राजेश मेहता आहेत देशातील सर्वात मोठे सोन्याचे व्यापारी! वाचा 10 हजार रुपये ते 13 हजार कोटी रुपयांपर्यंतच्या व्यवसायाचा प्रवास

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तुम्ही कुठल्याही व्यवसायामध्ये गेलात किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली तर सुरुवातीला तुम्हाला कधीच मोठ्या प्रमाणामध्ये किंवा विस्तारित स्वरूपात सुरुवात करता येत नाही. कधीही सुरुवात ही छोट्या पद्धतीने करावी लागते व कालांतराने ती अखंड प्रयत्न आणि जिद्दीने वाढवावी लागते.

व्यवसायाच्या वाढीमध्ये आपल्याला संबंधित व्यवसायाची संपूर्ण माहिती तसेच व्यवसाय वाढीसाठी आवश्यक बाबी, तसेच सातत्याने प्रयत्न करण्याची क्षमता आणि व्यवसाय वाढवण्यासाठी लागणाऱ्या प्लानिंग असणे खूप गरजेचे असते. कुठलाही व्यक्ती किंवा कुठलाही बिझनेस मॅन एका रात्रीत करोडपती होत नाही. करोडपती होण्याचा मार्ग हा संघर्षातून आणि अखंड मेहनतीतून जातो हे तेवढेच खरे आहे.

आपल्याला भारतात अनेक क्षेत्रातील नामवंत उद्योजकांबद्दल सांगता येईल की त्यांनी सुरुवात केली अगदी छोट्याशा स्वरूपामध्ये परंतु आज त्यांचे व्यवसाय काही हजार कोटीच्या घरात जाऊन पोहोचलेले आहेत. असे अनेक व्यावसायिक आणि उद्योगपती हे आज चर्चा तरुणांसाठी खूप मोठे प्रेरणास्थान आहेत व असेच एक प्रेरणास्थान म्हणून आपण सोने व्यवसाय क्षेत्रातील राजेश मेहता यांच्याकडे पाहू शकतो.

 असा झाला राजेश मेहता यांचा प्रवास

भारतामध्ये सोन्याचा व्यवसाय पाहिला तर तो मोठ्या प्रमाणावर असून या सोन्याच्या व्यवसायामधीलच एक प्रसिद्ध नाव म्हणजे राजेश मेहता हे होय. आज त्यांना देशातील सर्वात मोठे सोन्याचे व्यापारी म्हणून ओळखले जाते. परंतु ही ओळख होण्यामागील जर आपण परिस्थिती पाहिली तर ती खूप संघर्षांनी भरलेली आहे. राजेश मेहता यांनी अवघ्या दहा हजार रुपयांपासून हा व्यवसाय सुरू केला व आज  13000 कोटींच्या पुढे त्यांचा व्यवसाय जाऊन पोहोचला आहे.

जर आपण त्यांच्या लहानपणीचा विचार केला तर लहानपणी जसे प्रत्येक मुलांमध्ये मोठेपणी काहीतरी होण्याची इच्छा असते किंवा स्वप्न असतात अगदी त्याच पद्धतीने त्यांना देखील आपण डॉक्टर व्हावं हे स्वप्न अगदी लहानपणापासूनच होतं. परंतु नशिबामध्ये काहीतरी वेगळेच लिहून ठेवलेलं होतं व त्या दृष्टिकोनातून सगळे प्रसंग घडत गेले.

राजेश मेहता हे मूळचे गुजरातचे असून त्यांचे शिक्षण मात्र बेंगलोर या ठिकाणी झाले. राजेश मेहता यांचे वडील जसवंतरी मेहता यांचा देखील दागिन्यांचा व्यवसाय होता व त्याकरिता ते कर्नाटकामध्ये आलेले होते. राजेश मेहता यांचे शिक्षण सुरू असताना वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी राजेश यांनी त्यांच्या वडिलांसोबत दागिन्यांच्या व्यवसायामध्ये काम करायला सुरुवात केली. हा त्यांचा कौटुंबिक व्यवसाय होता व हा व्यवसाय वाढावा याकरिता राजेश यांनी त्यांच्या मोठ्या भावाला साथ दिली व दोघं मिळून व्यवसाय वाढीसाठी काम करायला सुरुवात केली.

या पार्श्वभूमीवर व्यवसायामध्ये काहीतरी मोठे करायचे या उद्देशाने राजेश मेहता यांनी त्यांच्या भावाकडून दोन हजार रुपये घेतले  व बँकेकडून 8000 रुपयांचे कर्ज असे मिळून दहा हजार रुपये जमवले व 1982 मध्ये अशापद्धतीने पैसे उसने घेऊन त्यांनी सोन्याचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायामध्ये सुरुवातीला ते चेन्नई या ठिकाणाहून सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करायचे व गुजरात मधील राजकोट या ठिकाणी विकायचे.

सुरुवातीला अगदी छोट्याशा प्रमाणामध्ये हा व्यवसाय त्यांनी सुरू केला व हळूहळू यामध्ये यश मिळू लागल्यानंतर त्यांनी गुजरात राज्यातील घाऊक विक्रेत्यांना सोन्याची दागिने विकण्याचे काम सुरू केले. हळूहळू व्यवसायात वाढ करत असताना त्यांनी मागे वळून पाहिले नाही व हा व्यवसाय त्यांनी बंगलोर, हैदराबाद असे चेन्नई या ठिकाणी वाढवला. अशा पद्धतीने व्यवसाय सुरू असताना त्यांनी 1989 मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या व्यवसायात प्रवेश केला व या ठिकाणीच त्यांच्या व्यवसायाचा टर्निंग पॉईंट ठरला.

छोट्याशा गॅरेज मधून सोन्याचे दागिने तयार करण्याचे युनिट त्यांनी  बेंगलोर या ठिकाणी सुरू केले व त्या ठिकाणी तयार दागिने त्यांनी ब्रिटन तसेच दुबई, ओमान, अमेरिका तसेच कुवेत आणि युरोपमध्ये निर्यात करायला सुरुवात केली. आज ते राजेश एक्सपोर्टचे मालक आणि कार्यकारी अध्यक्ष असून ही कंपनी सोन्याचे प्रॉडक्ट तयार करते व त्या सगळ्या उत्पादनांची निर्यात करते. या कंपनीच्या माध्यमातून सोन्याची दागिने तसेच सोन्याची पदके आणि नाणी तयार केली जातात.

म्हणजे राजेश मेहता यांच्या राजेश एक्सपोर्ट लिमिटेड या उत्पादन युनिटची जर आपण उत्पादनक्षमता पाहिली तर ती प्रतिवर्षी 400 टन सोन्याचे उत्पादन इतके आहे. स्टॉक मार्केटमध्ये त्यांची कंपनी लिस्टेड असून या कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप 138.18 बिलियन म्हणजेच 13800 कोटी रुपये आहे. एवढेच नाही तर भारतामध्ये आणि भारताबाहेर स्वित्झर्लंड या ठिकाणी त्यांचे गोल्ड रिफायनरी देखील आहे.

अशा पद्धतीने राजेश मेहता यांच्या उदाहरणावरून दिसून येते की व्यवसायाची सुरुवात अगदी छोट्या प्रमाणात करून कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर व्यवसाय कोटीच्या घरात पोहोचवता येतो.