अंबानी है तो मुमकिन है ! रिलायन्सच्या शेअर्समध्ये होणार ‘इतकी’ विक्रमी वाढ, गुंतवणूकदार बनणार मालामाल, कोण म्हणतय असं? पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Reliance Share Market : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आजची बातमी विशेष खास राहणार आहे. विशेषतः रिलायन्स इंडस्ट्री मध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण की रिलायन्स इंडस्ट्रीने म्हणजे RIL ने आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत तब्बल १९२९९ कोटी रुपयांचा नफा कमवला आहे. विशेष म्हणजे काही ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे भाकीत व्यक्त केलं आहे. खरं पाहता, शेअर बाजारात अमेरिकेत आलेले बँकिंग संकट आणि इतर काही जागतिक कारणामुळे मोठी उलथापालथ सुरु आहे.

अनेक कंपन्यांचे शेअर्स कमी झाले आहेत. विशेषता, आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. अन्य सेक्टरच्या कंपन्या देखील मोठ्या प्रभावीत झाल्या असून अनेक गुंतवणूकदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र आर आय एल येत्या काही दिवसात आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणार असल्याचा दावा केला जात आहे. याबाबत काही ब्रोकरेज फर्म्सकडून माहिती देण्यात आली आहे.

हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ जिल्हा परिषदेत 612 रिक्त पदांसाठी होणार भरती; वाचा सविस्तर

किती वाढणार शेअर?

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ब्रोकरेज हाऊस जेफरीज यांनी RIL शेअर्सला ‘बाय’ रेटिंग दिले आहे. या ब्रोकरेज हाऊसने हा शेअर ३,१२५ रुपयांवर जाऊ शकतो असा दावा केला आहे.

तसेच ब्रोकरेज हाऊस जेपी मॉर्गनने देखील या शेअरच्या किमती वाढू शकतात असं मत व्यक्त केल आहे. RIL चा शेअर २९६० रुपयापर्यंत जाऊ शकतो अशी आशा या ब्रोकरेज हाऊस ने व्यक्त केली आहे. या शेअरला जेपी मॉर्गन ब्रोकरेज हाऊसने बाय रेटिंग दिले आहे.

याशिवाय, ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांनी देखील RIL च्या बाबतीत मोठे भाकीत वर्तवले आहे. तसेच कंपनी आगामी काळात चांगली कामगिरी करणार अशी आशा या ब्रोकरेज हाऊसने व्यक्त केले असून या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. 

हे पण वाचा :- काय सांगता ! ‘या’ कंपनीच्या स्टॉकने फक्त 3 वर्षात दिले 1000 टक्क्यांहुन अधिकचे रिटर्न, गुंतवणूकदार बनलेत मालामाल, पहा….

या ब्रोकरेज हाऊसच्या मते RIL चे शेअर्स २८०० रुपयांपर्यंत जाऊ शकतात. अर्थातच सध्या असलेल्या शेअरपेक्षा 19 टक्के अधिक वाढ या शेअर्समध्ये होऊ शकते अशी आशा या ब्रोकरेज हाऊस ने व्यक्त केली आहे. निश्चितच या तिन्ही ब्रोकरेज हाऊस ने व्यक्त केलेला अंदाज जर खरा ठरला तर रिलायन्स मध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार मालामाल होणार आहेत.

मित्रांनो शेअर मार्केट हे जोखीम पूर्ण क्षेत्र आहे. यामुळे येथे दिलेली माहिती ही केवळ शेअरच्या परफॉर्मन्स बाबत अवगत करण्यासाठी आम्ही दिली आहे. म्हणून शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेणे गरजेचे राहणार आहे. 

हे पण वाचा :- अहो शेठ तुम्ही नादच केलाय थेट ! प्रगतिशील शेतकऱ्याने ‘या’ फळाच्या अवघ्या 30 झाडामधून कमवलेत लाखों रुपये, वाचा ही यशोगाथा