शेअर मार्केटमध्ये वयाच्या कितव्या वर्षापासून पैसे गुंतवले जाऊ शकतात? शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा नियम काय, पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Share Market Information : अलीकडे भारतात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शेअर मार्केट मधून मिळणारा परतावा. अनेक लोकांना शेअर मार्केट मधून चांगला परतावा मिळाला असल्याने अलीकडे आपले देखील पैसे दुप्पट व्हावेत, आपल्याला चांगला परतावा मिळावा यासाठी शेअर मार्केट मधील गुंतवणुकीला प्राधान्य दिले जात आहे.

शेअर मार्केट हे जोखीमपूर्ण आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास हमखास परतावा मिळतो असे नाही तर अनेकदा गुंतवणूकदारांना मोठा लॉस देखील सहन करावा लागतो. यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी चांगला अभ्यास करणे आवश्यक असून यासाठी तज्ञ लोकांचे मार्गदर्शन देखील घ्यावे लागणार आहे.

दरम्यान आज आपण शेअर मार्केटमध्ये वयाच्या कितव्या वर्षापासून पैसे गुंतवले जाऊ शकतात या संदर्भात महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. शेअर मार्केटमध्ये नवीन गुंतवणूक करणाऱ्या अनेकांना मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कितव्या वर्षांपासून सुरुवात केली जाऊ शकते याबाबत जाणून घेण्याचे उत्सुकता असते. अशा परिस्थितीत आज आपण शेअर मार्केट मधील गुंतवणुकी बाबत असलेले नियम थोडक्यात जाणून घेणार आहोत.

हे पण वाचा :- ब्रेकिंग ! सिकंदराबाद-कोल्हापूर रेल्वे गाडीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर; या गाडीला कुठे राहणार थांबे? पहा…..

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी वयाची अट लावलेली नाही. भारतात कोणत्याही वयाची व्यक्ती शेअर बाजारात गुंतवणूक करू शकते. मात्र, स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट खाते आणि ट्रेडिंग खातं असणं गरजेचं आहे. आणि डिमॅट अकाउंट खोलण्यासाठी उमेदवाराला पॅन कार्ड सारखे अत्यावश्यक कागदपत्र लागते.

तसेच डिमॅट अकाउंट खोलण्यासाठी व्यक्तीचे वय किमान 18 वर्षे आवश्यक असते. पॅन कार्ड देखील 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच जारी केले जाते. याचाच अर्थ शेअर मार्केटमध्ये वयाची अट नसली तरी देखील अठरा वर्षे पूर्ण झालेलाच व्यक्ती शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पात्र राहणार आहे. पण 18 वर्षाखालील अल्पवयीन मुलांना देखील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करता येते.

हे पण वाचा :- पदवीधर तरुणांसाठी सुवर्णसंधी! केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत ‘या’ पदासाठी निघाली भरती, पहा डिटेल्स

हाती आलेल्या माहितीनुसार, 18 वर्षाखालील जे मुलं असतात त्यांचे डीमॅट अकाउंट सुरू होते यासाठी मात्र पालकांची कागदपत्रे द्यावी लागतात. पालकाद्वारे अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने दलालीमध्ये डीमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडले जाऊ शकते. सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर, डिपॉझिटरी पार्टिसिपंट तुम्हाला भारतीय स्टॉक एक्सचेंजमध्ये व्यापार करण्याची परवानगी देईल.

तसेच भारतात 18 वर्षाखालील जें मूल असतात त्यांना पॅन कार्ड देखील जारी केले जाते मात्र त्यावर अल्पवयीन असं लिहिलेलं असतं. एकंदरीत वर्षांखालील मुलांना देखील मार्केटमध्ये गुंतवणूक करता येऊ शकते मात्र याचा सर्व कमांड त्याच्या पालकांकडे असतो यामुळे स्वतः गुंतवणूक करण्यासाठी 18 वर्षे वयाचा व्यक्ती पात्र राहणार आहे अस आपण समजू शकतो.

हे पण वाचा :- शिर्डी, मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी ! महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती, पहा….