महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी हिल स्टेशन असून पावसाळ्यामध्ये फिरण्यासाठी ही ठिकाणे खूप निसर्ग सौंदर्याने नटलेली असतात. या ठिकाणचे आल्हादायक वातावरण मनामध्ये एक गारवा निर्माण करते. तसे पाहायला गेले तर संपूर्ण भारतामध्येच अनेक निसर्ग स्थळे असून पर्यटनच्या दृष्टिकोनातून समृद्ध आहेत. अगदी याच पद्धतीने गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेले एक महत्त्वाचे हील स्टेशन म्हणजे सापुतारा होय.
या ठिकाणी आणि आजूबाजूला अनेक प्रेक्षणीय स्थळे असून ड्रायव्हिंग साठी असलेले मोकळे रस्ते व या ठिकाणचे असलेले हवामान व हिरवीगार झाडी आणि सुंदर अशी धबधबे मनाला मोहित करतात. या ठिकाणी प्राणी उद्यान तर आहेतच परंतु आजूबाजूला धार्मिक स्थळे देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. तसेच डोंगराळ भागांमध्ये काही ऐतिहासिक वास्तू देखील तुम्हाला बघायला मिळतात ज्या खूप प्राचीन काळाच्या आहेत. सापुतारा मध्ये भेट देता येतील अशी पाच महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती आपण घेणार आहोत.
सापुतारा मध्ये भेट देता येण्यासारखी पाच महत्त्वाचे ठिकाणे
1- हतगड किल्ला– सापुताऱ्यापासून साधारणपणे पाच किलोमीटर अंतरावर हा किल्ला गुजरात आणि महाराष्ट्राचा सीमेवर आहे. जवळजवळ 3600 फूट उंचीवर बसलेला असून छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला बांधले होते. किल्ल्यावर जाण्यासाठी खडकाळप्रदेशातून चालत जायला लागते. या किल्ल्याच्या मध्यभागी गणेशाची मूर्ती असून शिखरावरून तुम्हाला सुरगाणा या सुंदर गावाचे दृश्य देखील दिसते. ठिकाणी जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर ती तुम्ही सकाळी साडे आठ ते संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान देऊ शकतात.
2- शबरीधाम– शबरीधाम हे धार्मिक स्थळ अहवा रोडवर असून या मंदिरामध्ये भगवान श्रीराम हे शबरी या आदिवासी समाजातील त्यांच्या भक्ताला भेटले होते. त्या रामाच्या कट्टर भक्त होत्या. 2006 मध्ये हे शबरीधाम बांधण्यात आलेले असून या ठिकाणी तीन दगड असून त्यांना राम आणि लक्ष्मण आणि शबरी असे शेजारी बसले आहेत असे दर्शवतात. हे ठिकाण देखील सापुताराच्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक असून सापुतारा पासून जवळजवळ ते 71 किलोमीटरच्या आसपास आहे.
3- सनसेट पॉईंट– या ठिकाणी मावळत्या सूर्याचे चित्त थरारक आणि विलोभनीय दृश्य बघायला मिळते. उन्हाळ्यामध्ये भेट देण्यासाठी हे सापुताऱ्यातील लोकप्रिय ठिकाण आहे. या ठिकाणी व्हॅनिटी रोपवे रिसॉर्ट मधून रोपवेने शिखरावर जाता येते आणि ते डोंगरी शहराच्या अगदी जवळ आहे. या ठिकाणी तुम्हाला पायी देखील जाता येते. या ठिकाणी चालत जात असताना तुम्ही जेव्हा माथ्यावर जातात तेव्हा तुम्हाला आजूबाजूची हिरवीगार झाडे आणि धबधबे घालतात. याचे अंतर सापुतारा बस स्थानकापासून दोन किलोमीटर आहे.
4- गिरा फॉल्स– गिरा फॉल्स हे वाघाई ते सापुतारा या राज्य मार्गावर असून वाघाई जवळ आहे. हे सापुताराच्या प्रमुख ठिकाणांपैकी एक महत्त्वाचे ठिकाण असून पावसाळ्यामध्ये धबधबे पाण्याचे सर्वात मोठी संधी या ठिकाणी असते. जर तुम्हाला एखाद्या धबधब्याजवळ पिकनिकला जायची इच्छा असेल तर गिरी फॉल्स हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम ठरू शकते. या ठिकाणी तुम्ही जुलै ते ऑक्टोबर या दरम्यान जाऊ शकतात. सापुताऱ्याच्या जवळजवळ 89 किलोमीटर अंतरावर गिरा फॉल्स आहे.
5- वासंदा राष्ट्रीय उद्यान– गुजरात राज्यातील वासंदा तहसील कार्यालयाच्या अंतर्गत येणारे वासंदा नॅशनल पार्क खूप महत्त्वाचे आहे. पक्षी निरीक्षणासाठी हे सापुतारातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी तुम्हाला मोठ्या प्रमाणावर वनस्पती आणि वन्यजीवांमध्ये विविधता दिसून येते. याठिकाणहुन तुम्हाला सह्याद्रीच्या पर्वतरांगा संपूर्णपणे दिसतात. याचे अंतर सापुताऱ्यापासून 52 किलोमीटर आहे.
सापुताऱ्याला कसे जावे?
सापुतारा ला जाण्यासाठी तुम्हाला विमान मार्ग जायचे असेल तर सुरत आणि नाशिक हे दोन विमानतळ जवळ आहेत. जवळपास 120 किलोमीटर अंतरावर सुरत विमानतळ असून तेवढ्याच अंतरावर नाशिक विमानतळ देखील आहे. मुंबई विमानतळाचे अंतर सापुतारापासून जवळपास 250 किलोमीटर आहे.
विमानतळांवरून तुम्ही सहजपणे बसने सापुताऱ्याला जाऊ शकतात. तसेच तुम्हाला रेल्वेने जायचे असेल तर गुजरात राज्यातील बिलीमोरा हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन 50 किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण अनेक नियमित गाड्यांच्या माध्यमातून गुजरात आणि महाराष्ट्राची जोडण्यात आलेली आहे. तसेच सापुतारा या शहरापासून 52 किलोमीटर अंतरावर बिल्लीमोरा आणि वाघाई दरम्यान एक गेजची रेल्वे लाईन देखील आहे. तुम्हाला रस्ते मार्गाने नाशिक, पुणे तसेच अहमदाबाद आणि मुंबईवरून देखील आरामात सापुताऱ्याला जाता येते.