याला म्हणतात मल्टिबॅगर स्टॉक ! 12 रुपयाचा ‘हा’ स्टॉक पोहोचला 106 रुपयांवर, गुंतवणूकदार झालेत मालामाल; स्टॉकची ए टू झेड माहिती वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Share Market Tips : शेअर मार्केट हा असा बाजार आहे ज्या बाजारात योग्य दुकानात म्हणजे स्टॉक मध्ये गुंतवणूक केली तर गुंतवणूकदारांना या बाजारातून हजारो नव्हे तर लाखो रुपयांचा परतावा मिळतो. यासाठी मात्र स्टॉक चांगला निवडणे अनिवार्य आहे. तसेच निवडलेल्या स्टॉक वर काही काळ विश्वास देखील ठेवणे गरजेचे आहे.

म्हणजेच सर्वप्रथम गुंतवणूकदाराने योग्य अभ्यास करून, सूक्ष्म निरीक्षण नोंदवून, आपल्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊन योग्य स्टॉकमध्ये गुंतवणूक केली की ती गुंतवणूक काही काळ होल्ड करून ठेवणे देखील आवश्यक आहे. कारण की, शेअर मार्केट आज गुंतवणूक केली आणि लगेचच उद्या परतावा देईल अशी काही भानगड नाही यासाठी टाइम जाऊ द्यावा लागतो.

हे पण वाचा :- पंजाब डख नवीन अंदाज; आजपासून ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार, काही भागात गारपीट देखील होणार, पहा काय म्हणताय डख

निश्चितच लॉंग टर्म मध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून अनेक गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. मात्र शेअर मार्केटमध्ये असेही काही स्टॉक आहेत जे अवघ्या दोन ते तीन वर्षाच्या काळात आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतात आणि गुंतवणूकदार काही वर्षातच लखपतीचे करोडपती बनतात. दरम्यान, आज आपण अशाच एका स्टॉक संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.

आज आपण ज्या स्टॉक संदर्भात जाणून घेणार आहोत त्या स्टॉकने मात्र 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 740 टक्क्याचा रिटर्न देण्याची अभूतपूर्व कामगिरी करून दाखवली आहे. निश्चितच आता तुमची त्या स्टॉक संदर्भात जाणून घेण्याची उत्सुकता वाढलेली असेल. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया तो स्टॉक आहे तरी कोणता.

हे पण वाचा :- राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; अभ्यास समिती जुनी पेन्शन योजना आणि सेवानिवृत्तीच्या वयाबाबत शासनाला देणार ‘हा’ अहवाल?

कोणता आहे तो स्टॉक?

हा स्टॉक आहे किलबर्न इंजिनिअरिंग लिमिटेडचा. ही कंपनी अभियांत्रिकी औद्योगिक उत्पादन तयार करते. ही एक स्मॉल कॅपिटल असलेली कंपनी आहे. जी की गेल्या तीन वर्षांपासून आपल्या गुंतवणूकदारांसाठी विशेष फायदेशीर ठरत आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या कंपनीचा स्टॉक गेल्या तीन वर्षांपूर्वी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 12 रुपये आणि 55 पैशांवर ट्रेड करत होता. आता तीन वर्षानंतर पाच मे 2023 रोजी या कंपनीचा स्टॉक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 106 रुपये आणि 05 पैसे वर ट्रेड करत होता. म्हणजेच जवळपास 745 टक्क्याचा रिटर्न या तीन वर्षांच्या काळात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना दिला आहे.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! राज्यातील विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय, आता…..

ही कंपनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये 21 वर्षांपूर्वी लिस्ट झाली होती. त्यावेळी या कंपनीचा स्टॉक हा एक रुपये आणि 24 पैशांवर ट्रेड करत होता. आणि आता 106 रुपये आणि पाच पैशांवर ट्रेड करत आहे. म्हणजेच या स्टॉकने 21 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 8450% चा रिटर्न मिळवून देण्याचा भीम पराक्रम करून दाखवला आहे. निश्चितच ज्या गुंतवणूकदारांनी या स्टॉक मध्ये आपलं नशीब आजमावलं असेल, स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट केली असेल तर ते गुंतवणूकदार मालामाल झाले असतील.

मित्रांनो येथे आम्ही फक्त शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देत असतो. येथे दिलेली माहिती ही कोणत्याही परिस्थितीत गुंतवणुकीचा सल्ला राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी एकदा आपल्या वित्तीय सल्लागाराशी चर्चा करणे, त्यांचा सल्ला घेणे जरुरीचे आहे. 

हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी ! इंडियन ऑइल मध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती, आजच करा अर्ज