खरं काय ! समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमणेचा महत्त्वाचा टप्पा यावर्षी नाही तर पुढल्या वर्षी ‘या’ महिन्यात होणार सूरू, वाचा….
Samruddhi Mahamarg : मुंबई आणि नागपूर या दोन शहरांना थेट जोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून समृद्धी महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे.
हा महामार्ग विदर्भाच्या तसेच संपूर्ण महाराष्ट्राच्या एकात्मिक विकासासाठी मोलाची भूमिका निभावणार असल्याचे मत तज्ञांनी देखील व्यक्त केले आहे. यामुळे हा महामार्ग लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न शासनाकडून केले जात आहेत. शिवाय पुढल्या वर्षी राज्यात विधानसभा निवडणूका आणि लोकसभा निवडणुका राहणार आहेत.
यामुळे मतदानापूर्वीच हा महामार्ग सामान्य जनतेसाठी खुला करून विकास कामे लोकांच्या पुढ्यात ठेवण्याचा प्रयत्न शासनाचा आहे. या पार्श्वभूमीवर या महामार्गाचा पहिला टप्पा अर्थातच नागपूर ते शिर्डी हा डिसेंबर 2022 मध्ये प्रवाशांसाठी सुरू करण्यात आला आहे. हा 520 किलोमीटरचा टप्पा सुरू झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी चा प्रवास जलद झाला आहे.
हे पण वाचा :- देशातील ‘या’ भागात 26 मे पर्यंत वळवाचा पाऊस पडणार ! महाराष्ट्रात गारपीटीची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा इशारा
दरम्यान आता या महामार्गाचा शिर्डी ते भरवीर पर्यंतचा टप्पा 26 मे 2023 रोजी अर्थातच येत्या शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रवाशांसाठी सुरू केला जाणार आहे. हा ८० किलोमीटरचा टप्पा सुरू झाल्यानंतर समृद्धी महामार्गाचा 600 km चा भाग प्रवाशांसाठी खुला होणार असून यामुळे नागपूर ते भरवीर पर्यंतचा प्रवास सुसाट होण्यास मदत मिळणार आहे.
विशेष म्हणजे भरवीर ते इगतपुरी या टप्प्याचे देखील युद्ध पातळीवर काम सुरू असून हा टप्पा देखील नियोजित वेळेत म्हणजे सप्टेंबर ते ऑक्टोबर पर्यंत प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे. मात्र डिसेंबर 2023 पर्यंत इगतपुरी ते आमने हा समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा सुरू करण्याचा राज्य रस्ते विकास महामंडळाचा दावा फोल ठरणार असल्याचे चित्र आहे.
कारण की, या टप्प्याचे काम या वर्षाखेपर्यंत होणार नसल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक शेवटच्या टप्प्या अंतर्गत एकूण 12 बोगदे तयार केले जाणार आहेत. यातील एक बोगदा हा जवळपास आठ किलोमीटर लांबीचा आहे. तसेच इतर अकरा बोगदे हे जवळपास प्रत्येकी एक किलोमीटर अंतराचे आहेत.
हे पण वाचा :- विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक ! शाळा सोडल्याचा दाखला नसला तरीही विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळणार; पण….
हे सर्व बोगदे कसारा घाटातून जाणारे असून यामुळे कसारा घाटातील प्रवास मात्र पाच ते सहा मिनिटात होणार आहे. पण हे बोगदे तयार करण्याचे काम मोठे आव्हानात्मक आहे तसेच या टप्प्यात 16 व्हायडकटं म्हणजे उंच पूल देखील तयार होणार आहेत. याचेही काम मोठे आव्हानात्मक आहे. म्हणून हे काम डिसेंबर अखेर होणार नसल्याचे चित्र आहे.
परंतु हे काम पुढल्या वर्षी मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होईल अशी शक्यता अधिकाऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे.अर्थातच संपूर्ण समृद्धी महामार्ग आता मार्च 2024 पर्यंत प्रवाशांसाठी खुला होणार असल्याचे चित्र आहे.
एकंदरीत जो महामार्ग डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल असा दावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून केला जात होता तो आता फोल ठरला असून हा महामार्ग पूर्ण होण्यासाठी मार्च 2024 पर्यंतची वाट नागरिकांना पहावी लागणार आहे.
मात्र हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते नागपूर हा प्रवास फक्त आठ तासात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. यामुळे मुंबई ते नागपूरचा प्रवास तर सुसाट होणारच आहे शिवाय विदर्भाची कनेक्टिव्हिटी पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईसोबत वाढणार आहे.
हे पण वाचा :- शेवटी तारीख जाहीर झालीच; ‘या’ तारखेला लागणार महाराष्ट्र बोर्डाचा 12वी चा निकाल, SMS करूनही पाहता येणार निकाल, वाचा….