Solar Eclipse:- अवकाशामध्ये अनेक ग्रहताऱ्यांच्या संबंधित घटना घडत असतात व याचा कळत नकळत परिणाम हा पृथ्वीवर होत असतो. परंतु यामध्ये जर पाहिले तर सगळ्यात जास्त प्रसिद्ध असलेल्या घटना म्हणजे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या आहेत.
सूर्यग्रहणाच्या बाबतीत महत्त्वाची माहिती घेतली तर यामध्ये असे दिसून येते की प्रत्येक 18 महिन्यांनी या पृथ्वीतलाच्या कुठल्यातरी भागामध्ये सूर्यग्रहण होत असते. जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये सरळ रेषेत बिंदू म्हणून येतो तेव्हा चंद्राची सावली सूर्यावर पडते व सूर्य झाकवला जातो व त्यालाच आपण ग्रहण म्हणतो.
अशाच प्रकारे उद्या म्हणजेच 8 एप्रिल 2024 रोजी सूर्यग्रहण होणार असून जगभरातील लोक याबाबत खूप उत्सुक आहेत. हे सूर्यग्रहण उत्तर अमेरिकेच्या काही भागांमध्ये संपूर्णपणे दिसणार आहे व त्या ठिकाणी चार मिनिट नऊ सेकंद इतका वेळ पूर्ण अंधार असणार आहे.
या सूर्यग्रहणाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे कॅनडा, तर अमेरिकेपासून मेक्सिकोपर्यंत दिसू शकणार आहे. ग्रहणाचा कालावधी बराच मोठा असल्यामुळे नासाच्या शास्त्रज्ञांनी या कालावधीत वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करण्याचे नियोजन केले आहे.या बाबतीत जगातील शास्त्रज्ञच नव्हे तर काही संस्था देखील वेगवेगळे प्रयोग करणार आहेत.
अमेरिकेतील एनसी स्टेट युनिव्हर्सिटी करेल वन्यजीवांवर अभ्यास
या ग्रहण कालावधीमध्ये अमेरिकेतील एनसी स्टेट युनिव्हर्सिटी या सूर्यग्रहणाच्या कालावधीमध्ये वन्यजीवांवर काय परिणाम होऊ शकतो याचा अभ्यास करणार आहे. या प्रयोगाकरिता टेक्सास राज्य प्राणी संग्रहालयातील जवळपास 20 प्राण्यांचे वर्तन या कालावधीत कसे राहणार याबाबत अभ्यास केला जाणार आहे.
याव्यतिरिक्त नासाचा जो काही क्लिप्स साऊंड स्केप्स हा प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी देखील या कालावधीत प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास केला जाणार असून हा प्रोजेक्ट त्याकरिताच तयार करण्यात आला आहे.
नासाच्या या प्रोजेक्टमध्ये जेव्हा सूर्यग्रहणामुळे चार मिनिटांचा अंधार असेल तेव्हा प्राण्यांचे आवाज व प्राण्यांच्या रिएक्शन रेकॉर्ड केल्या जाणार असून त्याकरिता मायक्रोफोन सारखी छोटे उपकरणे देखील बसवण्यात आलेली आहेत.
सूर्यग्रहणाच्या कालावधीत नासाची विविध प्रयोगांकरता आहे जोरदार तयारी
या सूर्यग्रहणाचा जो काही पट्टा आहे त्यापासून दूर अंतरावर अमेरिकेतील व्हर्जिनिया येथील नासा या संशोधन संस्थेचा जो काही वॉलॉप्स तळ आहे त्या ठिकाणाहून तीन ध्वनि रॉकेट सोडण्यात येणार आहेत. या तीन ध्वनि रॉकेटमुळे सूर्यग्रहणाच्या वेळी वातावरणामध्ये कुठले बदल होतील याचे रेकॉर्ड हे ध्वनी रॉकेट करणार आहेत.
यामध्ये हे रॉकेट पृथ्वीपासून सुमारे 420 किलोमीटर उंच जातील व नंतर पृथ्वीवर कोसळणार आहेत.या तीनही रॉकेटपैकी पहिले रॉकेट ग्रहणाच्या 45 मिनिट अगोदर, यातील दुसरे रॉकेट ग्रहण लागेल तेव्हा आणि तिसरे रॉकेट ग्रहण संपल्यानंतर 45 मिनिटांनी सोडले जाणार आहे.
अंतराळ आणि वातावरण यांच्यामध्ये आयनोस्पियर नावाचा जो काही संरक्षक स्तर आहे. हा स्तर रेडिओ लहरी प्रतिबिंबित करतो. साधारणपणे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 80 किलोमीटरवर पासून तो सुरू होतो. साऊंड रॉकेटच्या मदतीने सूर्यग्रहण कालावधीमध्ये या आयनॉस्पियर थरामध्ये कुठले बदल होतात याचा अभ्यास देखील शास्त्रज्ञ करणार आहेत.
जर आपण सर्वसाधारणपणे पाहिले तर आयनॉस्फेरिक चढउतार असतात ते उपग्रह संप्रेषणावर खूप परिणाम करतात. त्यामुळे याबद्दलचा तपशीलवार अभ्यास करण्याची एक नामी संधी सूर्यग्रहणामुळे निर्माण होते. या प्रकारच्या अभ्यास केल्याने त्या माध्यमातून आपल्या संपर्क यंत्रणेवर कोणत्या गोष्टींचा परिणाम होतो हे समोर येईल.
हजारो लोकांनी काढलेल्या सूर्यग्रहणाच्या फोटोंचे केले जाईल विश्लेषण
या कालावधीत नासाच्या मदतीने मजेशीर असा प्रयोग देखील केला जाणार आहे. यामध्ये लोकांना सूर्यग्रहण पाहताना त्याची छायाचित्रे काढण्यास सांगण्यात आले असून विविध ठिकाणाहून लोकांनी काढलेली छायाचित्रे एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने एकत्रित केले जाणार असून त्यांचे विश्लेषण केले जाणार आहे.
या माध्यमातून सूर्यग्रहणाच्या कालावधीमध्ये सूर्याचे जे काही वर्तुळ असते त्याच्या बाहेर वेगवेगळ्या प्रकारच्या वायूंनी बनलेल्या वातावरणाची वेगवेगळी छायाचित्र मिळणार आहेत. कारण इतर वेळेस सूर्याचा जो काही प्रखर प्रकाश असतो त्यामुळे त्याच्या सभोवतालचे आवरण आपल्याला अजिबात दिसत नाही
व त्याकरता विविध प्रकारची उपकरणे वापरावी लागतात. परंतु सूर्यग्रहणा दरम्यान सूर्याभोवती एक वलय दिसणार आहे व त्यासोबतच सूर्याच्या अगदी जवळ असलेले तारे देखील दिसणार आहेत व त्यांचा अभ्यास करणे देखील सोपे जाणार आहे.
नासाचे अल्टिट्युड रिसर्च प्लेन घेणार ग्रहणाचे फोटो
यादरम्यान नासाचे हाय अल्टिट्युड रिसर्च प्लेन हे 50 हजार फूट उंचीवरून सूर्यग्रहणाची फोटो घेणार आहे व मेक्सिकोतून ग्रहण जसे वाढत जाईल तसतसे या विमानाच्या माध्यमातून ठेवलेली उपकरणे याकरिता मदत करतील.
याशिवाय ग्रहणाच्या कालावधी दरम्यान वातावरणातील आणि हवामानातील बदल यांची नोंद घेता यावी याकरिता बलून प्रोजेक्ट देखील कार्यान्वित केला जाणार आहे. त्यामध्ये सहाशे फुगे वातावरणामध्ये सोडले जाणार आहेत व ते पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 35 किलोमीटर पर्यंत उडू शकतील अशा फुग्यांसह विविध उपकरणे महत्त्वाच्या बाबी रेकॉर्ड करणार आहेत. अशाप्रकारे इतर देखील प्रयोग केले जाणार आहेत.