मोठी बातमी ! राज्यातील ‘इतक्या’ शेतकऱ्यांना मिळणार 75 हजार अनुदान; पहा तुम्ही आहात का यादीत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shettale Anudan Yojana 2023 : महाराष्ट्र हे एक कृषीप्रधान राज्य आहे. राज्यातील बहुतांशी जनसंख्या ही केवळ आणि केवळ शेतीवर आधारित आहे. यामुळे राज्यात राज्य शासनाच्या माध्यमातून कायमच शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना सुरू केल्या जातात. वैयक्तिक शेततळे बनवण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी देखील एक योजना सुरू झाली आहे.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेततळे विकसित करण्यासाठी सबसिडी मिळते. खरं पाहता शेती ही पाण्याविना होत नसते. मात्र राज्यातील अनेक जिल्ह्यात शेती ही सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर आधारित आहे. यामुळे या शेतकऱ्यांना रब्बी, उन्हाळी हंगामात तसेच फळबाग पिकांची शेती करता येत नाही. बारामाही बागायती शेती शेतकऱ्यांना शक्य व्हावी त्याच दृष्टीने राज्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवली जात आहे.

हे पण वाचा :- ब्रेकिंग! केंद्र पाठोपाठ राज्यानेही वाढवला महागाई भत्ता; सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात झाली ‘इतकी’ वाढ, वाचा

जसं की नावातच शाश्वत सिंचनाचा उल्लेख आहे, तसच या योजनेचं काम देखील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाचे साधन उपलब्ध करून देण हाच आहे. या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे बनवण्यासाठी आकारमानानुसार अनुदानाचे प्रावधान आहे.

यामध्ये लाभार्थ्यांना 14,433 ते 75 हजारापर्यंतचे अनुदान वैयक्तिक शेततळे बनवण्यासाठी उपलब्ध करून दिले जाते. दरम्यान राज्य शासनाच्या या योजनेला राज्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला आहे. या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या माध्यमातून शासनाच्या अधिकृत महाडीबीटीच्या पोर्टलवर नोंदणी करण्यात आली होती.

हे पण वाचा :- जनार्दनराव मानलं! संकटातून मार्ग काढत दुष्काळी पट्ट्यात फुलवली शेती; कलिंगड अन मिरचीच्या पिकातून झाली लाखोंची कमाई

महाडीबीटी वर नोंदणी केल्यानंतर लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये 6412 शेतकऱ्यांची निवड झाली आहे. दरम्यान निवड झालेल्या शेतकऱ्यांनी वेळेवर कागदपत्रे सादर न केल्यामुळे तसेच काही शेतकऱ्यांनी वैयक्तिक कारणामुळे अर्ज रद्द केले आहेत. यामुळे आता निवड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या 4137 इतकी आहे.

या लोकांची आता अर्ज प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत 2621 शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड केली आहेत. इतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून देखील कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. अर्जदाराने अपलोड केलेल्या कागदपत्रांची पडताळणी कृषी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून होत आहे. आतापर्यंत 1687 अर्जदार शेतकऱ्यांना पडताळणी नंतर पूर्वसंमती देण्यात आली आहे. म्हणजे या शेतकऱ्यांना आता शेततळे बनवता येणार आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो सावधान! अवकाळीचे संकट अजून गेले नाही; आता ‘या’ दिवशी पडणार मुसळधार पाऊस, पंजाबराव डख यांचा इशारा