सातबारा उताऱ्यावर असेल चुकीचे नाव तर त्यात बदल करता येतो का? कशी आहे नाव बदलाची प्रक्रिया? वाचा माहिती

Ajay Patil
Published:
saatbara utara

सातबारा उतारा हे कागदपत्र शेतकऱ्यांच्या अगदी जीवाभावाचे किंवा जिव्हाळ्याचे नाते असलेले कागदपत्र आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण सातबारा उतारा हा शेतकऱ्यांच्या काळीज असलेल्या जमिनीचा आरसा असतो. आपल्याला माहित आहे की शेतकऱ्यांकडे जे काही जमीन असते त्या जमिनीवर न जाता त्या जमिनीविषयीची संपूर्ण माहिती आपल्याला अगदी या सातबारा उताऱ्यावरून  घरबसल्या कळते.

त्यामुळे या उताऱ्याला खूप महत्त्व असून यावरील थोडीशी चूक देखील खूप महागात पडू शकते. आपल्याला माहित अससेलच की महाराष्ट्र शासनाचा जो काही महाराष्ट्र जमीन महसूल कायदा नियम 1966 आहे त्या अंतर्गत शेत जमिनीचे जे काही हक्क आहे त्याबाबत विविध प्रकारच्या नोंदी ठेवण्याचे काम केले जाते व या करिता वेगवेगळ्या प्रकारचे नोंदणी पुस्तके असतात.

यामध्ये शेत जमिनीचे हक्क तसेच त्यावरील पिकांचे हक्क तसेच कोणाचे मालकी हक्क इत्यादी हक्कांचा समावेश असतो व यासोबत 21 वेगवेगळ्या प्रकारचे गावचे नमुने ठेवलेले असतात. या नमुन्यांमध्येच गावचा नमुना नंबर सात आणि गावचा नमुना नंबर 12 असे मिळून सातबारा उतारा तयार होत असतो व या नोंदीवरूनच त्याला सातबारा उतारा म्हटले जाते. यावरून प्रत्येक जमीन मालकाला त्याच्याकडे असलेली जमीन किती व कोणती आहे हे कळत असते.

 सातबारा उताऱ्यावरील चुकीच्या नावात बदल करण्याची प्रक्रिया

प्रत्येक जमीन मालकाकडे असलेले जमीन किती व कोणती हे जमीन मालकाला कळण्याचे कागदपत्र म्हणजे सातबारा उतारा होय.आपण सातबारा उताऱ्याचे स्वरूप पाहिले तर उताऱ्याच्या वरच्या भागांमध्ये गाव, तालुका आणि जिल्हा इत्यादीची माहिती दिलेली असते. सातबारा हा जमीन मालकी हक्काचा प्राथमिक व अंतिम पुरावा असतो व महत्त्वाचे म्हणजे सातबारा उताऱ्याची नवीन पुस्तके साधारणपणे दहा वर्षांनी दिली जातात.

मात्र यावर पीक पाहणीची नोंद प्रत्येक वर्षाला केली जाते. बऱ्याचदा महत्त्वाचे असलेल्या या सातबारावर जेव्हा कम्प्युटरच्या माध्यमातून टायपिंग केली जाते किंवा पूर्वी हाताने सातबारा उतारे लिहिले जायचे त्यावेळी देखील काही चुका झाल्या आहेत किंवा आता सुद्धा काही चुका होण्याची शक्यता असते.

झालेल्या या चुका जर दुरुस्त करायचे असतील तर ते देखील शक्य आहे. सातबारा उताऱ्यावरील कुठलीही चूक  झालेली असेल व ती दुरुस्त करायचे असेल तर त्याचे संपूर्ण अधिकार तहसीलदारांना देण्यात आलेले आहेत. समजा सातबारा उताऱ्यावर जर चुकीचे नाव असेल तर संबंधित तहसीलदाराकडे ती चूक दुरुस्त करण्यासाठी महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम 155 प्रमाणे आवश्यक कागदपत्रांसहित अर्ज करणे गरजेचे असते.

म्हणजे जे नाव सातबारा उताऱ्यावर लावायचे आहे त्याचा पुरावा म्हणून सातबारावर दुरुस्ती करायचे आहे तो मूळ सातबारा व तहसीलदारांनी मागितलेली काही महत्त्वाची कागदपत्रे जोडून मग अर्ज करावा लागतो. या सगळ्या प्रकरणाची तहसीलदार शहानिशा करतात व उताऱ्यावरील नावात दुरुस्ती करतात.

अशाप्रकारे सातबारा उताऱ्यावरील दुरुस्तीकरिता वकिलांची गरज अजिबात भासत नाही. परंतु सरकारी कार्यालयामध्ये बऱ्याचदा दप्तर दिरंगाईत वेळ मोठ्या प्रमाणावर लागण्याची शक्यता असल्याने बरीच लोक ही कामे वकिलांच्या माध्यमातून पार पाडतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe