रेल्वेच्या मागच्या डब्यावर ‘X’ हे चिन्ह का असते? काय होतो त्याचा अर्थ? वाचा ए टू झेड माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बऱ्याचदा आपल्याला प्रवास करत असताना रस्त्यावर वाहतुकीचे अनेक प्रकारचे नियम पाळावे लागतात. यामध्ये रस्त्यावर अनेक बोर्ड लावलेले असतात व या बोर्डांवर अनेक प्रकारच्या मार्किंग अर्थात निशाणी केलेल्या असतात. या प्रत्येक निशाणीचा वाहतुकीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व असून वाहतुकीच्या बाबतीत असलेले नियम या माध्यमातून दर्शवलेले असतात.

अगदी याच पद्धतीने रेल्वे मार्गावर देखील आणि रेल्वेवर देखील अनेक संक्षिप्त असे अक्षर किंवा चिन्हे असतात व त्यांचे देखील वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ होत असतात. आता रेल्वेच्या प्रत्येक डब्यांवर आपल्याला मरे,परे,दरे असे अनेक संक्षिप्त शब्द दिसून येतात. आपल्यापैकी बऱ्याच जणांना या शब्दाचा अर्थ माहिती नसतो.

उदाहरणाच घ्यायचे झालं तर यातील मरे या शब्दाचा अर्थ होतो मध्य रेल्वे आणि दरे या शब्दाचा अर्थ होतो दक्षिण रेल्वे अशाप्रकारे या शब्दाचा अर्थ असतो. तसंच रेल्वेच्या बाबतीत विचार केला तर रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर  X असे लिहिलेले असते. याचा नेमका अर्थ काय होतो हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल. याच दृष्टिकोनातून या  X चा अर्थ नेमका काय होतो त्याबद्दलचे महत्त्वपूर्ण माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 रेल्वेच्या मागच्या डब्यावर लिहिलेल्या X चा अर्थ काय होतो?

भारतीय रेल्वेने ट्रेनच्या शेवटच्या डब्याच्या मागच्या बाजूला X हे अक्षर लिहिलेले असते. यामागचे कारण रेल्वेने उघड केले असून याबाबतची अधिकृत माहिती रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वर शेअर करण्यात आलेली आहे. या मध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे की पांढरे आणि पिवळे  X हे अक्षर किंवा चिन्ह असे सूचित करते की ट्रेन कोणतेही डबे मागे न ठेवता पुढे गेली आहे.

तसेच शेवटच्या डब्यावर  असलेले X हे अक्षर प्रवाशांसाठी रेल्वे अधिकाऱ्यांना पुष्टी देते की ट्रेन पूर्णतः निघून गेली आहे व कोणते डबे वेगळे किंवा मागे राहिलेले नाहीत. समजा एखादी ट्रेन प्रवास करत असताना एखाद्या स्टेशन वरून जाते आणि तिच्या शेवटच्या डब्यावर  X हे अक्षर किंवा चिन्ह नसेल तर स्टेशन मास्टर ने असे गृहीत धरायला पाहिजे की ट्रेनला आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागत आहे व संबंधित ट्रेन शेवटच्या डब्याशिवाय पुढे जात आहे. हे चिन्ह रेल्वेच्या अधिकाऱ्यांकरिता व ट्रेनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी व तिचे सुरक्षितता निश्चित करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.

 वंदे भारत लोकल ट्रेनच्या मागच्या डब्यावर हे चिन्ह का नाही?

X हे चिन्ह वंदे भारत यांच्या शेवटच्या डब्यावर मात्र लावण्यात आलेले नाही. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे वंदे भारत ट्रेन ही एक हायस्पीड ट्रेन आहे व ती पूर्णपणे एकसंध आहे. तसेच दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे वंदे भारत ट्रेनच्या दोन्हीही बाजूला ड्रायव्हर कॅबिन असल्यामुळे या ट्रेनला  X हे चिन्ह देण्यात आलेलं नाही. त्याप्रकारेच लोकल ट्रेनमध्ये देखील दोन्ही बाजूला ड्रायव्हर केबिन असते व त्यामुळे लोकल ट्रेन वर देखील अशा प्रकारचे कोणतेही चिन्ह नसते.