मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला आज मोदी दाखवणार हिरवा झेंडा ! ‘या’ वेबसाईटवर होणार रेल्वे तिकीटचं ऑनलाईन बुकिंग, असें असतील तिकीट दर, पहा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Solapur News : बहुप्रतिक्षित मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेनचं आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. उद्यापासून ही ट्रेन प्रवाशांचा सेवेत दाखल होईल. ही वंदे भारत एक्सप्रेस पुणे मार्गे धावणार असल्याने पुणेकरांना देखील यामुळे मोठा फायदा होणार आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस देशातील नववी वंदे भारत एक्सप्रेस राहणार असून महाराष्ट्रातील तिसरी वंदे भारत एक्सप्रेस राहील.

महाराष्ट्रात सध्या दोन इंट्रास्टेड वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. नागपूर बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस आणि मुंबई सेंट्रल ते गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेस सध्या धावत आहेत. आज यामध्ये आणखी दोन वंदे भारत एक्सप्रेसची भर पडणार आहे. आज मुंबई सोलापूर व्यतिरिक्त मुंबई शिर्डी या आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

सीएसएमटी ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या बंद भारत एक्सप्रेस च्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर मुंबई-सोलापूर वंदे भारत गाडी क्रमांक 22225 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणाहून बुधवार वगळता दररोज सायंकाळी चार वाजून पाच मिनिटांनी सोलापूरकडे धावनार असून रात्री दहा वाजून 40 मिनिटांनी ही ट्रेन सोलापूरला पोहोचणार आहे.

तसेच रेल्वे क्रमांक 22226 म्हणजेच सोलापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस गुरुवार वगळता दररोज सकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी मुंबईकडे प्रस्थान करणार असून बारा वाजून 35 मिनिटांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकावर दाखल होणार आहे.

कुठे होणार रेल्वे तिकीट बुकिंग

मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस साठी तिकीट बुकिंग रेल्वे स्थानकांसह, www.irctc.co.in या संकेतस्थळावर आजपासून करता येणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला कुठे कुठे राहणार थांबे

या ट्रेनला दादर, कल्याण, पुणे आणि कुर्डुवाडी या स्थानकांवर थांबे राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. या रेल्वेत २ एसी एक्झिक्युटिव्ह क्लास आणि १४ एसी चेअर कार असणार आहेत.

मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस चे तिकीट दर माहितीयेत का? नाही, मग पहा सविस्तर