साप हे नाव जरी ऐकले तरी बऱ्याच जणांच्या अंगावर भीतीने काटा उभा राहतो. कारण साप म्हटले म्हणजे त्याने चावा घेतल्यानंतर माणसाचा मृत्यू होतो हा समज प्रत्येकाच्या मनात असल्याने प्रत्येक जण सापाला घाबरत असते. परंतु सापांच्या बाबतीत बघितले तर जितक्या सापांच्या प्रजाती आहेत त्यापैकी काही मोजक्या प्रजाती या विषारी असून बाकीच्या सापाच्या प्रजाती या बिनविषारी वर्गात मोडतात.
परंतु तरीदेखील सापांपासून स्वतःचा बचाव किंवा संरक्षण करणे गरजेचे असते. या अनुषंगाने जर आपण सापांचे वास्तव्य किंवा सापांना आवडणाऱ्या वस्तू याबद्दल पाहिले तर बऱ्याच झाडांचे वास सापांना सहन होत नाही किंवा आवडत नसल्यामुळे साप घराजवळ फिरकत नाहीत.
परंतु अशी काही झाडे आहेत की ते जर घराजवळ असले तर त्यांच्यामुळे साप घराच्या आसपास किंवा घरामध्ये देखील येऊ शकतात. कारण घराजवळ बऱ्याच जणांना सौंदर्यासाठी वेगळ्या प्रकारचे झाडे लावायचा छंद असतो. परंतु यामध्ये काही झाडे हे सापांना आमंत्रण देणारे ठरू शकतात. त्यामुळे अशी कोणती झाडे आहेत की ज्यामुळे साप घरापर्यंत किंवा घरात येऊ शकतात. त्याबद्दल माहिती घेऊ.
घराजवळ असतील ही झाडे तर सापांना मिळेल घरात यायचे आयतेच आमंत्रण
1- चंदन– ज्या झाडांची पाने अतिशय दाट असतात अशा झाडांवर साप जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता असते. काही संशोधनांचा आधारे पाहिले तर सापांना वासाची तीव्र क्षमता असते व त्यामुळे चंदनाच्या सुगंधी झाडावर साप जास्त प्रमाणात राहतात. चंदना प्रमाणेच ते चमेली आणि रजनीगंधा भोवती देखील राहण्याची शक्यता असते. शरीराचे तापमान नियंत्रणात राहावे याकरिता साप चंदनाच्या झाडा सभोवती राहतात. कारण चंदनाला कुलिंग इफेक्ट असल्यामुळे या झाडावर साप नक्कीच असतात.
2- लिंबूचे झाड– लिंबू खायला आंबट असते हे आपल्याला माहिती आहे व त्यामुळे अनेक प्रकारचे कीटक, उंदीर आणि पक्षी त्याला खातात व त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर राहतात. अशाप्रसंगी साप त्या पक्षांची किंवा उंदरांची शिकार करण्यासाठी या झाडाजवळ येण्याची शक्यता वाढते. पुढे जर तुमच्या अंगणामध्ये किंवा बागेत लिंबाचे झाड असेल तर काळजी घेणे गरजेचे आहे.
3- देवदाराचे झाड– देवदाराचे झाड प्रामुख्याने जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतात व ते आकाराने मोठी असतात. त्यामुळे साप सावली मिळावी याकरिता या झाडाच्या अवतीभवती फिरतात. त्यामुळे जर घराजवळ देवदाराचे झाड असेल तर काळजी घेणे गरजेचे आहे.
4- सायप्रस प्लांट किंवा सरूचे झाड– ही शोभेची वनस्पती असल्यामुळे बरेच जण घराच्या जवळ किंवा बागेत याची लागवड करतो. या प्लांटची पाने बारीक असतात आणि ते झुडूपा सारखे असते. हे दिसायला सुंदर असते व दाट असल्यामुळे त्या ठिकाणी साप सहजपणे वास्तव्य करू शकतात.
5- चमेली– चमेली सभोवती सापांना राहायला आवडतं असे म्हटले जाते व ही एक सावली देणारी वनस्पती आहे. घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी रहावी किंवा सुख-समृद्धी नांदावी या उद्देशाने अनेक लोक चमेलीची घराजवळ लागवड करतात. परंतु चमेलीच्या झाडांकडे देखील साप आकर्षित होऊ शकतात. कारण हे एक सावली देणारी वनस्पती आहे.
6- क्लोव्हर प्लांट– ही वनस्पती जमिनीपासून जास्त उंच वाढत नाही. त्यामुळे जमिनीच्या अगदी जवळ ती पसरत असल्यामुळे साप या ठिकाणी सहजपणे लपून बसतात व त्या ठिकाणी विश्रांती घेतात. तसेच जमिनीलगत असल्यामुळे या प्लांटच्या खाली थंडावा देखील चांगला मिळत असल्याने साप या ठिकाणी येऊन बसण्याची शक्यता असते.