यात आला आहे.
याबाबत जर आपण काही माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यानुसार पाहिले तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिर्झापूर 3 सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची दाट शक्यता आहे.
जर आपण मिर्झापूर सिरीजचा पहिला सीजन पाहिला तर तो 2018 मध्ये ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ वर प्रदर्शित करण्यात आला होता व त्यानंतर बरोबर दोन वर्षांनी 2020 मध्ये दुसऱ्या सीजन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
दोघही पार्ट प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाल्यानंतर या सिरीजचा तिसऱ्या सीझनची शूटिंग देखील सुरू करण्यात आली होती व आता मिर्जापुर 3 प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.
मिर्जापुर 3 वेब सिरीजमध्ये काय आहे विशेष?
मिर्जापुर दोन वेब सिरीजमध्ये कालीन भैया म्हणजेच पंकज त्रिपाठीचा मुलगा मुन्ना त्रिपाठी म्हणजेच दिव्यांदू शर्मा याचा मृत्यू दाखवण्यात आला होता व तेव्हापासून वेब सिरीजचे प्रेक्षक मिर्जापुर 3 ची आतुरतेने वाट पाहत आहेत.
जर आपण या मिर्जापुर तीन वेब सिरीजची कास्टिंग पाहिली तर यामध्ये पंकज त्रिपाठी, अलि फजल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल यांच्या व्यतिरिक्त विवान सिंह, ईशा तलवार, शहानवाज प्रधान, राजेश तैलांग, शिबा चढ्ढा आणि विजय शर्मा असे अनेक कलाकार पुन्हा एकदा जुन्या पात्रांमध्ये प्रेक्षकांना दिसणार आहेत.