Property Rule: अल्पवयीन मुलांच्या नावाने मालमत्ता खरेदी करता येते का? काय म्हणतो याबाबत कायदा? वाचा माहिती

Ajay Patil
Published:
property rule

Property Rule:- रिअल इस्टेटमधील गुंतवणूक ही भविष्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असते व त्यामुळे रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करत असतात. या माध्यमातून जी ही प्रॉपर्टी खरेदी केली जाते ती प्रामुख्याने घरातील मोठे लोक म्हणजेच पालकांच्या नावाने प्रामुख्याने खरेदी केली जाते.

परंतु बऱ्याचदा अनेक पालक आपल्या घरामध्ये जे काही अल्पवयीन मुलं असतात त्यांच्या नावाने संपत्ती खरेदी करावी असा विचार करत असतात. परंतु भारतामध्ये अल्पवयीन व्यक्ती किंवा अल्पवयीन मुलांच्या नावाने संपत्ती खरेदी करता येते का? हा देखील एक मोठा प्रश्न आहे.

कारण बऱ्याचदा पालकांच्या नावावर जी संपत्ती असते ती वारसा हक्काने मुलांना मिळत असते किंवा वारस म्हणून मुलांचे नाव मृत्युपत्रांमध्ये नमूद केलेले असते. भारतामध्ये अल्पवयीन व्यक्ती संपत्ती खरेदी करू शकतो का किंवा त्याच्या नावावर संपत्ती खरेदी करता येते का? हा प्रश्न यामध्ये खूप महत्त्वाचा असतो. याबद्दलची माहिती आपण या लेखात थोडक्यात घेऊ.

 भारतामध्ये अल्पवयीन मुलांच्या नावाने मालमत्ता खरेदी करता येते का?

अल्पवयीन व्यक्ती थेट स्वतः मालमत्ता खरेदी करू शकत नाही. कारण अठरा वर्षाखालील व्यक्तीला किंवा मुलांना मालमत्ता खरेदी करणे किंवा त्याचे व्यवस्थापन करणे इत्यादी गोष्टी येत नसल्याने मुलांच्या नावाने त्यांचे पालक मालमत्ता खरेदी करू शकतात व जोपर्यंत मुले अठरा वर्षाचे होत नाही तोपर्यंत मालमत्तेचे व्यवस्थापन करण्याची संपूर्ण जबाबदारी व्यक्तीच्या किंवा मुलाच्या पालकांची असते.

यामध्ये जर आपण प्रॉपर्टी अॅक्ट 1882 पाहिला तर त्यानुसार अल्पवयीन व्यक्ती स्वतः मालमत्ता खरेदी करू शकत नसले तरी देखील त्यांचे पालक मात्र विविध माध्यमातून मुलांना संपत्तीचे मालक बनवू शकतात. अशी माध्यम म्हणजे एखाद्या वेळी पालक स्वतः मालमत्ता खरेदी करू शकतात व मुलांना भेट स्वरूपात देऊ शकतात.

त्यामुळे अल्पवयीन व्यक्तीकडे केवळ भेट स्वरूपात दिलेल्या मालमत्तेचेच मालकी असते. अशाप्रकारे अल्पवयीन व्यक्ती त्या मालमत्तेचे कायदेशीर मालक जरी असली तरी देखील प्रॉपर्टीचे व्यवस्थापन करण्याची संपूर्ण जबाबदारी पालकांची असते. प्रॉपर्टीच्या संबंधित काही करार असतील तर त्यामध्ये अशी मुलं सहभागी होत नाही किंवा होऊ शकत नाही.

त्यांच्या वतीने मात्र मालमत्ता एखाद्याला भाड्याने देणे किंवा त्या मालमत्तेची विक्री इत्यादी गोष्टी कायदेशीररित्या पालक करू शकतात. परंतु जेव्हा मुले हे त्यांचे कायदेशीर वय पूर्ण करतात तेव्हा आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया करून त्या मालमत्तेचे संपूर्ण मालकी अशा मुलांकडे हस्तांतरित करता येते.

 अशा प्रकारच्या मालमत्तेवर कर लागतो का?

जर आपण कायद्यानुसार बघितले तर अल्पवयीन व्यक्तीच्या नावावर दोन पेक्षा जास्त मालमत्ता नसतील किंवा भेटवस्तू दिलेल्या मालमत्तेतून जे काही उत्पन्न मिळत असेल त्यावर कर लागत नाही.

मात्र पालकांच्या देखरेखी खाली सदर मालमत्ता जर भाड्याने दिली तर त्यातून मिळणाऱ्या भाड्यावर मात्र कर भरावा लागतो. यामध्ये असे आहे की, मुलांच्या वतीने पालक मालमत्ता खरेदी करत असले तरी अशी मालमत्ता खरेदी करण्यासाठीचा पैसा हा अल्पवयीन मुलांचा असणे गरजेचे आहे.

जी मालमत्ता अल्पवयीन मुलांच्या नावावर आहे ती विकता येते का?

अल्पवयीन मुलांच्या नावावर मालमत्तेचे संपादन किंवा व्यवस्थापन पालक करू शकतात. परंतु अशा मालमत्तेची विक्री करायची असेल किंवा ती तारण ठेवायची असेल किंवा इतरांना भेट द्यायची असेल तर ते केवळ न्यायालयाच्या परवानगीने शक्य होते. जेव्हा मुलं अठरा वर्षे पूर्ण करतात तेव्हा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पालक मालमत्तेची मालकी मुलांकडे हस्तांतरित करतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe