शेअर मार्केटमध्ये एक सामान्य व्यक्ती किती रुपये गुंतवू शकतो? काय आहेत शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचे सरकारी नियम, पहा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Share Market : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या तमाम गुंतवणूकदारांसाठी आजची ही बातमी विशेष खास राहणार आहे. वास्तविक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या आपल्या देशात मोठी आहे.

अलीकडे बहुतांशी लोक आपली सेविंग दुप्पट करण्यासाठी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत. जे की अनेक लोकांसाठी फायदेशीर देखील ठरत आहे.

मात्र शेअर मार्केट जोखमीने परिपूर्ण आहे, यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना अनेकदा नुकसान देखील सहन करावे लागते. यामुळे गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी चांगला अभ्यास करण्याचा सल्ला दिला जातो.

ज्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करायची आहे त्या स्टॉक संदर्भात सर्व इत्यंभूत माहिती सर्वप्रथम गुंतवणूकदारांनी जाणून घेतली पाहिजे यानंतर आपल्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊन गुंतवणूक केली पाहिजे.

हे पण वाचा :- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! महागाई भत्त्यात होणार ‘इतकी’ वाढ, वित्त विभागाचा प्रस्ताव तयार

जेणेकरून गुंतवणूकदारांना अधिक लॉस सहन करावा लागणार नाही. दरम्यान शेअर मार्केटमध्ये जे नवीन इन्वेस्टर आहेत त्यांना शेअर बाजारात एक सामान्य व्यक्ती किती गुंतवणूक करू शकतो? असा प्रश्न पडलेला असतो. अशा परिस्थितीत आज आपण या प्रश्नाचे उत्तर थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

शेअर मार्केटमध्ये एक सामान्य व्यक्ती आपल्या बँक बॅलन्सनुसार कितीही गुंतवणूक करू शकतो. म्हणजेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची किमान आणि कमाल मर्यादा सरकारने ठरवलेली नाही.

मात्र शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक ही आपल्या बँक बॅलन्स नुसार करावी असा सल्ला दिला जातो. परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे जे लोक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात अशा लोकांवर सेबीची नजर असते.

हे पण वाचा :- पुणे, लातूरकरांसाठी आनंदाची बातमी ! मध्य रेल्वेने सुरु केली ‘ही’ सुपरफास्ट ट्रेन, रूटची ए टू झेड माहिती वाचा इथं

म्हणजे चुकीच्या मार्गाने पैसे जमवलेल्या लोकांकडे सेबीची विशेष नजर असते. जे लोक चुकीचे व्यवहार करतात अशा लोकांवर सेबी लक्ष ठेऊन असते. सामान्य लोक मात्र शेअर मार्केटमध्ये आपल्या बँक बॅलन्स नुसार त्यांना हवी तेवढी रक्कम गुंतवू शकतात.

परंतु शेअर मार्केट मधील गुंतवणूक ही संपूर्णपणे त्या कंपनीच्या व्यवहारावर आधारित असते. यामुळे जर एखादी कंपनी लॉसमध्ये गेली तर गुंतवणूकदारांना देखील फटका बसतो. म्हणून शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यापूर्वी व्यवस्थित अभ्यास आणि वित्तीय सल्लागाराचा सल्ला खूपच महत्त्वाचा ठरतो. 

हे पण वाचा :- बोरिवली-ठाणे दुहेरी बोगद्याचे टेंडर मेघा कंपनीला मिळाले; केव्हा सुरु होणार या भूमिगत मार्गाचे काम, पहा….