Snake Poison : सापाच्या विषाचे सेवन कसे केले जाते ? जाणून घ्या सापाच्या विषाचा शरीरावर काय परिणाम होतो

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Snake Poison :- जगामध्ये सापाच्या अनेक प्रजाती असून त्यातील काही विषारी तर बहुसंख्य प्रजाती या बिनविषारी आहेत हे आपल्याला माहिती आहे. सापा विषयी मानवाच्या मनामध्ये प्रचंड भीती असते.

कारण ते विषारी असतात व सापाने चावा घेतल्यामुळे मनुष्याचा मृत्यू होतो. असा समज प्रत्येकाच्या मनात असल्यामुळे नुसता साप दिसला तरी अंगाचा थरकाप उडतो. परंतु याच सापाच्या विषयाचा वापर ड्रग्स म्हणून नशा यावी याकरिता केला जातो.

यासंबंधीची चर्चा आता युट्युबर आणि बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता एल्वीश यादव याच्या प्रकरणावरून मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. त्यामुळे निश्चितच मनामध्ये प्रश्न येतो की सापाचे विष ड्रग्स म्हणून खरंच वापरले जात असेल का आणि वापरले जात असेल तर ते कसे वापरले जात असेल? इत्यादी संबंधी अनेक प्रश्न मनात येतात. त्यामुळे या लेखात याच प्रश्नांची उत्तरे थोडक्यात पाहू.

सापाच्या विषाचा ड्रग्ज म्हणून होतो वापर

सापाचे विष हे ड्रग्स म्हणून सरासपणे वापरले जाते. जर आपण याची तस्करी किंवा आर्थिक देवाण-घेवाण पाहिली तर ती कोट्यावधी डॉलरची आहे. युट्युबर एल्वीश यादव यांच्या विरोधात उत्तर प्रदेश मधील पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून

एका रेव्ह पार्टीमध्ये सापाच्या विषाची विक्री केल्याप्रकरणी पोलिसांकडून सदर कारवाई करण्यात आली आहे. या अंतर्गत पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात सापाचे 20 मिली विष, पाच कोब्रा साप तसेच एक अजगर, दोन दुतोंडी साप आणि एक स्नेक राईट जप्त करण्यात आला आहे.

सापाच्या विषाचे सेवन कसे केले जाते ?

यासंबंधी जर आपण काही रिपोर्टचा विचार केला तर त्यांच्यानुसार भारतामध्ये सापाचे विष ड्रग्स म्हणून वापरले जाते याच्या काही नोंदी आहेत. या प्रकारामध्ये सापाला संबंधित व्यक्तीच्या पायावर किंवा जिभेवर चावायला प्रवृत्त केले जाते. या प्रकारांमध्ये खास करून कोब्रा आणि इंडियन क्रेट्स या सापाच्या जातींचा प्रामुख्याने वापर केला जातो.

सापाच्या विषाचा शरीरावर काय होतो परिणाम?

सापाचे विष हे न्यूरोटॉक्सिन प्रमाणे काम करते. त्यामुळे कदाचित बधिरता येते तसेच वेदना नाहीशा होतात. तसेच या बाबतीत असलेल्या एका अभ्यासानुसार सापाच्या विषामध्ये निकोटीन एसिटाइलकोलिन रिसेप्टर्स हा न्यूरो-टॉक्सिनचा प्रकार आढळतो.

हे जे काही न्यूरो टॉक्सिन असते ते मेंदूच्या आजूबाजूला असते. हे मानवामध्ये आनंदाची भावना निर्माण करण्यासाठी मदत करत असते व यामध्ये सापाचे विष मानवी रक्तामध्ये मिक्स म्हणजेच मिसळल्यावर ते सेरोटोनीन नावाचे मेटाबोलाईट सोडते व याच कारणामुळे अंग बधीर होते तसेच माणसाला भूल येते व वेदना नाहीशा होतात.

तसेच काही अभ्यासानुसार साप चावल्यानंतर डोळ्यांना अंधुक दिसायला लागते व शरीर प्रतिसाद देत नाही. ही परिस्थिती साधारणपणे एक तास पर्यंत असू शकते. या विषाचा परिणाम कमी झाल्यानंतर व्यक्तीला ताजेतवाने वाटते व हा तीन ते चार आठवडे असाच उत्साह टिकतो. परंतु करण्यात आलेल्या अभ्यासानुसार सापाच्या विषाचा प्रभाव जेव्हा कमी होतो तेव्हा मात्र आग होते व हे विष अजून हवे अशी तीव्र इच्छा उत्पन्न होते.