स्कोडाची सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक SUV कार लॉन्च; प्रौढ आणि मुलांच्या सुरक्षेमध्ये आहे 5- स्टार रेटिंग

Ajay Patil
Updated:
skoda car

भारतामध्ये ज्या काही कार उत्पादक कंपन्यांच्या कार ग्राहकांमध्ये पसंत आहेत त्यामध्ये स्कोडा हे एक नाव तेवढेच प्रसिद्ध आहे. स्कोडा ही झेक कार निर्मिती कंपनी असून आतापर्यंत स्कोडाने आणलेले अनेक कार कारमध्ये खूपच लोकप्रिय ठरल्याचे दिसून आले आहे.

स्कोडाच्या कारमध्ये अनेक विविध वैशिष्ट्ये तसेच सेफ्टी फीचर्स दिलेले असतात व किमती देखील सर्वसामान्यांना परवडतील अशाच असतात. अगदी याच पद्धतीने स्कोडाने Khushaq ची ओनिक्स वर्जन भारतामध्ये महिन्याअगोदर लाँच केलेले होते. परंतु ते मॅन्युअल ट्रान्समिशन पर्यायासह बाजारात आणले गेले होते.

त्याही पुढे जात आता या स्कोडा कंपनीने  Khushq च्या ओनिक्स व्हर्जनची ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व्हेरियंट लॉन्च करण्याची घोषणा केली असून हे व्हेरिएंट ऍक्टिव्ह आणि ॲम्बीशन  ट्रिम्समध्ये उपलब्ध होणार आहे.

स्कोडा Khushaq Onyx मध्ये काय वैशिष्ट्य आहेत?

स्कोडाने या नवीन व्हर्जनमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये दिलेली असून यामध्ये बाहेरील बाजूस हाय स्पेक ॲम्बीशन ट्रिम प्रमाणे एलइडी डीआरएल आणि कॉर्नरिंग फॉग लॅम्प सोबतच एलईडी हेडलाईट सेटअप देण्यात आलेला आहे. ॲम्बीशन ट्रिमच्या विरुद्ध ओनिक्स एडिशन 16 इंच स्टीलच्या चाकांवर फिरते. तसेच या कारच्या केबिनला ओनिक्स बॅचिंग मेटलिंग प्लेट सोबतच नक्षीदार दरवाजांच्या सिल्स जोडलेले आहेत.

नाही तर ओनिक्स ब्रॅण्डिंग फ्लॉवर मॅट्स आणि कुशनवर देखील तुम्हाला आढळू शकते. तसेच या ओनिक्स एडिशन मध्ये स्वयंचलित हवामान नियंत्रण युनिटसाठी टच पॅनल देण्यात आलेला असून  इतर वैशिष्ट्यांमध्ये पॅडल शिफ्टर्स, हिल होल्ड कंट्रोल आणि डीफॉगरसह मागच्या बाजूला वायपरचा समावेश करण्यात आलेला आहे.

 कसे आहे स्कोडा Kushaq Onyx चे इंजिन?

ती कार केवळ 1.0- लिटर टीएसआय तीन सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिनसह उपलब्ध असून जे 114 bhp आणि 178 nm पिक टॉर्क जनरेट करते. तसेच नवीन अपडेट सह स्पीड मॅन्युअल तसेच सहा स्पीड टॉर्क कन्वर्टर स्वयंचलित गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे.

 किती आहे या कारची किंमत?

स्कोडाने Kushaq च्या Onyx व्हर्जनचे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व्हेरियंट लॉन्च करण्याची घोषणा केली व याची एक्स शोरूम किंमत 13 लाख 49 हजार रुपये इतकी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe