Reverse Waterfalls: चला या पावसाळ्यात पटकन ट्रीप प्लान करा आणि जुन्नर तालुक्यातील ‘या’ अनोख्या धबधब्याला भेट द्या, वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Reverse Waterfalls:- मराठवाड्यातील औरंगाबाद आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यांना अनेक ऐतिहासिक परंपरा लाभले असून नैसर्गिक संपदा देखील मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यांमध्ये आहे. महाराष्ट्राचा कोकण किनारपट्टीचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जितके महत्त्व आहे. तितकेच महत्त्व पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक स्थळांना देखील आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये असलेल्या डोंगररांगा आणि पावसाळ्यामध्ये या डोंगर रांगांचे खुलून दिसणारे रूप पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करतात.

तसेच या ठिकाणी डोंगर रांगातून खळाळून वाहणाऱ्या नद्या आणि धबधबे पाहून मन मोहित होते. त्यामुळे पावसाळ्यात जर कुठे फिरायला जाण्याचा प्लान असेल तर तुम्ही पुणे जिल्ह्याचा विचार करू शकतात. याच अनुषंगाने आपण पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या अशाच एका आगळ्यावेगळ्या धबधब्याबद्दल या लेखात माहिती घेणार आहोत.

 जुन्नर तालुक्यात आहे हा आगळावेगळा धबधबा

महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी असलेला पुणे जिल्हा हा पर्यटनासाठी देखील ओळखला जातो. पुणे जिल्ह्यात असलेल्या जुन्नर तालुक्यातील जीवनधन नाणेघाट परिसरातील रिव्हर्स धबधबा हा पर्यटकांचा एक आकर्षणाचा प्रमुख केंद्रबिंदू असून पावसाळ्यामध्ये या धबधब्याचे रूप हे अधिक खुलून दिसते. सध्या गेल्या काही दिवसांपासून घाटमाथ्यावर जोरदार पाऊसाने हजेरी लावल्यामुळे रिव्हर्स धबधबा आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

या धबधब्याचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा महाराष्ट्राचे हृदय असलेल्या सह्याद्रीच्या डोंगरदर्‍यातून वाहतो. रिव्हर्स धबधबा हा एक निसर्गाची देण असून  पर्यटकांना अद्भुत आनंद या धबधब्याला पाहून मिळतो. पुणे जिल्ह्यामध्ये असलेले अनेक धबधबे आता होत असलेल्या पावसामुळे ओसंडून वाहत आहे.

त्या सगळ्या धबधब्यांपैकी रिव्हर्स धबधबा हा एक आहे. हा धबधबा अगदी उंचावरून कोसळतो व या धबधब्याच्या पाण्याला सोसायट्यांचा वारा पुन्हा वरच्या बाजूने ढकलतो म्हणूनच याला रिव्हर्स अर्थात उलटा धबधबा असे म्हटले जाते. निसर्गाचा हा एक अद्भुत चमत्कार असून हा चमत्कार पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी पर्यटक गर्दी करत असतात. त्यामुळे हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार तुम्हाला देखील अनुभवायचा असेल तर तुम्ही नक्कीच रिव्हर्स धबधबा पाहण्यासाठी ट्रीप प्लान करू शकतात.