स्पेशल

भारतात जून महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस, महाराष्ट्रामध्ये काय राहणार मान्सूनची स्थिती? वाचा भारतीय हवामान विभागाचा नवा अंदाज

Published by
Ajay Patil

यावर्षी भारतामध्ये मान्सूनने समाधानकारक पद्धतीने वाटचाल केली व वेळेआधीच केरळमध्ये दाखल झाला. तसेच महाराष्ट्रामध्ये देखील दाखल होताना मान्सून वेळेआधी पोहोचला. त्यामुळे राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाने हजेरी लावली व बऱ्याच ठिकाणी खरिपाच्या पेरण्यांना वेग देखील आला.

परंतु आता मध्यंतरी मान्सूनची वाटचाल अचानक रखडली असल्यामुळे पावसात खंड पडल्याचे आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे अजून देखील महाराष्ट्रातील बराच भाग हा पावसाविना तसाच आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने यासंबंधीचा सुधारित अंदाज हवामान विभागाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला असून त्यांच्यानुसार आता जून महिन्यात देशामध्ये सरासरी पेक्षा कमी म्हणजेच 92% पेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

 महाराष्ट्र मध्ये काय राहील स्थिती?

जून महिन्यामध्ये देशात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज हवामान विभागाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील उत्तर कोकण तसे उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग वगळला तर राज्यातील इतर ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता कायम असल्याने जून महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.

जूनमध्ये सर्वसाधारण पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या माध्यमातून या अगोदरच वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे या महिन्याच्या अखेरपर्यंत महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

मान्सून पुन्हा सक्रिय होईल का?

साधारणपणे भारतातील अंदमान निकोबार बेटांवर 19 मे रोजी मोसमी वाऱ्यांनी एन्ट्री केलेली होती व मध्यंतरीच्या कालावधीमध्ये रेमल चक्रीवादळ आल्याने मोसमी वाऱ्यांना चाल मिळून सात दिवस आधीच ते पूर्वोत्तर  राज्यांमध्ये दाखल झाले. एक जूनला केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल होतो परंतु त्याआधीच म्हणजेच 30 मे लाच मान्सूनने केरळमध्ये प्रवेश केला व अरबी समुद्रातून वेगाने प्रवास करत 12 जून पर्यंत महाराष्ट्राच्या बऱ्याच भागापर्यंत मजल मारल्याचे आपल्याला दिसून आले.

परंतु त्यानंतरच्या कालावधीत मात्र 12 जून नंतर महाराष्ट्रात मान्सूनची वाटचाल रखडली व पूर्व भारतात 31 मे नंतर ही परिस्थिती उद्भवली. परंतु पुन्हा मान्सूनची वाटचाल थांबली जरी असली तरी तो सक्रिय होण्याची शक्यता आहे.

तसेच महत्त्वाचे म्हणजे विषुववृत्तीय प्रशांत महासागरामध्ये असलेली एल निनोची स्थिती निवळणार असून त्या ठिकाणी समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्य स्थितीत आले असून जुलै महिन्यात ला नीना ही स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. साधारणपणे जुलै ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये ला-निना तयार होण्याची शक्यता 65 टक्के असून हिवाळ्यात देखील अशी स्थिती कायम राहणार आहे.

Ajay Patil