भारतामध्ये ज्योतिषशास्त्राला खूप महत्त्व असून ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या ग्रह तारे तसेच वेगवेगळ्या राशींवर पडणारा नकारात्मक किंवा सकारात्मक परिणाम इत्यादी गोष्टींचा अभ्यास किंवा माहिती ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून केली जाते व अशी महत्त्वाची माहिती आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातूनच मिळत असते. ग्रहांच्या बाबतीत जर बघितले तर सर्व ग्रहांमध्ये शनिदेव व शनी हा ग्रह खूप महत्त्वाचा मानला जातो.
शनि देवाला न्याय देवता म्हटले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार जर आपण बघितले तर सर्व ग्रह गोचर करत असतात व यानुसार ग्रहांच्या गोचराचे परिणाम राशीवर दिसून येतात. कर्माची देवता म्हणून प्रसिद्ध असलेले शनिदेव देखील गोचर करत असतात व त्यामुळे काही राशींवर त्याचे चांगले तर काही राशीवर वाईट परिणाम आपल्याला पाहायला मिळतात.

आपल्याला माहित आहे की शनि देवांची कृपा झाली तर गरिबीतून व्यक्ती श्रीमंत देखील होऊ शकते. मात्र जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनि देवता जर अशुभ स्थितीत असेल तर मात्र अशा व्यक्तीच्या आयुष्यात संकटांची मालिकाच सुरू होते.
याउलट जर शनी शुभ स्थानी असेल तर मात्र नशीब उजळायला वेळ लागत नाही. ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर बारा राशींपैकी चार राशी अशा आहेत की ज्यांच्यावर शनिची कृपा खूप मोठ्या प्रमाणावर असते व अशा राशी शनि देवाच्या कृपे छायेखाली असल्याने खूप फायदा होतो.
या राशींवर असते शनि देवाची विशेष कृपा
1- मकर राशी– ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर मकर राशीचा शासक ग्रह शनी असून यामुळे मकर राशींच्या व्यक्तींवर शनि देवाची विशेष कृपा आपल्याला दिसून येते. शनिदेव हे मकर राशीच्या व्यक्तींच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे सुख देतात. शनिच्या साडेसाती आणि धैय्याच्या कालावधीत देखील शनिदेव हे मकर राशींच्या व्यक्तींना फारसा त्रास देत नाही.
2- तूळ राशी– तूळ राशी ही शनि देवाची सर्वात आवडती राशी म्हणून ओळखली जाते व असे म्हटले जाते की तूळ राशींच्या व्यक्तींवर शनि देवाची खूप मोठ्या प्रमाणावर कृपा असते व या राशींच्या लोकांना शनिदेव दुःख आणि संकट देतच नाहीत.
3- धनु राशी– धनु राशीचा स्वामी ग्रह जर बघितला तर तो गुरु आहे. परंतु ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर शनि आणि गुरू यांच्यात एकमेकांविषयी मैत्रीची भावना असल्याने शनि देवाची धनु राशीच्या व्यक्तींवर नेहमीच कृपा दिसून येते. शनिचा साडेसातीचा कालावधी धनु राशींच्या व्यक्तींवर असेल तर त्यांना शनि देवाच्या माध्यमातून फारसा त्रास दिला जात नाही.
4- कुंभ राशी– कुंभ राशीच्या स्वामीग्रह शनि आहे व यामुळे कुंभ राशींच्या व्यक्तींवर शनि देवाची विशेष कृपा राहते व या राशीचे लोक अतिशय प्रामाणिक व शांत असतात यामुळे शनि देवाची त्यांच्यावर विशेष कृपा असते. विशेष म्हणजे शनिदेवाच्या कृपेमुळे कुंभ राशींच्या व्यक्तींना पैशांची कमतरता जाणवत नाही.
(टीप– वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती वाचकांसाठी माहितीस्तव सादर केलेली आहे. या माहिती विषयी आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा किंवा समर्थन करत नाहीत.)