गुलाब शेतीने शेतकऱ्याच्या आयुष्यात दरवळला सुगंध; 10 गुंठ्यात झाली लाखोंची कमाई, पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rose Farming Maharashtra : गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना सातत्याने नुकसान सहन करावे लागत आहे. निसर्गाचा लहरीपणा तसेच शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर यामुळे बळीराजा आता हतबल झाला आहे. कृषी निविष्ठांच्या किमती दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालत आहेत. अशा परिस्थितीत आता पारंपारिक पिकांची शेती शेतकऱ्यांसाठी परवडणारी राहिलेली नाही.

पारंपारिक पिकातून मिळणारे कवडीमोल उत्पादन आणि शेतमालाला बाजारात अपेक्षित असा दर मिळत नसल्याने आता शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकाला बगल देण्यास सुरुवात केली आहे. आता शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या नगदी पिकांची शेती सुरू केली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या कळस येथील धनंजय मोहोळकर यांनी देखील शेतीमध्ये बदल केला आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ! पंजाब डख यांनी ‘या’ जिल्ह्यात वर्तवली मुसळधार पावसाची शक्यता, पहा….

धनंजय यांनी पारंपारिक पिकांना बगल देत गुलाब शेतीतून चांगली कमाई करून दाखवली आहे. विशेष म्हणजे मात्र दहा गुंठ्यात त्यानी गुलाब लागवड केली असून आता गुलाब शेतीतून त्यांना खर्च वजा करता दर आठवड्याला 7000 पर्यंतचे उत्पन्न मिळत आहे. यामुळे त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला असून त्यांच्या प्रयोगाचे परिसरात कौतुक केले जात आहे.

मोहोळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात गुलाबाची लागवड केली. चार फूट अंतरावर दोन फुटाचा पट्टा तयार करून त्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट आणि कंपोस्ट खत मिक्स करून वरंबा तयार केला. यानंतर मग ठिबक टाकले. नंतर ठिबकने पाणी देऊन वरंबा ओले केले. मग अडीच फुटावर गुलाबाच्या कलमांची लागवड केली. त्यांनी ग्लॅडिएटर या वाणाचे गुलाब लावले आहे.

हे पण वाचा :- मुंबईमधील चाकरमान्यांसाठी खुशखबर ! ‘या’ एक्सप्रेस ट्रेनबाबत रेल्वे प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, आता…..

दहा गुंठ्यात जवळपास 800 गुलाबांची कलमे त्यांनी लावली आहेत. गुलाबाच्या पिकाला दर आठ दिवसात कीटकनाशकांची फवारणी केली जाते. विशेष बाब म्हणजे ते मजूर लावत नाहीत तर त्यांचा परिवार गुलाब शेतीमध्ये मेहनत घेत आहे. यामुळे त्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. एका दिवसाआड सध्या 200 डझन पर्यंत गुलाबाचे उत्पादन त्यांना मिळत आहे.

त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना गुलाब शेतीसाठी 20 हजाराचा खर्च आला आहे. यामध्ये त्यांना दर महिन्याला पंधरा तोडे मिळतात. प्रत्येक तोड्याला 80 डझन फुलांचे उत्पादन होत असून 18 ते 20 रुपये असा दर सध्या मिळत आहे. यामुळे त्यांना गुलाब शेतीतून चांगली कमाई होत असून दर आठवड्याला 7000 पर्यंतचे निव्वळ उत्पन्न त्यांना मिळत आहे.

हे पण वाचा :- मुंबईमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! MMRDA मध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती, वाचा याविषयी सविस्तर