अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी नोकरीच्या शोधात असतात व वेगवेगळ्या भरती तसेच त्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या परीक्षांची तयारी करण्यामध्ये तासंतास अभ्यास करताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळे तुम्ही देखील अशाच प्रकारे सरकारी नोकरीच्या शोधात असाल किंवा बँकिंग क्षेत्राच्या भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक खूप सुवर्णसंधी चालून आली असून अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये बंपर भरती जाहीर करण्यात आलेली असून या भरतीमध्ये अगदी दहावी पास असलेले उमेदवार ते पदवीधरांना यामध्ये अर्ज करता येणे शक्य आहे.
त्यामुळे चालून आलेल्या या सुवर्णसंधीचा लाभ घेणे खूप गरजेचे आहे. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणारी ही भरती तब्बल सातशे रिक्त जागांसाठी जाहीर करण्यात आलेली आहे व या भरती करिता जे उमेदवार इच्छुक व पात्र असतील ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत होत आहे 700 जागांसाठी भरती
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सातशे वेगवेगळ्या प्रकारच्या रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली असून यामध्ये दहावी पास ते पदवीधर उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे तारखेपूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे.
पदनिहाय रिक्त जागांची संख्या
1- लिपिक पदाच्या एकूण 687 जागांसाठी होणार भरती
2- वाहनचालक पदाच्या एकूण रिक्त जागा चार आहेत.
3- सुरक्षा रक्षक पदाच्या एकूण रिक्त जागा पाच आहेत.
4- जनरल मॅनेजर( संगणक) पदाच्या एकूण रिक्त जागा एक आहे.
5- मॅनेजर( संगणक) पदाच्या एकूण रिक्त जागा एक आहे.
6- डेप्युटी मॅनेजर( संगणक) पदाच्या एकूण रिक्त जागा एक आहे.
7- इन्चार्ज प्रथम श्रेणी पदाच्या एकूण रिक्त जागा एक आहे.
पदनिहाय आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे?
1- लिपिक पदासाठी– 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आणि एमएससीआयटी किंवा समतुल्य अभ्यासक्रम
2- वाहन चालक पदासाठी– दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे असून हलके वाहन चालवण्याचा परवाना असावा. तीन वर्षाचा अनुभव आवश्यक
3- सुरक्षा रक्षक पदासाठी– कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा आर्मी रिटायर्ड
4- जनरल मॅनेजर( संगणक) पदासाठी– 60% गुणांसह बीई/ बी टेक( कम्प्युटर सायन्स/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स) एमसीए/ एमसीएस/ एमई( कम्प्युटर सायन्स/ आयटी) व बारा वर्षाचा अनुभव आवश्यक
5- मॅनेजर( संगणक) पदासाठी– 60 टक्के गुणांसह बीई/ बीटेक( कम्प्युटर सायन्स/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स) एमसीए/ एमसीएस व दहा वर्षाचा अनुभव आवश्यक
6- डेप्युटी मॅनेजर( संगणक) पदासाठी– 60 टक्के गुणांसह बीई/ बी टेक( कम्प्युटर सायन्स/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स) एमसीए/ एमसीएस व आठ वर्षाचा कामाचा अनुभव
7- इन्चार्ज प्रथम श्रेणी पदासाठी– 60 टक्के गुणांसह बीई/ बी टेक( कम्प्युटर सायन्स / आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स) एमसीए/ एमसीएस व तीन वर्षाचा कामाचा अनुभव
या भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून ज्या काही सातशे रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून या भरतीमध्ये ज्या इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्या अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 12 सप्टेंबर 2024 रोजी 21 ते 45 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे.
किती लागेल परीक्षा शुल्क?
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या भरतीसाठी परीक्षा शुल्क आकारण्यात आले असून यामध्ये….
1- लिपिक, वाहन चालक आणि सुरक्षा रक्षक या पदांसाठी जे उमेदवार अर्ज करतील त्यांना 696 रुपये इतके परीक्षा फी भरावी लागेल.
2- जनरल मॅनेजर( संगणक), मॅनेजर( संगणक), डेप्युटी मॅनेजर( संगणक) आणि इन्चार्ज प्रथम श्रेणी या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 885 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल.
या भरतीमध्ये जे उमेदवार निवडले जातील त्यांचे नोकरीचे ठिकाण हे अहमदनगर असणार आहे.