Success Story:- एखादी गोष्ट किंवा व्यवसाय एखाद्या छोट्या स्वरूपामध्ये कुठलाही गाजावाजा न करता सुरू करणे व कालांतराने बाजारपेठेचा कल व मागणी ओळखून आणि नेमक्या ग्राहकांना टारगेट करून त्या पद्धतीने व्यवसायाची आखणी करणे खूप गरजेचे असते. हळूहळू व्यवसाय वाढायला लागतो व प्रगतीपथावर पोहोचतो.
अशीच काहीसे आपल्याला झोहो या कंपनीचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचे सांगता येईल. त्यांनी अमेरिकेमध्ये शिक्षण घेतले व उच्च शिक्षण घेऊन आयटी इंजिनीयर देखील झाला. अमेरिकेमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवली. परंतु आपल्या या शिक्षणाचा फायदा आपल्या देशाला व्हावा आणि गावाकडे जाऊन काहीतरी रोजगार निर्माण करावा या उद्देशाने त्यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडली आणि गावात येऊन हे कंपनीची स्थापना केली व पुढे झोहोचा प्रवास सुरू झाला.

श्रीधर वेंबू यांची यशोगाथा
मूळचे तामिळनाडू राज्यातील असलेले व उच्च शिक्षण घेऊन अमेरिकेत चांगली नोकरी मिळालेले श्रीधर वेम्बू यांचा प्रवास हा सगळ्यांना प्रेरणादायी असाच आहे. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण तामिळ भाषेतून पूर्ण केले व 1989 मध्ये आयआयटी मद्रास येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी संपादन करून ते पीएचडीसाठी अमेरिकेला गेले.
अमेरिकेला जाऊन त्यांनी त्या ठिकाणी पीएचडी पूर्ण केली व या ठिकाणी चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. परंतु या नोकरीमध्ये त्यांना समाधान न मिळाल्यामुळे आपण भारतात जाऊन काहीतरी करावे या उद्देशाने ते भारतात परतले. अमेरिकेसारख्या देशात चांगल्या पगाराची नोकरी सोडून भारतात परतणे हे त्यांच्या नातेवाईकांना अजिबात पटले नाही.
परंतु सगळ्या विरोधाचा सामना करत त्यांनी स्वतःचा व्यवसाय करावा या उद्देशाने ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे या उद्देशाने लोकांच्या ऐकण्याऐवजी स्वतःच्या मनाचे ऐकले. त्यामुळे आता काहीतरी व्यवसाय सुरू करावा म्हणून श्रीधर व त्यांचे भाऊ असे दोघे मिळून 1996 यावर्षी त्यांनी घरामध्ये ऍडव्हेंटनेट नावाचे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी म्हणजेच फर्म सुरू केला व या कंपनीचे 2009 मध्ये नाव बदलण्यात आले
व ते झोहो कॉर्पोरेशन करण्यात आले. त्यांची ही कंपनी ग्राहकांना सॉफ्टवेअर सोलुशन सेवा देते. विशेष म्हणजे ही कंपनी स्थापन करण्यासाठी त्यांनी कुठल्याही मोठ्या शहराची निवड न करता तामिळनाडू राज्यातील तेनकाशी जिल्ह्यात कंपनीची स्थापना केली. त्यांना मोठ्या ग्राहका ऐवजी छोट्या ग्राहकांकडे लक्ष केंद्रित करायचे होते व हा व्यवसाय त्यांना ग्रामीण भागात वाढवायचा होता.
त्यामागे त्यांचा उद्देश होता की ग्रामीण भागामध्ये जे काही प्रतिभावान राहतात त्यांना मुख्य निर्यात आयटी सेवांमध्ये आणावे व त्यांनी त्या ठिकाणी काम करावे. श्रीधर वेम्बू हे झोहो कार्पोरेशनचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. जर आपण काही अहवाल पाहिले तर त्यानुसार त्यांच्या या कंपनीचा महसूल 39 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणावर यश मिळवून देखील या उद्योजकाचे पाय मात्र जमिनीवर आहेत. हे आज देखील अनेकदा तुम्हाला सायकलीवर फिरताना दिसतात व शेतामध्ये देखील फेरफटका मारताना दिसतात.
आज देखील निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी अब्जोपती उद्योजक होण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केलेला आहे. तुम्हाला जर भरपूर पैसा कमावून नंतर सहज आणि साधे जीवन जगणारे व्यक्ती पाहायचे असतील तर तुमच्यासाठी श्रीधर वेम्बू एक उत्तम उदाहरण आहे.