जर आपण कुठल्याही गोष्टीचा निर्मितीचा विचार केला तर अगोदर अशा नवनिर्मितीची कल्पना ही मनामध्ये माणसाला अगोदर सुचते. नंतर या कल्पनेलाच मूर्त स्वरूप बरेच जण देत असतात. कल्पना या कधीकधी व्यवसायाच्या बाबतीत असू शकतात किंवा कुठल्याही कौशल्याच्या बाबतीत किंवा कुठले नवनिर्मिती करण्याच्या बाबतीत असतात. परंतु कुठलीही गोष्ट उभी राहण्याअगोदर त्याची कल्पना येणे खूप गरजेचे असते.
कल्पना आल्यानंतर त्या दिशेने प्रयत्न करून त्या कल्पनेला मूर्त स्वरूप दिले जाते. अगदी याच पद्धतीने अनेक उद्योग व्यवसायांची उभारणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. याच अनुषंगाने जर आपण शूज आणि चप्पल या क्षेत्रातील ब्रँड कोणता आहे? हे जर आपल्याला विचारले तर आपल्या डोळ्यासमोर किंवा ओठावर पटकन नाव येते ते बाटा. बाटा हा संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असा शुज आणि चप्पल ब्रँड असून या ब्रँडच्या निर्मितीची कहाणी खूपच रोचक आहे. या लेखांमध्ये बाटा या ब्रँडची उभारणी कशी झाली याबद्दल महत्वाची माहिती आपण घेणार आहोत.
बाटा कंपनीचे उभारणी व त्यामागील कहाणी
बाटा हा ब्रँड शूज किंवा चप्पल निर्मितीमधील खूप प्रसिद्ध असा ब्रांड असून अनेक प्रकारचे उतार चढाव या ब्रँडने आजपर्यंत पाहिलेले आहेत. अनेकदा ही कंपनी बंद होईल की काय अशी स्थिती निर्माण झालेली होती. परंतु अनेक प्रकारच्या अडचणींवर मात करत ही कंपनी जिद्दीने उभी राहिली. आज जर आपण विचार केला तर मध्यमवर्गीय भारतीयांच्या मनामध्ये या कंपनीने एक स्थान निर्माण केलेले आहे. बाटा कंपनीची सुरुवात मुळात झेकोस्लोव्हाकिया या ठिकाणी 1894 मध्ये थॉमस बाटा यांनी केली.गरीब कुटुंबामध्ये जन्म घेतलेले थॉमस बाटा यांचे कुटुंब बूट बनवण्याचे काम करायचे.
कालांतराने त्यांच्या व्यवसायात वाढ होत गेली व त्यांनी कर्ज घेतले व व्यवसायाचा विस्तार मोठ्या प्रमाणावर केला. परंतु कालांतराने धंद्यात तोटा आला व व्यवसाय बंद पडला. व्यवसाय वाढीकरिता जे काही कर्ज घेतलेले होते ते देखील फेडणे अशक्य झाले व परिस्थिती त्यामुळे अधिकच गंभीर बनली व या सगळ्या स्थितीमुळे कंपनीला दिवाळखोर म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतरच्या कालावधीमध्ये थॉमस बाटा इंग्लंडला आले व त्यांनी एका शु कंपनीमध्ये नोकरी करायला सुरुवात केली.
परंतु या ठिकाणी नोकरी करत असताना शूज तयार करण्याकरिता कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते त्या त्यांनी शिकल्या व आत्मसात देखील केल्या. त्यानंतर मायदेशी परत आले व हा व्यवसाय पुन्हा सुरू केला. नंतर हळूहळू व्यवसायाला यशाच्या दिशेने नेत त्यांनी व्यापार वाढवला व इतर देशांमध्ये देखील बाटाचे स्टोअर सुरू केली. स्टेप बाय स्टेप व्यवसाय वाढवत त्यांनी 1925 या वर्षापर्यंत संपूर्ण जगात 122 ठिकाणी शाखा सुरू केल्या.
बाटा यांनी शूजच नाही तर मोजे आणि टायर बनवायला देखील सुरुवात केली व पाहता पाहता ही कंपनी बाटा समूहामध्ये रूपांतरित झाली.जर आपण भारतातील बाटाची कहानी पाहिली तर ती अतिशय रंजक आहे व ती म्हणजे 1920 च्या दशकामध्ये थॉमस बाटा भारतामध्ये आलेले होते व या दौऱ्या दरम्यान त्यांनी अनेक भारतीयांना अनवाणी पायाने चालताना पाहिले. भारतीयांना अनवाणी पायाने चालताना त्यांना कल्पना सुचली व त्यांनी यामध्ये व्यापाराची संधी मोठ्या प्रमाणात आहे हे ओळखले.
त्यानंतर त्यांनी 1931 यावर्षी बाटा शु कंपनी प्रायव्हेट लिमिटेड ची सुरुवात भारतात केली. परंतु त्यानंतर मात्र पुढच्याच वर्षी म्हणजेच 1932 मध्ये थॉमस बाटा यांचे निधन झाले व त्यांच्यानंतर बाटा कंपनीची संपूर्ण जबाबदारी त्यांचे भाऊ झेन अँटोनीन बाटा यांनी घेतली. भारतामध्ये बाटाला खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी 1937 यावर्षी कलकत्त्यामध्ये मोठ्या कंपनीची स्थापना केली व आज भारतामध्ये 1500 पेक्षा जास्त ब्रांचेस बाटाचे आहेत.
भारतामध्ये बाटा हा एक भारतीय ब्रँड म्हणून ओळखला जातो. कुठलाही भारतीय अगदी सहजपणे बाटा हे नाव बोलू शकतो त्यामुळे हा ब्रँड खूप लवकर लोकांच्या पचनी पडला. आज जर भारतामध्ये बाटाचा व्यापार पाहिला तर जवळपास 30000 रिटेल दुकानांमध्ये बाटाचे शूज आणि चप्पल विकले जातात. अशा पद्धतीने बाटा या सर्वोत्तम ब्रांडची उभारणी झाली.